Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिरो मोटोकॉर्पची जर्मनीच्या मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; Xpulse 200 4V अन् 200 Pro बाईक्स लाँच!

हिरो मोटोकॉर्पने KSR ग्रुपसोबतच्या पार्टनरशिपतर्फे जर्मनीत अधिकृत प्रवेश केला असून, जर्मनी ही कंपनीची ५वी युरोपियन आणि ५३वी जागतिक बाजारपेठ ठरली आहे. कंपनीने युरो ५+ मानकांनुसार बनवलेली XPulse 200 4V मालिका ५ वर्षांच्या वॉरंटीसह २८ हून अधिक डीलरशिप्सद्वारे बाजारात उतरवली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 21, 2026 | 03:59 PM
हिरो मोटोकॉर्पची जर्मनीच्या मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; Xpulse 200 4V अन् 200 Pro बाईक्स लाँच!
Follow Us
Follow Us:
  • हिरो मोटोकॉर्पने KSR ग्रुपच्या सहकार्याने ५३ वा जागतिक देश म्हणून जर्मनीत अधिकृत प्रवेश केला.
  • युरो ५+ मानकांची XPulse 200 4V आणि XPulse 200 Pro या बाइक्स जर्मनीत लाँच करण्यात आल्या.
  • २८ पेक्षा जास्त केंद्रांद्वारे विक्री होणार असून ग्राहकांना ५ वर्षांची वॉरंटी मिळणार आहे.

ऑटोमोबाईल विश्वातील भारताचे सुवर्नांकित नाव म्हणजे हिरो मोटोकॉर्प. या प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनीने जर्मनीच्या बाजारपेठेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. यासह जर्मनी ही हिरो मोटोकॉर्पची युरोपमधील ५ वी, तर जागतिक स्तरावरील ५३ वी बाजारपेठ ठरली आहे. ऑस्ट्रिया स्थित KSR ग्रुप सोबतच्या वितरक भागीदारीद्वारे कंपनी आपली ‘युरो ५+’ मानकांनुसार बनवलेली वाहने जर्मनीत विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे.

या लाँचिंगचा सोहळा जर्मनीतील प्रमुख ऑटोमोबाईल केंद्रांपैकी एक असलेल्या ‘मोटरवर्ल्ड मेटझिंगन’ येथे पार पडला. या वेळी आयोजित केलेल्या अर्बन रायडिंग अनुभवाच्या माध्यमातून पाहुण्यांना हिरोच्या नवीन वाहनांची चाचणी घेण्याची संधी मिळाली.

XPulse 200 4V सिरीज आघाडीवर

जर्मनीत हिरो मोटोकॉर्पच्या पोर्टफोलिओचे नेतृत्व XPulse 200 4V सिरीज करत आहे. यामध्ये XPulse 200 4V आणि ऑफ-रोडिंगसाठी विशेष डिझाइन केलेली XPulse 200 Pro या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. दोन्ही बाइक्स युरो ५+ मानकांनुसार तयार करण्यात आल्या आहेत.

सुपरकारच्या इंजिनालाही पछाडून सोडेल ही हत्तीमाफिक बाईक! बॉस हॉस कंपनी आणतेय जगातील ‘सर्वात रापचिक क्रूझर बाईक’! पाहून घ्या एक झलक

  • XPulse 200 4V: याची किंमत सुमारे ₹३.२९ लाख असून यात ८२५ मिमी सीटची उंची आणि स्टँडर्ड ग्राउंड क्लिअरन्स मिळतो.
  • XPulse 200 Pro: याची किंमत सुमारे ₹३.६२ लाख असून यात ८९१ मिमी सीटची उंची आणि २७० मिमी ग्राउंड क्लिअरन्स मिळतो.
दोन्ही बाइक्समध्ये १९९.६cc चे, फोर-व्हॉल्व्ह इंजिन देण्यात आले असून ते १८.९ bhp पॉवर आणि १७.३५ Nm टॉर्क जनरेट करते. XPulse 200 Pro मध्ये पुढे २५० मिमी आणि मागे २२० मिमी ट्रॅव्हल असलेले fully-adjustable सस्पेंशन, हँडलबार रायजर्स आणि ऑफ-रोड बूटसाठी सोयीस्कर गियर लेव्हर यांसारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

या गाड्यांमध्ये Road, Off-Road आणि Rally हे तीन ABS मोड्स आहेत. याव्यतिरिक्त ब्लूटूथ नेव्हिगेशन, LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि LED प्रोजेक्ट हेडलाइट्स हे दोन्ही मॉडेल्समध्ये स्टँडर्ड म्हणून मिळतात.

E-Scooter Battery: ई-स्कूटरची बॅटरी लवकर संपतेय? रेंज आणि बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी फॉलो करा या १० भन्नाट ट्रिक्स!

विक्रीचे नेटवर्क आणि वॉरंटी

KSR ग्रुप सुरुवातीला जर्मनीतील प्रमुख शहरांमध्ये २८ पेक्षा जास्त अधिकृत डीलरशिप्स आणि सर्व्हिस सेंटर्सद्वारे हिरोच्या गाड्यांची विक्री करेल. तसेच येत्या काळात हे जाळे वेगाने वाढवण्याची योजना आहे. हिरो मोटोकॉर्प ग्राहकांना ५ वर्षांची वॉरंटी देणार आहे.

अधिकारी काय म्हणाले?

संजय भान एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट ग्लोबल बिझनेस, हिरो मोटोकॉर्प म्हणाले, “हिरो मोटोकॉर्पच्या जागतिक प्रवासात जर्मनीतील प्रवेश हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. इटली, स्पेन, फ्रान्स आणि युकेमधील यशांतर युरोपमधील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत प्रवेश करणे हे आमच्या जागतिक व्यवसायाची ताकद आणि या प्रदेशातील दीर्घकालीन वचनबद्धता दर्शवते.”

यूके, फ्रान्स, स्पेन आणि इटलीनंतर आता जर्मनीमध्ये प्रवेश केल्यामुळे हिरो मोटोकॉर्पची जागतिक उपस्थिती आता ५३ देशांमध्ये पसरली आहे.

Web Title: Hero motorcorps entry in germany market automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Hero MotoCorp

संबंधित बातम्या

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास
1

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!
2

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स
3

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स

Honda QC3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; 145 km रेंज, किंमत फक्त Rs. 1.35 लाख
4

Honda QC3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; 145 km रेंज, किंमत फक्त Rs. 1.35 लाख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.