
भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी अल्ट्राव्हायोलेटने EICMA 2026 मध्ये आपली नवीन X-47 Venom इलेक्ट्रिक बाइक युरोपियन मार्केटमध्ये लाँच केली आहे. या बाइकची खासियत म्हणजे 343 km ची IDC रेंज, 155 kmph टॉप स्पीड आणि अत्याधुनिक रडार टेक्नोलॉजी. कंपनीच्या दाव्यानुसार, युरोपमध्ये इलेक्ट्रिक मोटरसायकलची रिटेल सेल सुरू करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. याआधी कंपनीने F77 मॉडेल युरोपमध्ये सादर केले होते.
X-47 Venom मध्ये कंपनीचे नवीन VX-100 100V आर्किटेक्चर वापरण्यात आले आहे. याच प्लॅटफॉर्मवर कंपनीची Tesseract मॅक्सी स्कूटरही विकसित करण्यात आली आहे. या बाइकला SRB-11 बॅटरी टेक्नोलॉजी देण्यात आली असून, एका चार्जमध्ये 343 km IDC रेंज मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यातून 40.2 bhp पॉवर आणि 550 Nm व्हील टॉर्क मिळतो. चार्जिंगसाठी 1.6 kW ऑनबोर्ड चार्जर देण्यात आला आहे.
EICMA 2026 मध्ये होंडाचा मोठा धमाका! 2027 Africa Twin, Fireblade सह अनेक नव्या बाइक्स सादर
वेगाच्या बाबतीतही X-47 Venom चांगली कामगिरी करते. ही इलेक्ट्रिक बाइक 0 ते 60 kmph वेग गाठण्यासाठी फक्त 2.7 सेकंद घेते, तर 0 ते 100 kmph वेगासाठी 5.9 सेकंद लागतात. यामध्ये UV LIGHTFURY मोटर वापरण्यात आली आहे. नवीन Soft Magnetic Composite (SMC) टेक्नोलॉजीमुळे मोटरचे वजन कमी करून वेग आणि पॉवर डिलिव्हरी सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
फीचर्सच्या बाबतीत या बाइकला 7-इंच TFT टचस्क्रीन, UV Hypersense Radar, पुढील आणि मागील बाजूस इंटिग्रेटेड डॅशकॅम, पार्क असिस्ट आणि क्रूझ कंट्रोल मिळते. रडार सिस्टीममुळे रायडरला आजूबाजूच्या वाहतुकीबाबत माहिती मिळण्यास मदत होते. बॅटरीसाठी BMS आणि Pyro-fuse सुरक्षा यंत्रणाही देण्यात आली आहे.
ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशनकडून कलाकारांसाठी 60 लाखांचे अनुदान; ‘आर्ट फॉर होप’चा सीझन 6 सुरू
या बाइकचे वजन 180 kg असून, मागच्या जनरेशनच्या प्लॅटफॉर्मपेक्षा ते जवळपास 20 kg कमी आहे. SRB-11 बॅटरीमध्ये 20 टक्क्यांपर्यंत जास्त एनर्जी डेन्सिटी आणि दुप्पट कूलिंग परफॉर्मन्स असल्याचा कंपनीचा दावा आहे. बॅटरी हाउसिंगसाठी कास्ट अॅल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे. नवीन मोटर कंट्रोल युनिटही आधीच्या तुलनेत 2 पट कॉम्पॅक्ट असून 3 पट पॉवर डेन्सिटी देते. भारतात या बाइकची सुरुवातीची किंमत 2.65 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. युरोपमध्ये लाँच झाल्यामुळे भारतीय इलेक्ट्रिक बाइक ब्रँडच्या जागतिक विस्ताराला नवी दिशा मिळाली आहे.
Ans: कंपनीच्या दाव्यानुसार, X-47 Venom इलेक्ट्रिक बाइक एका चार्जमध्ये 343 km IDC रेंज देते.
Ans: या इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड 155 kmph आहे. ही बाइक 0 ते 60 kmph वेग फक्त 2.7 सेकंदांत गाठते.
Ans: भारतात या इलेक्ट्रिक बाइकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 2.65 लाख रुपये आहे. युरोपमध्ये तिचे लाँचिंग EICMA 2026 मध्ये करण्यात आले आहे.