Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 अ‍ॅडव्हेंचर बाइकच्या टेस्टिंगमधून अनेक महत्त्वाचे तपशील समोर येत आहेत. 750 सीसी ट्विन-सिलिंडर इंजिन, पुढे ड्युअल डिस्क ब्रेक आणि आधुनिक टूरिंग फीचर्समुळे ही बाइक चर्चेत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 16, 2026 | 08:47 PM
रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • हिमालयन 750 मध्ये अंदाजे 750 सीसी ट्विन-सिलिंडर इंजिन मिळण्याची शक्यता आहे.
  • पुढील ड्युअल डिस्क ब्रेक आणि अपसाइड-डाउन फोर्क्समुळे बाइकच्या हार्डवेअरमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत.
  • भारतात या अ‍ॅडव्हेंचर बाइकची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 4 लाख ते 4.5 लाख रुपये असू शकते.

अ‍ॅडव्हेंचर बाइकप्रेमींसाठी रॉयल एनफिल्ड एक मोठी मोटरसायकल आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीची मोस्ट अवेटेड रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 ही सध्याच्या हिमालयन 450 पेक्षा जास्त शक्तिशाली आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी चांगली उपयोगी ठरण्याची शक्यता आहे. या नव्या मॉडेलचे प्रोटोटाइप सादर करण्यात आले असून, टेस्टिंगदरम्यान दिसलेल्या मोटरसायकलींमध्ये इंजिन, सस्पेन्शन आणि ब्रेकिंग सिस्टिममध्ये महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत. ही बाइक सध्या अवेलेबल असलेल्या हिमालयन 450 च्या वरच्या सेगमेंटमध्ये प्लेस मिळवू शकते.

750 सीसी ट्विन-सिलिंडर इंजिनची ताकद

हिमालयन 750 मध्ये रॉयल एनफिल्डच्या विद्यमान 648 सीसी पॅरलल-ट्विन इंजिन आर्किटेक्चरवर आधारित, जवळपास 750 सीसीचे मोठे इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हे इंजिन 55 ते 60 एचपी पॉवर आणि 60 ते 65 एनएम टॉर्क जनरेट करू शकते. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिपर-असिस्ट क्लच मिळण्याची शक्यता आहे. हे आकडे अद्याप अपेक्षित आहेत; कंपनीने अंतिम इंजिन स्पेसिफिकेशन्स ऑफीशली जाहीर केलेले नाहीत. मोठ्या इंजिनमुळे हायवेवर लांब पल्ल्याचा प्रवास आणि सामानासह टूरिंग करताना ही बाइक उपयुक्त ठरू शकते.

सस्पेन्शन आणि ब्रेकिंगमध्ये मोठे बदल

या बाइकच्या टेस्ट मॉडेलमध्ये शोवा कंपनीचे अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स आणि लिंकेज-टाइप रिअर मोनोशॉक दिसले आहेत. मागच्या सस्पेन्शनसाठी रिमोट प्रीलोड अ‍ॅडजस्टरही मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायडर, पिलियन किंवा अतिरिक्त सामानानुसार सस्पेन्शनमध्ये बदल करणे सोपे होऊ शकते. ब्रेकिंगसाठी पुढे 2 डिस्क ब्रेक दिले जाण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या हिमालयन 450 मध्ये पुढे सिंगल डिस्क असल्याने हा महत्त्वाचा बदल ठरू शकतो. बाइकला पुढे 19-इंच आणि मागे 17-इंच चाकांचा सेटअप मिळण्याची शक्यता आहे.

रंग बदलणारी रॉयल एनफिल्ड आली राव! क्लासिक 650 चे फक्त 125 युनिट्स; किंमत पाहून व्हाल थक्क!

लांब प्रवासासाठी आधुनिक फीचर्स

हिमालयन 750 मध्ये मोठी फ्रंट फेअरिंग, उंच विंडस्क्रीन, नव्या डिझाइनचा फ्युल टँक आणि सामान बसवण्यासाठी माउंटिंग पॉइंट्स मिळू शकतात. याशिवाय, फुल-कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कनेक्टेड नेव्हिगेशन, क्रूझ कंट्रोल, राइड-बाय-वायर टेक्नोलॉजी आणि रायडिंग मोड्स यांसारखी फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, या सुविधांची अंतिम यादी अद्याप जाहीर झालेली नाही.

किंमत आणि लाँच कधी होणार?

भारतात या बाइकची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 4 लाख ते 4.5 लाख रुपये असू शकते. हिमालयन 750 चे ग्लोबल डेब्यू EICMA 2026 मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर भारतासह इतर मार्केटमध्ये तिची एन्ट्री होऊ शकते. ऑफीशल किंमत, लाँचची तारीख आणि फीचर्सची माहिती कंपनीकडून मिळाल्यानंतरच स्पष्ट होईल.

टेस्लाची उडणारी कार पाहून जग थक्क! इलॉन मस्कच्या ‘रोडस्टर’ फ्लाइंग कारचा जलवा! १ सेकंदात गाठणार १०० किलोमीटर

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 भारतात कधी लाँच होणार आहे?

उत्तर: अद्याप अधिकृत लाँच तारीख जाहीर झालेली नाही. या बाइकचे जागतिक पदार्पण EICMA 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे.

प्रश्न 2: हिमालयन 750 ची संभाव्य किंमत किती असेल?

उत्तर: उपलब्ध अंदाजानुसार, या बाइकची एक्स-शोरूम किंमत 4 लाख ते 4.5 लाख रुपये असू शकते. अंतिम किंमत कंपनीच्या घोषणेनंतर स्पष्ट होईल.

प्रश्न 3: हिमालयन 750 मध्ये कोणते इंजिन आणि फीचर्स मिळतील?

उत्तर: यात जवळपास 750 सीसी ट्विन-सिलिंडर इंजिन, 6-स्पीड गिअरबॉक्स, पुढे ड्युअल डिस्क ब्रेक, टीएफटी डिस्प्ले आणि क्रूझ कंट्रोल मिळण्याची शक्यता आहे. ही वैशिष्ट्ये अद्याप अपेक्षित असून अंतिम माहिती जाहीर झालेली नाही.

Web Title: Royal enfield himalayan 750 launch price engine features auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield

संबंधित बातम्या

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक
1

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक

रंग बदलणारी रॉयल एनफिल्ड आली राव! क्लासिक 650 चे फक्त 125 युनिट्स; किंमत पाहून व्हाल थक्क!
2

रंग बदलणारी रॉयल एनफिल्ड आली राव! क्लासिक 650 चे फक्त 125 युनिट्स; किंमत पाहून व्हाल थक्क!

142 किमी रेंज, 30+ स्मार्ट फीचर्स आणि 5 वर्षांची बॅटरी वॉरंटी! अँपिअर मॅग्नस जीमॅक्स इलेक्ट्रिक स्कूटर लाँच
3

142 किमी रेंज, 30+ स्मार्ट फीचर्स आणि 5 वर्षांची बॅटरी वॉरंटी! अँपिअर मॅग्नस जीमॅक्स इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

महिंद्रा’ने बाजारात आणली ‘XUV 3XO CNG’! ड्रायव्हिंगचा भरपूर आनंद आणि ‘महिंद्रा’ची खास ओळख; किंमत ९.९९ लाख रुपयांपासून
4

महिंद्रा’ने बाजारात आणली ‘XUV 3XO CNG’! ड्रायव्हिंगचा भरपूर आनंद आणि ‘महिंद्रा’ची खास ओळख; किंमत ९.९९ लाख रुपयांपासून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.