
हिरोने या बाइकसाठी दोन नवीन कलर ऑप्शनही आणले आहेत. यात गन मेटल ग्रे आणि मॅट अॅक्सिस ग्रे यांचा समावेश आहे. याशिवाय ब्लॅक पर्ल रेड आणि ब्लॅक टील ब्लू हे रंग आधीपासून उपलब्ध आहेत. ग्लॅमर एक्स मॉडेल ऑगस्ट 2025 मध्ये ₹89,999 च्या सुरुवातीच्या किमतीत दाखल झाले होते. आता एबीएसच्या समावेशामुळे बाइकच्या सुरक्षेत महत्त्वाची भर पडली आहे. पॅनिक ब्रेक अलर्ट आणि हॅझर्ड लॅम्पसारखी सेफ्टी फीचर्सही यात देण्यात आली आहेत.
2027 Kawasaki Versys 1100 भारतात लाँच, किंमत ₹13.89 लाख; जाणून घ्या खास फीचर्स
डिझाइनच्या बाबतीत बाइकचे मस्क्युलर आणि स्पोर्टी लुक कायम ठेवण्यात आले आहे. ऑल-एलईडी लाइटिंग, एच-सिग्नेचर आणि स्पोर्टी ग्राफिक्स यामुळे तिचा लूक आकर्षक दिसतो. याशिवाय इको, रोड आणि पॉवर असे 3 राइड मोड, राइड-बाय-वायर थ्रॉटल आणि क्रूझ कंट्रोल मिळते. ड्युअल अंडर-सीट मोबाइल स्टोरेज, सी-टाइप यूएसबी चार्जिंग पोर्ट, 790 mm सीट हाइट आणि रुंद हँडलबार यामुळे रोजच्या वापरातही सोयीचा अनुभव मिळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
बाइकमध्ये 4.2-इंच मल्टी-कलर डिजिटल टीएफटी डिस्प्ले असून त्यावर 60 पेक्षा अधिक फंक्शन्स पाहता येतात. गियर शिफ्ट अॅडव्हायजरी, डिस्टन्स-टू-एम्प्टी आणि रिअल-टाइम मायलेज इंडिकेटर यासारखी माहिती मिळते. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे स्मार्टफोन जोडल्यावर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, ईटीए, कॉल नोटिफिकेशन आणि एसएमएस अलर्टही वापरता येतात.
भारतीय कंपन्यांचा इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये दबदबा! होंडा, सुझुकी, यामाहा अजूनही स्पर्धेत मागे
परफॉर्मन्ससाठी 124.7cc सिंगल-सिलिंडर एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8,250 rpm वर 11.4 bhp पॉवर आणि 6,500 rpm वर 10.5 Nm टॉर्क तयार करते. इंजिनसोबत 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाइकला 18-इंच अलॉय व्हील्स आणि 10 लिटर क्षमतेची फ्युल टाकी मिळते.