फोटो सौजन्य: @VikashSingh0116 (X.com)
भारतीय बाजारात अनेक उत्तम दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट आणि बजेट फ्रेंडली बाईक आणि स्कूटर ऑफर करत असतात. त्यातही मार्केटमध्ये अनेक जण बजेट फ्रेंडली बाईक आणि स्कूटरला जास्त प्राधान्य देत असतात. अशातच आता हिरोने आपल्या नवीन स्कूटरचे नवीन व्हर्जन मार्केटमध्ये लाँच केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय बाजारात हिरो मोटोकॉर्पने त्यांच्या स्पोर्टी 110cc स्कूटर, Hero Xoom 110 चे OBD2B कंप्लेंट व्हर्जन लाँच केले आहे. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 78,067 रुपये आहे. हे स्कूटर अपडेट करण्यासोबतच, स्कूटरचा LX व्हेरिएंट बंद करण्यात आला आहे. तसेच या स्कूटरची किंमत देखील वाढवण्यात आली आहे.
हिरो झूम 110 OBD2B आता भारतीय बाजारात तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या व्हीएक्स व्हेरिएंटची किंमत 78,067 रुपये, ZX व्हेरिएंटची किंमत 83,417 रुपये आणि टॉप-स्पेक कॉम्बॅट एडिशन 84,017 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.
घरादारावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या Osho कडे तब्बल 93 Rolls Royce Cars, एवढा पैसा आला कुठून?
हिरोने Xoom 110 च्या डिझाइनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याची स्पोर्टी स्टाईलिंग पूर्वीसारखीच ठेवण्यात आली आहे. त्याचा VX व्हेरिएंट पर्ल सिल्व्हर व्हाइट, पोलेस्टार ब्लू आणि ब्लॅक रंगांमध्ये देण्यात येत आहे. झेडएक्स व्हेरिएंट स्पोर्ट रेड, पोलेस्टार ब्लू, मॅट अब्राक्स ऑरेंज आणि ब्लॅक कलरमध्ये देण्यात येत आहे. त्याची कॉम्बॅट एडिशन फक्त मॅट शॅडो ग्रे रंगात देण्यात येत आहे.
Hero Xoom 110 मध्ये 110.9cc, एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे. हे इंजिन 8.15 PS पॉवर आणि 8.70 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हे Hero च्या i3S तंत्रज्ञानासह ऑफर केले आहे, जे ट्रॅफिकमध्ये थांबल्यावर इंजिन बंद करून आणि थ्रॉटल वळताच इंजिन रीस्टार्ट करून मायलेज सुधारण्यास मदत करते. त्यामुळे ही स्कूटर फ्युएल एफिशियंट देखील आहे.
दिल्लीत ‘या’ नियमामुळे कवडीमोल भावात विकली गेली Mercedes, कार मालकाची उडाली झोप
Hero Xoom 110 मध्ये समोर टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस शॉक अॅब्सॉर्बर आहे. तिन्ही व्हेरिएंटमध्ये वेगवेगळ्या ब्रेकिंग सिस्टीम आहेत. ZX व्हेरिएंटमध्ये 190mm फ्रंट डिस्क ब्रेक आहे आणि VX व्हेरिएंटमध्ये 130mm फ्रंट ड्रम ब्रेक आहे. त्याच्या सर्व व्हेरिएंटच्या मागील बाजूस ड्रम ब्रेक वापरले गेले आहेत. सर्व व्हेरिएंटमध्ये 12-इंच अलॉय व्हील्स आहेत, ज्यामध्ये समोर 90-सेक्शन टायर्स आणि मागील बाजूस 100-सेक्शन टायर्स आहेत.
या स्कूटरमध्ये अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळतात. यात पूर्ण एलईडी लाइटिंग, यूएसबी चार्जर, बूट लाईट आणि एलसीडी कन्सोल आहे. तसेच, त्याच्या ZX आणि कॉम्बॅट प्रकारांमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.