
फोटो सौजन्य: Gemini
भारतीय बाईक खरेदीदार नेहमीच अशा बाईकच्या शोधात असतात, जे त्यांना उत्तम मायलेज देईल. खरंतर मार्केटमध्ये अशा अनेक बाईक्स आहेत. यातही Splendor चा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, जर तुम्ही या बाईक व्यतिरिक्त इतर पर्याय शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Hero च्या बाईक्स भारतीय बाजारात त्यांच्या किफायतशीर मायलेजसाठी ओळखल्या जातात. Splendor Plus पेक्षा अधिक फीचर्स मिळणारी आणि बजेटमध्ये बसणारी बाईक शोधत असाल, तर Hero Passion Plus 2025 हा तुमच्यासाठी उत्कृष्ट पर्याय ठरू शकते. अलीकडेच झालेल्या GST कपातीचा फायदा या बाईकलाही झाला असून तिची किंमत आणखी परवडणारी झाली आहे. चला, तिच्या फीचर्सवर एक नजर टाकूयात.
2025 मध्ये Hero Passion Plus फक्त एकाच रेग्युलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 76,691 रुपये आहे. तर दिल्लीतील ऑन-रोड किंमत सुमारे 91,137 पर्यंत जाते, ज्यात RTO, इन्शुरन्स आणि इतर शुल्कांचा समावेश आहे. बजेट सेगमेंटमध्ये असूनही या बाइकमध्ये पुरेसा रिफाइनमेंट आणि प्रॅक्टिकल फीचर्स मिळतात.
Hero Passion Plus मध्ये 97.2cc चे BS6 Phase 2B कंप्लायंट एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे फ्युल-इंजेक्शन तंत्रज्ञानासह येते. हे इंजिन 7.9 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करते, ज्यामुळे शहराच्या ट्रॅफिकमध्ये ती सहज पिकअप घेते आणि 0 ते 60 kmph स्पीड पटकन पकडते. 4-स्पीड गिअरबॉक्ससह याची टॉप स्पीड सुमारे 85 kmph आहे, जी दैनंदिन वापरासाठी योग्य आहे.
घर आणि ऑफिसच्या प्रवासासाठी Petrol Car चांगली की Electric? अगदी सोप्या भाषेत समजून घ्या
Passion Plus ची सर्वात मोठी खासियत म्हणजे याचे मायलेज. ती सहज 60–70 kmpl दरम्यान मायलेज देते. i3S (Idle Stop-Start) टेक्नॉलॉजीमुळे सिग्नलवर फ्युलची बचत होते आणि फ्युल एफिशिएन्सी वाढते. तिच्या 11-लिटर फ्युल टँकवर एकदा फुल टँक केल्यास 600 किमीपेक्षा जास्त रेंज मिळते, ज्यामुळे रोज 40–50 किमी चालवणाऱ्या रायडर्ससाठी ती अत्यंत किफायतशीर ठरते.
2025 मध्ये Passion Plus ला अनेक नवीन फीचर्ससह अपडेट करण्यात आले आहे. यात
जर तुम्हाला उत्कृष्ट मायलेज, अपडेटेड फीचर्स, कमी मेंटेनन्स खर्च आणि मॉडर्न डिझाइन हवे असेल, तर Hero Passion Plus 2025 तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. Splendor Plus च्या तुलनेत ती जास्त फीचर्स आणि आधुनिकपणा देते.