
भारतातील सेडान कार सेगमेंटमध्ये सप्टेंबर 2026 मध्ये चांगली वाढ नोंदवण्यात आली. या महिन्यात एकूण 35,119 सेडान कारची विक्री झाली, जी सप्टेंबर 2025 मधील 33,346 युनिट्सच्या तुलनेत 5.3% जास्त आहे. पण या वाढीचा फायदा सर्वच कारना झाला नाही. काही मॉडेल्सच्या विक्रीत मोठी वाढ झाली, तर काही लोकप्रिय सेडान कारची मागणी घटली. या संपूर्ण मार्केटमध्ये मारुती सुझुकी डिझायरने आपले पहिले स्थान कायम राखले.
मारुती डिझायरची एकहाती आघाडी
मारुती सुझुकी डिझायरने सप्टेंबर 2026 मध्ये 17,754 युनिट्सची विक्री केली. मागच्या वर्षी याच महिन्यात 20,038 युनिट्सची विक्री झाली होती. त्यामुळे डिझायरच्या विक्रीत 11.4% घट झाली असली, तरी टॉप 10 सेडान कारच्या एकूण विक्रीमध्ये तिचा वाटा तब्बल 50.6% राहिला. विशेष म्हणजे, डिझायरची विक्री इतर 9 मॉडेल्सच्या एकत्रित विक्रीपेक्षाही जास्त होती.
दुसऱ्या क्रमांकावर ह्युंदाई ऑरा राहिली. या कारच्या विक्रीत 39.8% वाढ होऊन 7,530 युनिट्सची नोंद झाली. होंडा अमेझनेही चांगली कामगिरी करत 25.9% वाढीसह 3,286 युनिट्सची विक्री केली. या 3 कॉम्पॅक्ट सेडान कारनी मिळून टॉप 10 मॉडेल्सच्या एकूण विक्रीपैकी 81% पेक्षा जास्त वाटा मिळवला.
BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती
टाटा एरिसची एंट्री; मिडसाइज सेडानची घसरण
टाटा एरिसने 2,406 युनिट्सच्या विक्रीसह चौथे स्थान मिळवले. या नव्या मॉडेलच्या विक्रीमुळे सेडान सेगमेंटची एकूण वाढ सकारात्मक राहण्यास मदत झाली. एरिसला वगळल्यास उर्वरित 9 मॉडेल्सची एकत्रित विक्री 32,713 युनिट्स होती, जी मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे.
फोक्सवॅगन व्हर्टसने 1,172 युनिट्ससह मिडसाइज सेडानमध्ये आघाडी घेतली, पण तिची विक्री 28.9% घटली. ह्युंदाई व्हर्नाची विक्री 762 युनिट्स आणि होंडा सिटीची 574 युनिट्स होती. दुसरीकडे, स्कोडा स्लाव्हियाच्या विक्रीत सर्वाधिक 47.1% घट होऊन 709 युनिट्सची नोंद झाली. टाटा टिगोरची विक्रीही 29% घटून 686 युनिट्सवर आली.
टोयोटा कॅम्रीच्या विक्रीत मोठी वाढ
प्रीमियम सेडान सेगमेंटमध्ये टोयोटा कॅम्रीने 240 युनिट्सची विक्री केली. तिच्या विक्रीत 75.2% वाढ झाली. टक्केवारीनुसार ही टॉप 10 मधील सर्वाधिक वाढ होती, पण प्रत्यक्ष विक्रीचे प्रमाण तुलनेने कमी राहिले.
सप्टेंबरमधील आकडेवारी स्पष्ट करते की भारतीय मार्केटमध्ये परवडणाऱ्या कॉम्पॅक्ट सेडानना अजूनही मोठी पसंती मिळत आहे. दुसरीकडे, मिडसाइज सेडानना विक्री टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे आगामी काळात कंपन्यांसाठी किंमत, फीचर्स आणि कस्टमरच्या बदलत्या पसंती महत्त्वाच्या ठरणार आहेत.
रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या
💡 Frequently Asked Questions
प्रश्न 1: सप्टेंबर 2026 मध्ये भारतातील सर्वाधिक विकली गेलेली सेडान कार कोणती?
उत्तर: मारुती सुझुकी डिझायर ही सप्टेंबर 2026 मधील सर्वाधिक विकली गेलेली सेडान कार ठरली. तिच्या 17,754 युनिट्सची विक्री झाली.
प्रश्न 2: सप्टेंबर 2026 मध्ये कोणत्या सेडानच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाली?
उत्तर: टॉप 10 मधील तुलनात्मक वार्षिक आकडेवारीनुसार टोयोटा कॅम्रीने सर्वाधिक 75.2% वाढ नोंदवली. तिची एकूण विक्री 240 युनिट्स होती.
प्रश्न 3: सप्टेंबर 2026 मध्ये कोणत्या सेडान कारच्या विक्रीत सर्वाधिक घट झाली?
उत्तर: स्कोडा स्लाव्हियाच्या विक्रीत सर्वाधिक 47.1% घट झाली. सप्टेंबर 2026 मध्ये या कारच्या 709 युनिट्सची विक्री झाली.