
मोटरसायकल मार्केटमध्ये आपलीएक वेगळीच अशी ओळख असलेल्या होंडाने EICMA 2026 मध्ये 2027 मॉडेल वर्षासाठी नव्या बाइक्स आणि कॉन्सेप्ट मॉडेल्सची मोठी लिस्ट सादर केली आहे. इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या या मोटरसायकल शोमध्ये नवीन CRF1150L Africa Twin आणि CBR1000RR-R Fireblade यांचा ग्लोबल डेब्यू झाला. याशिवाय V3R 900 E-Compressor, CBR500R FOUR आणि इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट मॉडेल्सनीही सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या प्रदर्शनातील सर्वात महत्त्वाच्या बाइक्सपैकी एक म्हणजे नवीन होंडा CRF1150L Africa Twin. या मॉडेलमध्ये इंजिन डिस्प्लेसमेंट वाढवण्यात आले असून वजन कमी करण्यासाठीही बदल करण्यात आले आहेत. आता या सीरिजमध्ये Africa Twin, Africa Twin Adventure Sports आणि नवीन Africa Twin Enduro Sports यांचा समावेश आहे. फ्युल टँकचा थोडा भाग सीटखाली ठेवण्यात आला आहे. यामुळे बाइकचे सेंटरपोइंट खाली ठेवण्यास मदत होते. Adventure Sports व्हेरिएंटमध्ये होंडाची नवीन Sensing Ride असिस्टन्स सिस्टीमही देण्यात आली आहे.
भारतात होंडाचा मार्केट शेअर 7% वरून फक्त 1.3% वर! विक्रीत मोठी घसरण, आता SUV आणि EV वर कंपनीचा फोकस
होंडाची V3R 900 E-Compressor ही या शोमधील आणखी एक खास बाइक आहे. या मॉडेलमध्ये V-आकाराचे 3-सिलेंडर इंजिन आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंट्रोल होणारा कॉम्प्रेसर देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, मोटरसायकलसाठी अशा प्रकारचा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड कॉम्प्रेसर जगात पहिल्यांदाच वापरण्यात येत आहे. या बाइकचे प्रोडक्शन व्हर्जन तयार करण्याच्या दिशेने कंपनी पुढे जात आहे.
CBR1000RR-R Fireblade मध्येही 2027 साठी मोठे बदल करण्यात आले आहेत. या बाइकचे जवळपास 75 टक्के पार्ट्स नव्याने विकसित केले आहेत. नवीन अॅल्युमिनियम फ्रेम, स्विंगआर्म आणि इंजिनमधील 2-स्टेज व्हेरिएबल लेंथ इनटेक फनेल सिस्टीम हे त्यातील महत्त्वाचे चेंजेस आहेत. या सीरिजमध्ये Fireblade, Fireblade SP आणि नवीन Fireblade HRC Works Edition सादर करण्यात आले आहेत.
याशिवाय CBR500R FOUR मध्ये 4-सिलेंडर इंजिन आणि Honda E-Clutch देण्यात आले आहे. Adv 125 मध्ये 125cc eSP+ इंजिन, 5-इंच TFT स्क्रीन आणि RoadSync कनेक्टिव्हिटी मिळते. RN0 इलेक्ट्रिक असिस्ट माउंटन बाईक, EV Outlier इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट आणि Onitsuka Tiger Honda Mid Sports Concept देखील प्रदर्शनात दाखवण्यात आले. होंडाचे हे प्रदर्शन 8 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यातील काही मॉडेल्स भविष्यात भारतीय मार्केटमध्ये येण्याची शक्यता असली, तरी भारतातील लाँचबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही.
Ans: होंडाने 2027 Africa Twin, CBR1000RR-R Fireblade, V3R 900 E-Compressor, CBR500R FOUR आणि Adv 125 यांसह अनेक मॉडेल्स सादर केली आहेत.
Ans: नवीन Africa Twin मध्ये इंजिन डिस्प्लेसमेंट वाढवण्यात आले आहे. वजन कमी करण्यात आले असून फ्युल टँकची रचना बदलली आहे. Adventure Sports व्हेरिएंटमध्ये Honda Sensing Ride असिस्टन्स सिस्टीमही मिळते.
Ans: या बाइकमध्ये V-आकाराचे 3-सिलेंडर इंजिन आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नियंत्रित होणारा कॉम्प्रेसर देण्यात आला आहे. होंडाच्या म्हणण्यानुसार, मोटरसायकलसाठी अशा प्रकारची ही जगातील पहिली टेक्नोलॉजी आहे.