Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hero Scrambler Concept EICMA 2026 मध्ये सादर! Dakar Rally स्टाइलसह प्रीमियम बाइकची झलक

Hero Scrambler Concept मध्ये रेट्रो लूकसोबत अ‍ॅडव्हेंचर बाइकची झलक पाहायला मिळते. हिरोने या कॉन्सेप्टमध्ये इंजिनची माहिती दिलेली नसली, तरी तिचे डिझाइन भविष्यातील प्रीमियम बाइकची दिशा दाखवते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 04, 2026 | 01:52 PM
Hero Scrambler Concept EICMA 2026 मध्ये सादर! Dakar Rally स्टाइलसह प्रीमियम बाइकची झलक
Follow Us
Follow Us:
  • हिरो मोटोकॉर्पने EICMA 2026 मध्ये Dakar Rally पासून प्रेरणा घेतलेली Scrambler Concept बाइक सादर केली आहे.
  • या कॉन्सेप्टमध्ये गोल हेडलॅम्प, लाल फ्युल टँक, गोल्ड वायर-स्पोक व्हील्स आणि ब्लॉक-पॅटर्न टायर्स आहेत.
  • कंपनीने इंजिन कॅपसिटी, प्रोडक्शन प्लॅन आणि भारतातील लाँचबाबत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

हिरो मोटोकॉर्पने EICMA 2026 मध्ये आपली नवीन Hero Scrambler Concept बाइक सादर केली आहे. Dakar Rally मधून प्रेरणा घेतलेली ही प्रीमियम स्क्रॅम्बलर बाइक रेट्रो डिझाइन आणि अ‍ॅडव्हेंचर स्टाइलचा मिलाफ दाखवते. कंपनीने या कॉन्सेप्टच्या माध्यमातून भविष्यातील नव्या मोटरसायकलची झलक दिली आहे. विशेष म्हणजे, हिरो मोटोकॉर्पने सलग 25 वर्षे जगातील सर्वात मोठी टू-व्हीलर उत्पादक कंपनी म्हणून आपले स्थान कायम ठेवल्याच्या निमित्ताने मिलानमधील या प्रदर्शनात ही बाइक सादर केली.

डिझाइनच्या बाबतीत Hero Scrambler Concept मध्ये गोलाकार हेडलॅम्प देण्यात आला आहे. त्यामध्ये H-आकाराची लाइट सिग्नेचर पाहायला मिळते. हेडलॅम्पच्या वर छोटा स्मोक्ड फ्लायस्क्रीन आणि हँडलबारच्या दोन्ही बाजूंना लाल हँड गार्ड्स आहेत. पुढील बाजूला उंच लाल मडगार्ड, फोर्क गार्ड्स आणि गोल्ड फिनिश वायर-स्पोक व्हील्स देण्यात आले आहेत. ब्लॉक-पॅटर्न टायर्समुळे ही बाइक खराब रस्त्यांवर चालवण्यासाठी तयार केल्यासारखी दिसते.

2026 बजाज पल्सर NS200 लाँच! आता मिळणार जास्त पॉवर आणि प्रीमियम फीचर्स! पाहा डिटेल्स

बाइकच्या फ्युल टँकवर लाल रंगाचे साइड पॅनल, स्ट्राइप ग्राफिक्स आणि काळ्या रंगाचा वरचा भाग देण्यात आला आहे. टँकच्या वर मेटल युटिलिटी रॅकही दिसतो. रायडरसमोर फ्लायस्क्रीनच्या मागे गोलाकार डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आले आहे. त्यामुळे रेट्रो लूक कायम ठेवत आधुनिक फीचर्सचा वापर करण्यात आला आहे.

