Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

भारतात Hero Splendor चा एक वेगळाच चाहता वर्ग पाह्यला मिळतो. मात्र, अनेकदा या बाईकची तुलना Bajaj Platina सोबत होत असते. मात्र, कोणीत बाईक सर्वाधिक मायलेज देते?

  • By मयुर नवले
Updated On: Mar 04, 2026 | 09:55 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात एकापेक्षा एक मायलेज बाईक
  • Hero Splendor आणि Bajaj Platina ग्राहकांच्या आवडत्या बाईक
  • कोणत्या बाईकचा मायलेज जास्त
भारतीय बाजारात Hero Splendor Plus आणि Bajaj Platina 100 या दोन सर्वाधिक लोकप्रिय आणि किफायतशीर कम्यूटर बाईक्स मानल्या जातात. जर तुम्ही कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणारी बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. चला तर जाणून घेऊया या दोन्ही बाईक्समधील फरक आणि तुमच्या गरजेनुसार कोणती बाईक अधिक योग्य ठरेल.

कोणती बाईक अधिक स्वस्त?

Hero Splendor Plus ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 74,902 रुपयांपासून सुरू होते. तसेच, या बाईकची ऑन-रोड किंमत अंदाजे 87,033 रुपये आहे. तर Bajaj Platina 100 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 66,015 रुपये आहे, जी Splendor Plus पेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे तुमचा बजेट मर्यादित असेल तर Platina 100 हा चांगला पर्याय ठरू शकतो.

पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये

मायलेजच्या बाबतीत कोण पुढे?

Hero Splendor Plus चे कंपनीकडून सांगितलेले मायलेज सुमारे 70 किमी प्रति लिटर आहे. त्याच्या तुलनेत Bajaj Platina 100 चे क्लेम्ड मायलेज 70 ते 75 किमी प्रति लिटर इतके आहे. काही ग्राहकांच्या मते, योग्य वेगात चालवल्यास Platina 100 तुम्हाला 80 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देऊ शकते. त्यामुळे इंधन बचतीच्या बाबतीत Platina 100 थोडी अधिक फायदेशीर ठरते.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Hero Splendor Plus मध्ये i3S इंजिन स्टार्ट-स्टॉप सिस्टम, साइड स्टँड अलर्ट, पासिंग लाइट, हॅलोजन हेडलॅम्प आणि पिलियन ग्रॅबरेल यांसारखे फीचर्स मिळतात. ही बाईक 7 व्हेरिएंट्स आणि 7 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याची सीट हाइट 1052 मिमी असून फ्यूल टँक क्षमता 9.8 लिटर आहे.

तर Bajaj Platina 100 मध्ये राइड कंट्रोल स्विच, लांब आणि आरामदायक सीट आणि हॅलोजन हेडलॅम्प यांसारखी फीचर्स मिळतात. ही बाईक 4 रंग आणि 2 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. Platina ची सीट हाइट 1100 मिमी असून फ्यूल टँक क्षमता 11 लिटर आहे. तसेच या बाईकचे सस्पेन्शन थोडे मऊ असल्यामुळे लांब प्रवास आणि खराब रस्त्यांवर ती अधिक आरामदायक वाटते.

चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक थांबणार नाही! अशी बाईक जी फुल टॅंकवर कापेल 700 किमीपेक्षा जास्त अंतर, किंमत…

तर मग तुम्ही कोणती बाईक खरेदी करावी?

जर तुम्हाला क्लासिक डिझाइन, चांगले मायलेज, मजबूत ब्रँड व्हॅल्यू आणि सर्व्हिस नेटवर्क असलेली बाईक हवी असेल, तर Hero Splendor Plus हा चांगला पर्याय ठरू शकतो. तसेच i3S सारखी आधुनिक टेक्नोलॉजी असल्यामुळे ती अधिक युजर-फ्रेंडली वाटते.

पण जर तुमचा बजेट कमी असेल, जास्त मायलेज हवे असेल, लांब आणि आरामदायक सीटची गरज असेल किंवा तुम्ही रोज लांब अंतराचा प्रवास करत असाल, तर Bajaj Platina 100 तुमच्यासाठी अधिक योग्य पर्याय ठरू शकते.

Web Title: Hero splendor or bajaj platina which bike gives more mileage on 1 liter petrol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 09:55 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Hero Splendor Plus
  • Increase Mileage

संबंधित बातम्या

‘पवनपुत्र पुत्र’ ते सर्वसामान्यांची कार! अशी झाली मारुती कंपनीची स्थापना आणि नावाची निवड
1

‘पवनपुत्र पुत्र’ ते सर्वसामान्यांची कार! अशी झाली मारुती कंपनीची स्थापना आणि नावाची निवड

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार
2

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री
3

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप
4

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.