Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिरो एक्सट्रीम 160R 4V आणि एक्सट्रीम 250R लाँच; क्रूझ कंट्रोलसह मिळणार भन्नाट फीचर्स!

हिरो एक्सट्रीम 160R 4V मध्ये 163 सीसी इंजिन, 17.1 PS पॉवर आणि 3 रायडिंग मोड्स मिळतात. रिफ्रेश्ड एक्सट्रीम 250R मध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, क्विकशिफ्टर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिमसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. दोन्ही बाइक्स हिरोच्या प्रीमियम मोटरसायकल पोर्टफोलिओचा भाग आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 17, 2026 | 02:28 PM
हिरो एक्सट्रीम 160R 4V आणि एक्सट्रीम 250R लाँच; क्रूझ कंट्रोलसह मिळणार भन्नाट फीचर्स!
Follow Us
Follow Us:
  • हिरो एक्सट्रीम 160R 4V मध्ये 163 सीसी इंजिन असून 17.1 PS पॉवर आणि क्रूझ कंट्रोल मिळते.
  • एक्सट्रीम 250R मध्ये 4 रायडिंग मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल, क्विकशिफ्टर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम मिळते.
  • दोन्ही मोटरसायकलींमध्ये आक्रमक डिझाइन आणि रायडिंगचा अनुभव सुधारण्यासाठी आधुनिक टेक्नोलॉजीवर भर देण्यात आला आहे.

हिरो मोटोकॉर्प या जगातील दुचाकी आणि स्कूटर्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने ऑल-न्यू एक्सट्रीम १६०आर ४व्ही आणि रिफ्रेश्ड एक्सट्रीम २५०आर लाँच करत आपल्या प्रीमियम श्रेणीच्या विस्तार योजनेला अधिक गती दिली आहे. या दोन्ही मोटरसायकलींचे लाँच कंपनीच्या प्रीमियम पोर्टफोलिओला अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. दोन प्रमुख सेगमेंट्समध्ये अधिक आक्रमक स्ट्रीटफायटर स्टाइल, शक्तिशाली कार्यक्षमता आणि रायडर-केंद्रित प्रगत तंत्रज्ञानाचे संयोजन साधण्यात आले आहे.

ऑल-न्यू एक्सट्रीम १६०आर ४व्ही संपूर्ण नवीन डिझाइन आणि अद्ययावत तंत्रज्ञानासह एक्सट्रीम कुटुंबाची लोकप्रियता वाढवते, तर दुसरीकडे रिफ्रेश्ड एक्सट्रीम २५०आर अत्याधुनिक वैशिष्ट्ये, अधिक सुबक फिनिशिंग आणि रायडिंगमधील वैविध्यततेसह स्वतःची परफॉर्मन्स ओळख अधिक दृढ करते. या दोन्ही मोटरसायकल्स ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करणारी, तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने देण्याच्या आणि प्रीमियम सेगमेंटमधील आपला प्रवास अधिक गतिमान करण्याच्या हिरो मोटोकॉर्पच्या कटिबद्धतेला अधोरेखित करतात.

या लाँचप्रसंगी मत व्यक्त करत हिरो मोटोकॉर्पच्या प्रीमियम सेगमेंटचे चीफ बिझनेस ऑफिसर अनुज दुआ म्हणाले, “प्रीमियम श्रेणीचा विस्तार आमच्या पुढील वाटचालीतील सर्वात मोठी विकासाची संधी आहे. उत्पादनातील वेगळेपण आणि उत्तम रायडिंग अनुभवासह आम्ही या सेगमेंटमधील आमचे स्थान सातत्याने दृढ करत आहोत. एक्सट्रीम फॅमिली हा आमच्या या धोरणाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

ऑल-न्यू एक्सट्रीम १६०आर ४व्ही तिच्या सेगमेंटमधील सर्वात वेगवान मोटरसायकल आहे. तसेच संपूर्ण नवीन डिझाइन, या सेगमेंटमध्ये प्रथमच दिलेले क्रूझ कंट्रोल आणि पॅनिक ब्रेक अलर्ट यांसारख्या वैशिष्ट्यांसह ही मोटरसायकल तरुण रायडर्सपर्यंत एक्सट्रीमची विशिष्टता पोहोचवते. तर दुसरीकडे, नवीन लाँच करण्यात आलेली एक्सट्रीम २५०आर राइड-बाय-वायर, चार राइड मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल, क्विकशिफ्टर, सेगमेंट-फर्स्ट क्रूझ कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील पहिल्या फ्रिक्वेन्सी सिलेक्टिव्ह डॅम्पिंग सस्पेंशनसह आपल्या सेगमेंटमधील दर्जा आणखी उंचावते. आमच्या १३० पेक्षा जास्त हिरो प्रीमिया स्टोअर्सच्या प्रबळ नेटवर्कच्या माध्यमातून ही उत्पादने जागतिक दर्जाची आणि ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करणारी उत्पादने तयार करण्याची आमची कटिबद्धता सिद्ध करतात.”

