Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VLF स्ट्राडा इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; किंमत ₹1.20 लाख, रेंज 250 किमीपर्यंत! जाणून घ्या

VLF स्ट्राडा इलेक्ट्रिक स्कूटर City आणि Max या 2 व्हेरिएंटमध्ये लाँच झाली आहे. किंमत अनुक्रमे ₹1.20 लाख आणि ₹1.55 लाख आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, यात 130 ते 250 किमी IDC रेंज, 4.8 kW मोटर, TFT डिस्प्ले आणि स्वॅपेबल बॅटरीची सुविधा मिळते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 11, 2026 | 08:00 PM
VLF स्ट्राडा इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; किंमत ₹1.20 लाख, रेंज 250 किमीपर्यंत! जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • VLF स्ट्राडा इलेक्ट्रिक स्कूटर ₹1.20 लाखांच्या सुरुवातीच्या किमतीत 2 व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच झाली आहे.
  • Max व्हेरिएंटमध्ये 4.32 kWh बॅटरी असून कंपनीचा दावा आहे की रेंज 250 किमीपर्यंत मिळते.
  • TFT डिस्प्ले, कीलेस एंट्री, 3 राइडिंग मोड्स आणि स्वॅपेबल बॅटरी ही स्कूटरची प्रमुख फीचर्स आहेत.
इलेक्ट्रिक स्कूटरच्या मार्केटमध्ये आता VLF स्ट्राडाची एन्ट्री झाली आहे. VLF India ने ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच केली असून, ती City आणि Max अशा 2 व्हेरिएंटमध्ये अव्हेलेबल असेल. City व्हेरिएंटची किंमत ₹1.20 लाख, तर Max व्हेरिएंटची किंमत ₹1.55 लाख आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, मोठ्या बॅटरीसह ही स्कूटर एका चार्जमध्ये 250 किमीपर्यंत रेंज देऊ शकते. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या कस्टमर्ससाठी हा एक नवीन ऑप्शन ठरू शकतो.

बॅटरी आणि रेंजमध्ये काय फरक?

VLF स्ट्राडाच्या City व्हेरिएंटमध्ये 2.16 kWh बॅटरी देण्यात आली आहे. या व्हेरिएंटची IDC रेंज 130 किमीपर्यंत असल्याचा कंपनीचा दावा आहे. दुसरीकडे, Max व्हेरिएंटमध्ये 4.32 kWh बॅटरी मिळते आणि त्याची दावा केलेली IDC रेंज 250 किमीपर्यंत आहे. या स्कूटरमध्ये स्वॅपेबल बॅटरीची सुविधाही देण्यात आली आहे. चार्जिंगबाबत कंपनीने विशिष्ट सेटअपमध्ये 2 तासांपेक्षा कमी वेळेचा उल्लेख केला आहे; पण दिलेल्या चार्जरच्या तपशीलानुसार चार्जिंगसाठी अंदाजे 6 तास लागू शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष चार्जिंग वेळ बॅटरी आणि चार्जरच्या कॉन्फिगरेशनवर अवलंबून असेल.

फुल चार्जमध्ये 400km रेंज; 115km/h टॉप स्पीड आणि 26 लिटर स्टोरेज! या Simple Ultra इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जाणून घ्या!

मोटर, स्पीड आणि टेक्नोलॉजी

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये BLDC हब मोटर असून ती 4.8 kW पीक पॉवर आणि 34 Nm पीक टॉर्क देते. यात Eco, City आणि Sport असे 3 राइडिंग मोड्स आहेत. Eco मोडमध्ये कमाल वेग 45 किमी प्रतितास, City मोडमध्ये 65 किमी प्रतितास, तर Sport मोडमध्ये 85 किमी प्रतितास आहे. त्यामुळे रस्त्याची परिस्थिती आणि प्रवासाच्या गरजेनुसार रायडरला मोड निवडता येतो.

डिझाइन आणि फीचर्स

VLF स्ट्राडामध्ये ड्युअल-बीम प्रोजेक्टर LED हेडलॅम्प, इंटिग्रेटेड टर्न इंडिकेटर्स, उंच विंडस्क्रीन आणि 2 भागांची सीट मिळते. मागच्या बाजूला इंटिग्रेटेड लगेज रॅक देण्यात आला आहे. सीटची उंची 780 mm आहे. फीचर्समध्ये 5-इंच TFT डिस्प्ले, कीलेस एंट्री, इल्यूमिनेटेड इग्निशन आणि USB Type-A व Type-C चार्जिंग पोर्ट्सचा समावेश आहे.

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर

ब्रेकिंग, रंग आणि स्पर्धा

या स्कूटरला पुढे 240 mm डिस्क आणि 3-पिस्टन कॅलिपर, तर मागे 220 mm डिस्क आणि 2-पिस्टन कॅलिपर देण्यात आले आहेत. CBS ब्रेकिंग प्रणालीसह पुढे 16-इंच आणि मागे 14-इंच व्हील्स मिळतात. Carbonio Black, Urbano Silver, Titanio Grey आणि Luna White अशा 4 रंगांमध्ये ती अव्हेलेबल असेल. मार्केटमध्ये तिची स्पर्धा यामाहा EC-06 आणि सुझुकी E-Access यांच्याशी होईल. खरेदीपूर्वी प्रत्यक्ष रेंज, चार्जिंग वेळ आणि बॅटरी वॉरंटीची माहिती तपासणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: Vlf strada electric scooter launched india price range features auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooter
  • two wheelers

संबंधित बातम्या

भारतात लवकरच लाँच होणार ५ नवीन बाईक्स; हिरो ते बजाज सज्ज!
1

भारतात लवकरच लाँच होणार ५ नवीन बाईक्स; हिरो ते बजाज सज्ज!

भारतात येणार 3 नवीन लग्झरी कार ब्रँड्स! टाटाच्या अविन्यापासून जेनेसिसपर्यंत मोठी तयारी
2

भारतात येणार 3 नवीन लग्झरी कार ब्रँड्स! टाटाच्या अविन्यापासून जेनेसिसपर्यंत मोठी तयारी

मारुती, टाटा, होंडा आणि ह्युंदाई भारतात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार! जाणून घ्या सविस्तरपणे
3

मारुती, टाटा, होंडा आणि ह्युंदाई भारतात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार! जाणून घ्या सविस्तरपणे

ऑक्टोबरमध्ये लाँच होणार या 6 नव्या कार! रेनॉ डस्टर हायब्रिड, ऑडी क्यू3 ते ह्युंदाई बेयॉन; पाहा फीचर्स आणि तारखा
4

ऑक्टोबरमध्ये लाँच होणार या 6 नव्या कार! रेनॉ डस्टर हायब्रिड, ऑडी क्यू3 ते ह्युंदाई बेयॉन; पाहा फीचर्स आणि तारखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.