Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माहितीय का तुम्हाला? वाहनांच्या ‘हॉर्न’चा शोध लावला होता थॉमस एडिसन यांच्या साथीदाराने! जाणून घ्या

१९०८ मध्ये मिलर रीस हचिसन यांनी लावलेल्या इलेक्ट्रॉनिक हॉर्नच्या शोधापासून ते आजच्या आधुनिक प्रेशर हॉर्नपर्यंतचा वाहनांच्या हॉर्नचा इतिहास अत्यंत रंजक आहे. बदलत्या काळासोबत सुरक्षेसाठी हॉर्नचे स्वरूप बदलले असले, तरी वाढते ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी आता योग्य डेसिबलच्या हॉर्नचा मर्यादित वापर करणे गरजेचे बनले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 04, 2026 | 10:49 PM
माहितीय का तुम्हाला? वाहनांच्या ‘हॉर्न’चा शोध लावला होता थॉमस एडिसन यांच्या साथीदाराने! जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

वाहन उद्योग हा खूप व्यापक आहे. अगदी प्रत्येक वाहन आणि त्याचा प्रत्येक पार्ट ऑटोमोबाईल क्षेताला अजून संपन्न बनवतो. आपल्या गाडीचा हॉर्न हा असाच एक वाहन उद्योगाचा अविभाज्य घटक आहे, म्हणायला पाहिजे.  या हॉर्नचा शोध कसा लागला हे आज इथे आपण पाहणार आहोत.  १९ व्या शतकाच्या शेवटी जेव्हा जगात पहिल्यांदा गाड्या रस्त्यावर धावू लागल्या, तेव्हा त्यांचा वेग खूप कमी होता. सुरुवातीला लोक पादचाऱ्यांना सावध करण्यासाठी ‘क्लॅक्सन’  किंवा हाताने दाबायची रबरी पीपाणी वापरायचे.

वाहनांसाठीच्या पहिल्या अधिकृत इलेक्ट्रॉनिक हॉर्नचा शोध मिलर रीस हचिसन यांनी १९०८ मध्ये लावला. हचिसन यांनी या यंत्राचे पेटंट घेतले, ज्याला नंतर ‘क्लॅक्सन हॉर्न’ असे नाव देण्यात आले. हा हॉर्न ‘करार्र’ असा मोठा आणि तीक्ष्ण आवाज करायचा, ज्यामुळे लांबच्या व्यक्तीलाही गाडी येत असल्याची जाणीव व्हायची. थॉमस एडिसन यांच्या कंपनीनेही या तंत्रज्ञानात पुढे सुधारणा केल्या.

BMW च्या लोगोमागील हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? त्वरीत जाणून घ्या

कार आणि बाईकच्या हॉर्नमधील बदल

कारचा हॉर्न: सुरुवातीच्या गाड्यांमध्ये केवळ एकच हॉर्न असायचा. मात्र, १९३० च्या दशकात कारची गती वाढली. त्यानंतर कंपन्यांनी गाड्यांमध्ये दोन हॉर्न वापरण्यास सुरुवात केली. हे हॉर्न वेगवेगळे सूर एकत्र काढून ऐकण्यास सुसह्य पण लांबपर्यंत जाणारा आवाज तयार करतात.

बाईकचा हॉर्न: दुचाकी वाहनांचा आकार लहान असल्याने त्यांच्यासाठी लहान आणि हलके इलेक्ट्रॉनिक हॉर्न विकसित करण्यात आले. बाईकमध्ये प्रामुख्याने १२ व्होल्टच्या बॅटरीवर चालणारे डायफ्राम हॉर्न वापरले जातात.

‘चल मेरी लुना’! साधेपणाचे दुसरे नाव आणि भारतीय ऑटोमोबाईल क्रांतीचा सुवर्णकाळ

भारतात ब्रिटिश काळात गाड्यांसमोर लाल झेंडा घेऊन चालणारा माणूस असायचा, जो लोकांना गाडी येण्याचे संकेत द्यायचा. त्यानंतर हॉर्नचा वापर सक्तीचा झाला. आज तंत्रज्ञान बदलले असून हवेच्या दाबावर चालणारे ‘प्रेशर हॉर्न’ आणि ‘म्युझिकल हॉर्न’ बाजारात आले आहेत. मात्र, वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे शहरांमध्ये हॉर्नचा अनावश्यक वापर टाळणे आणि योग्य डेसिबलचा हॉर्न वापरणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे.

Web Title: History of invention of horn automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 10:49 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

इथेनॉल वॉर: भारताचे ‘हरित इंधन’ की वाहनचालकांच्या खिशाला कात्री? इंजिन, शेती आणि देशाच्या अर्थकारणावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण
1

इथेनॉल वॉर: भारताचे ‘हरित इंधन’ की वाहनचालकांच्या खिशाला कात्री? इंजिन, शेती आणि देशाच्या अर्थकारणावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण

टाटा मोटर्सचा धुमाकूळ! पहिल्या तिमाहीत विक्रीत ४६ टक्क्यांची रेकॉर्डतोड वाढ; ग्राहकांची प्रचंड पसंती
2

टाटा मोटर्सचा धुमाकूळ! पहिल्या तिमाहीत विक्रीत ४६ टक्क्यांची रेकॉर्डतोड वाढ; ग्राहकांची प्रचंड पसंती

BMW च्या लोगोमागील हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? त्वरीत जाणून घ्या
3

BMW च्या लोगोमागील हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? त्वरीत जाणून घ्या

मारुती सुझुकीचा खारखोडा प्लांट! भारतीय वाहन उद्योगातील एक नवी क्रांती
4

मारुती सुझुकीचा खारखोडा प्लांट! भारतीय वाहन उद्योगातील एक नवी क्रांती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.