2026 हिरो एक्स्ट्रीम 160R 4V उद्या होणार लाँच! नवीन फीचर्ससह लूक बदलणार, इंजिन तेच राहणार

ऑल-न्यू एक्सट्रीम १६०आर ४व्ही

२०२३ मधील पदार्पणापासून एक्सट्रीम १६०आर ४व्ही हिरो मोटोकॉर्पच्या प्रीमियम मोटरसायकल पोर्टफोलिओचा महत्त्वाचा आधारस्तंभ राहिली आहे. हे ऑल-न्यू मॉडेल आतापर्यंतचा तिचा सर्वात मोठा आणि परिपूर्ण कायापालट आहे: एक्सट्रीम कुटुंबाचा खराखुरा डीएनए जपणारे संपूर्ण नवीन डिझाइन, या सेगमेंटमधील सर्वोत्तम परफॉर्मन्स आणि अनेक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा यात समावेश आहे. एक स्पोर्टी नेकेड मोटरसायकल म्हणून विकसित करण्यात आलेली ही ऑल-न्यू एक्सट्रीम १६०आर ४व्ही अधिक तरुण, मस्क्युलर आणि आक्रमक लूकसह येते, जिला मोठ्या बाइकसारखा दमदार रोड प्रेझेन्स देण्यात आला असून, ज्या रायडर्सना आपल्या बाइककडून रोमांच, वेगळेपण आणि तंत्रज्ञानाची अपेक्षा असते त्यांच्यासाठी ही खास डिझाइन करण्यात आली आहे.

एक्सट्रीम डीएनए, अधिक आक्रमक लूक, ऑल-न्यू एक्सट्रीम १६०आर ४व्ही सायबरशार्प

या आक्रमक डिझाइन लँग्वेजसह येते. यामध्ये अधिक टोकदार टँक श्राउड्स, मस्क्युलर बॉडी आणि रस्त्यावरील प्रबळ उपस्थितीसाठी नव्याने डिझाइन केलेले बॉडीवर्क देण्यात आले आहे. रायडरच्या आरामाचा विचार करून डिझाइन केलेली फ्युएल टँक पायाची (गुडघ्याची) ग्रीप अधिक दृढ करते, तसेच जमिनीवर पाय टेकणेही सहज शक्य करते. यातील प्रगत लाइटिंग पॅकेजमध्ये अॅम्बियंट लाइट सेन्सरसह ऑटो-इल्यूमिनेटिंग क्लास डी फुल-एलईडी हेडलॅम्प, प्रोजेक्टर हाय बीम आणि सिग्नेचर ‘एच’ आकाराचे डीआरएल दिले आहेत, ज्याला पूरक ‘एच’ आकाराचा एलईडी टेल लॅम्प आणि फुल-एलईडी विंकर्सही मिळतात. तसेच लाल आणि काळ्या रंगातील फ्रंट व्हील रिमचे पर्याय रायडरला आवडीनुसार निवड करण्याची सुविधा देतात.

आपल्या सेगमेंटमधील सर्वात वेगवान

ऑल-न्यू एक्सट्रीम १६०आर ४व्ही मध्ये हिरो मोटोकॉर्पचे १६३ सीसी क्षमतेचे, ४-व्हॉल्व्ह, ऑइल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे ८,७५० आरपीएमला १७.१ पीएस कमाल पॉवर आणि ६,५०० आरपीएमला १४.६ एनएम पीक टॉर्क निर्माण करते. याचे शॉर्ट-स्ट्रोक डिझाइन इंजिनला वेगाने रेव्ह करून उच्च पॉवर मिळवून देते, तर फिन्ड ऑइल कुलर लांबच्या वेगवान प्रवासातही इंजिनचे तापमान संतुलित ठेवते. यामुळे ही आपल्या सेगमेंटमधील सर्वात वेगवान मोटरसायकल ठरली आहे, जी फक्त ४.४ सेकंदांत ० ते ६० किमी/तास इतका वेग गाठू शकते. तसेच ही मोटरसायकल या सेगमेंटमध्ये मागील चाकापर्यंत सर्वाधिक पॉवर पोहोचवणारी बाइक ठरते. याशिवाय, ६,००० किमीपर्यंत ऑइल बदलण्याची किंवा टॅपेट सेटिंग करण्याची अजिबात गरज भासत नसल्याने या मोटरसायकलची देखभाल आणि वापरही अधिक सुलभ बनतो.

