फोटो सौजन्य: @Earlsimxx (X.com)
भारतीय बाजारात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे Volvo. या युरोपियन ऑटो कंपनीने विविध सेगमेंटमध्ये वाहन ऑफर केली आहेत. नुकतेच, कंपनीने एक अपडेटेड कार भारतीय बाजारात लाँच केली आहे.
व्होल्वो कार इंडियाने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही व्होल्वो XC60 चा दुसरा फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केला आहे. महत्वाची बाब म्हणजे तीन वर्षांनी या कारला नवीन फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये आणण्यात आले आहे. त्याच वेळी, जागतिक बाजारात लाँच झाल्यानंतर 5 महिन्यांनी ही कार भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. त्यात कोणताही मेकॅनिकल बदल करण्यात आलेला नाही, परंतु डिझाइन आणि फीचर्समध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. 2025 च्या व्होल्वो XC60 फेसलिफ्टबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया, ती कोणत्या नवीन फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे?
नव्या रंगरूपात Yamaha MT-15 लाँच, आता ग्राहकांना मिळणार अत्याधुनिक फीचर्स
या कारच्या एक्सटिरिअर डिझाइनमध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत, परंतु सिल्हूट पूर्वीसारखाच आहे. ही कार मागील मॉडेलसारखीच दिसते. त्यात नवीन डायगोनल-स्लॅट ग्रिल आणि पुन्हा डिझाइन केलेले अलॉय व्हील्स आहेत. तसेच त्याच्या टेल लाईट्समध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
ही कार क्रिस्टल व्हाइट, ओनिक्स ब्लॅक, डेनिम ब्लू, ब्राइट डस्क आणि व्हेपर ग्रे कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आले आहे, तसेच फॉरेस्ट लेक आणि मलबेरी रेड या दोन नवीन रंगांमध्येही ही कार सादर करण्यात आली आहे. यामध्ये देण्यात येणारा प्लॅटिनम ग्रे रंगाचा पर्याय बंद करण्यात आला आहे.
‘या’ इलेक्ट्रिक बाईकसाठी ग्राहक अक्षरशः तरसलेत, August 2025 मध्ये होणार लाँच
2025 च्या व्होल्वो XC60 फेसलिफ्टच्या इंटिरिअरमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. यात फ्रीस्टँडिंग 11.2-इंच टचस्क्रीन आहे. ऑडिओसाठी 15 स्पीकर्ससह 1410W-Bowers & Wilkins सिस्टम प्रदान करण्यात आली आहे. यासोबतच, 12.3-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले, डॅशबोर्डमध्ये लाकडी इनले, मसाजिंग फ्रंट सीट्स आणि नप्पा लेदर अपहोल्स्ट्री देखील उपलब्ध आहेत.
2025 व्होल्वो XC60 फेसलिफ्टमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक उत्तम सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. यात ऑटोब्रेकसह क्रॉस-ट्रॅफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ADAS सूटचे लेन आणि पायलट असिस्ट सारखी फीचर्स आहेत. यासोबतच, EBD सह मल्टीपल एअरबॅग्ज आणि ABS सारखी फीचर्स उपलब्ध आहेत.
2025 Volvo XC60 facelift भारतीय बाजारात 71.90 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. भारतीय बाजारात ती Mercedes GLC, BMW X3 और Audi Q5 सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.