साइड प्रोफाइलमध्ये ब्लॅक ट्रेलिस फ्रेम, मोठा रेडिएटर आणि इंजिनखाली मेटल प्रोटेक्शन दिसते. तपकिरी रंगाची रिब्ड सीट, सिल्व्हर साइड पॅनल आणि गोल्ड वायर-स्पोक व्हील्स बाइकला वेगळा लूक देतात. मागील बाजूला उंच टेल सेक्शन, गोलाकार टेललॅम्प आणि कॉम्पॅक्ट मडगार्ड आहे. उजव्या बाजूला मोठा एक्झॉस्टही देण्यात आला आहे.

EICMA 2026 मध्ये होंडाचा मोठा धमाका! 2027 Africa Twin, Fireblade सह अनेक नव्या बाइक्स सादर

हिरोच्या Hero MotoSports Team Rally आणि Dakar स्पर्धांमधील अनुभवातून या कॉन्सेप्टची प्रेरणा घेण्यात आली आहे. पण कंपनीने इंजिन कॅपसिटी, गिअरबॉक्स, सस्पेन्शन, ब्रेकिंग सिस्टीम किंवा इलेक्ट्रॉनिक फीचर्सबाबत माहिती दिलेली नाही. या बाइकच्या प्रोडक्शनबाबत किंवा भारतातील लाँचच्या तारखेबाबतही घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या ही संकल्पना भविष्यातील प्रीमियम स्क्रॅम्बलरची डिझाइन दिशा दाखवते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Hero Scrambler Concept बाइक कुठे सादर करण्यात आली?

    Ans: हिरो मोटोकॉर्पने ही बाइक इटलीतील मिलान येथे आयोजित EICMA 2026 मोटरसायकल प्रदर्शनात सादर केली आहे.

  • Que: Hero Scrambler Concept मध्ये कोणते खास फीचर्स आहेत?

    Ans: या कॉन्सेप्टमध्ये गोलाकार H-सिग्नेचर हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, लाल हँड गार्ड्स, वायर-स्पोक व्हील्स, ब्लॉक-पॅटर्न टायर्स आणि मेटल युटिलिटी रॅक देण्यात आले आहेत.

  • Que: Hero Scrambler Concept भारतात लाँच होणार आहे का?

    Ans: कंपनीने या बाइकच्या प्रोडक्शन किंवा भारतातील लाँचबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. सध्या ही केवळ भविष्यातील मोटरसायकलची दिशा दाखवणारी कॉन्सेप्ट बाइक आहे.

Web Title: Hero scrambler concept unveiled at eicma 2026 auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • two wheelers

संबंधित बातम्या

अल्ट्राव्हायोलेट X-47 Venom इलेक्ट्रिक बाइक युरोपमध्ये लाँच! 343 km रेंज अन् 155 kmph टॉप स्पीड
1

अल्ट्राव्हायोलेट X-47 Venom इलेक्ट्रिक बाइक युरोपमध्ये लाँच! 343 km रेंज अन् 155 kmph टॉप स्पीड

EICMA 2026 मध्ये होंडाचा मोठा धमाका! 2027 Africa Twin, Fireblade सह अनेक नव्या बाइक्स सादर
2

EICMA 2026 मध्ये होंडाचा मोठा धमाका! 2027 Africa Twin, Fireblade सह अनेक नव्या बाइक्स सादर

e-SPRINTO चा देशभरात डीलर नेटवर्क विस्ताराचा प्लॅन! २०२८ पर्यंत २०० हून जास्त डीलर्स जोडणार; पाहा डिटेल्स
3

e-SPRINTO चा देशभरात डीलर नेटवर्क विस्ताराचा प्लॅन! २०२८ पर्यंत २०० हून जास्त डीलर्स जोडणार; पाहा डिटेल्स

Diwali Offer : काय सांगता? टेस्ट राइड घेऊन मोटरसायकल जिंकण्याची सुवर्णसंधी! Jawa Yezdi च्या दिवाळी फेस्टिव्हलचे आकर्षक ऑफर
4

Diwali Offer : काय सांगता? टेस्ट राइड घेऊन मोटरसायकल जिंकण्याची सुवर्णसंधी! Jawa Yezdi च्या दिवाळी फेस्टिव्हलचे आकर्षक ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.