फक्त 3 हजाराच्या EMI वर मिळेल Hero Passion Plus
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या आनंदाच्या उत्सवात अनेक जण घर खरेदी, नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरु करत नवीन सुरुवात करत असतात. तसेच, कित्येक जण दिवाळीच्या मुहूर्तावर बाईक खरेदी सुद्धा करतात. अशातच जर तुम्ही सुद्धा जर तुम्ही परवडणाऱ्या आणि चांगल्या बाईकच्या शोधात असाल, तर Hero Passion Plus तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
GST कपातीनंतर, कंपनीने या Hero Passion Plus ची किंमत अजूनच कमी केली आहे, ज्यामुळे ती मध्यमवर्गीयांसाठी एक बजेट फ्रेंडली ऑप्शन ठरली आहे. आता, तुम्ही फक्त 5 हजारांच्या डाउन पेमेंटसह ती घरी आणू शकता. या बाईकची ऑन-रोड किंमत आणि ईएमआयचा हिशोब पाहूयात.
दिल्लीमध्ये हिरो पॅशन प्लसची एक्स-शोरूम किंमत 76 हजार 691 रुपये आहे. या ऑन-रोड किंमतीत आरटीओ आणि विमा शुल्क समाविष्ट केल्यानंतर याची एकूण किंमत 91 हजार 383 असेल. ही ऑन-रोड किंमत शहरे आणि डीलरशिपनुसार बदलू शकते.
जर तुम्ही हिरो पॅशन प्लससाठी 5000 रुपयांचे डाउन पेमेंट करू शकत असाल, तर 10 टक्के वार्षिक व्याजदराने 86,383 रुपयांचे 3 वर्षांचे कर्ज घेऊन, EMI अंदाजे ₹3,119 असेल.
Hero Passion Plus मध्ये 97.2cc चे सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड OBD2B इंजिन दिले आहे, जे 7.91 bhp ची पॉवर आणि 8.05 Nm चा टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये 4-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला असून तिची टॉप स्पीड 85 kmph इतकी आहे. Hero Passion Plus प्रति लिटर 70 किलोमीटरचा मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.
या बाईकमध्ये 11 लिटर क्षमतेचा फ्युएल टँक दिलेला आहे, ज्यामुळे एकदा टँक फुल केल्यानंतर ही बाईक सुमारे 750 किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते.
Diwali 2025 मध्ये ‘या’ Best Bikes वरून एकदा नजर फिरवाच! किंमत 2 लाखांपेक्षा कमी
Hero Passion Plus मध्ये दैनंदिन वापरासाठी उपयुक्त फिचर्स दिले गेले आहेत. यात i3S टेक्नॉलॉजी, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ट्रिप मीटर, ओडोमीटर, फ्युएल गेज, USB चार्जिंग पोर्ट आणि साइड स्टँड इंजिन कट-ऑफ सारखे आधुनिक फिचर्स समाविष्ट आहेत.
रायडर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने, या बाईकमध्ये समोर आणि मागील दोन्ही चाकांवर 130mm ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत, जे इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम (IBS) सोबत येतात. हे ब्रेकिंग सिस्टीम बाईकची स्थिरता आणि नियंत्रण वाढवून तिला आणखी सुरक्षित बनवते.
एकूणच पाहता, Hero Passion Plus ही उत्कृष्ट मायलेज, उत्तम आधुनिक फिचर्स आणि विश्वासार्ह परफॉर्मन्स देणारी किफायतशीर कम्यूटर बाईक ठरते.