फोटो सौजन्य: Pinterest
भारतीय बाजारात Maruti Suzuki Fronx ही कार ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ती पूर्ण रक्कम भरूनच घ्यावी लागते असे नाही. तुम्ही ही कार लोनवरही खरेदी करू शकता. त्यामुळे कार घेण्यासाठी किती डाउन पेमेंट करावे लागेल आणि दर महिन्याला EMI किती भरावी लागेल, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
‘ही’ ऑफर हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या ‘या’ कारवर 1 लाख रुपये वाचवण्याची संधी
या कारच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 6.84 लाख रुपये आहे. या किंमतीवर सुमारे 47,943 रुपये RTO शुल्क आणि अंदाजे 37,961 रुपये विमा जोडल्यावर या कारची ऑन-रोड किंमत जवळपास 7.77 लाख रुपये होते. मात्र, शहर आणि डीलरशिपनुसार ही किंमत थोडीफार बदलू शकते.
जर तुम्ही 1 लाख रुपये डाउन पेमेंट भरले, तर तुम्हाला सुमारे 6.76 लाख रुपयांचे कार लोन घ्यावे लागेल. हे कर्ज 9.8 टक्के वार्षिक व्याजदराने पाच वर्षांसाठी घेतल्यास तुमचा दरमहा EMI सुमारे 14,317 रुपये इतकी होऊ शकते.
Maruti Suzuki Fronx ही कार पेट्रोल आणि CNG या दोन्ही इंधन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य पर्याय निवडता येतो. कमी खर्चात जास्त मायलेज हवे असल्यास CNG पर्याय फायदेशीर ठरू शकतो, तर चांगली परफॉर्मन्स आणि स्मूथ ड्रायव्हिंगसाठी पेट्रोल व्हेरिएंट योग्य ठरतो.
या कारमध्ये दोन इंजिन पर्याय दिले आहेत. पहिला 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असून ते 99 बीएचपी पॉवर आणि 147.6 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन जास्त ताकद देत असल्यामुळे हायवे ड्रायव्हिंग, वेग आणि ओव्हरटेकिंग करताना चांगली कामगिरी करते. दुसरा 1.2 लिटर नेचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असून ते 89 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क निर्माण करते.