राइड-बाय-वायर, राइड मोड्स आणि सेगमेंटमधील पहिले क्रूझ कंट्रोल

इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल कंट्रोल (राइड-बाय-वायर) अचूक, सुरळीत आणि अंदाज घेता येईल असा थ्रॉटल रिस्पॉन्स देते, तसेच याद्वारे तीन राइड मोड्स मिळतात. घसरड्या रस्त्यांसाठी रेन मोड अधिक सौम्य थ्रॉटल रिस्पॉन्स देतो, रोड मोड दैनंदिन प्रवासासाठी संतुलित पॉवर देतो, तर स्पोर्ट मोड थेट आणि आक्रमक थ्रॉटल रिस्पॉन्ससह या मोटरसायकलची खरी ताकद दाखवून देतो. एक्सट्रीम १६०आर ४व्ही तिच्या सेगमेंटमधील पहिली मोटरसायकल आहे, जी क्रूझ कंट्रोलची सुविधा देते, ज्यामुळे रोजचा आणि लांब पल्ल्याचा प्रवास अगदी सहज होतो.

प्रत्येक राइडमध्ये आत्मविश्वास

सर्व प्रकारच्या रस्त्यांवर ब्रेकिंगची स्थिरता आणि वेग नियंत्रणाचा उत्तम समतोल साधण्यासाठी ड्युअल-चॅनेल एबीएस देण्यात आले आहे, जे पुढील २७६ मिमी आणि मागील २२० मिमी पेटल डिस्क ब्रेक्ससह उत्तम काम करते. अचानक जोरदार ब्रेक लावल्यास आजूबाजूच्या वाहनांना सतर्क करून सुरक्षितता वाढवणारे पॅनिक ब्रेक अलर्ट या सेगमेंटमधील पहिले वैशिष्ट्य देखील या मोटरसायकलमध्ये सादर करण्यात आले आहे. सस्पेंशनसाठी पुढील बाजूस ३७ मिमीचे केवायबी अपसाइड-डाउन फोर्क्स आणि मागील बाजूस ७-स्टेप प्रीलोड-अॅडजस्टेबल मोनोशॉक दिले आहेत, जे आरामदायी आणि स्थिर प्रवासाची खात्री देतात. रुंद १३०/७० आर१७ मागील टायर्ससह रेडिअल ट्यूबलेस टायर्स वळणावर उत्कृष्ट ग्रीप आणि सुरक्षिततेचा विश्वास देतात.

Hero MotoCorp ची सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी; 7.66 लाख टू-व्हीलर्सची विक्री

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: हिरो एक्सट्रीम 160R 4V मध्ये कोणते इंजिन मिळते?

उत्तर: या बाइकमध्ये 163 सीसी, 4-व्हॉल्व्ह, ऑइल-कूल्ड इंजिन मिळते. ते 8,750 rpm वर 17.1 PS पॉवर आणि 6,500 rpm वर 14.6 Nm टॉर्क निर्माण करते.

प्रश्न 2: हिरो एक्सट्रीम 160R 4V मध्ये कोणते रायडिंग मोड्स आहेत?

उत्तर: या बाइकला रेन, रोड आणि स्पोर्ट असे 3 रायडिंग मोड्स मिळतात. त्यानुसार थ्रॉटल रिस्पॉन्स आणि बाइकच्या पॉवर डिलिव्हरीमध्ये बदल होतो.

प्रश्न 3: हिरो एक्सट्रीम 250R मध्ये कोणती प्रमुख फीचर्स आहेत?

उत्तर: रिफ्रेश्ड एक्सट्रीम 250R मध्ये राइड-बाय-वायर, 4 रायडिंग मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल, क्विकशिफ्टर, क्रूझ कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम देण्यात आली आहे.

Web Title: Hero xtreme 160r 4v 250r launch features auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Hero MotoCorp

संबंधित बातम्या

नवी रेनॉल्ट डस्टर हायब्रिड लॉन्च! तब्बल २९ किमी मायलेजसह किंमत १६.९९ लाखांपासून सुरू
1

नवी रेनॉल्ट डस्टर हायब्रिड लॉन्च! तब्बल २९ किमी मायलेजसह किंमत १६.९९ लाखांपासून सुरू

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!
2

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती
3

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या
4

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.