
फोटो सौजन्य: Gemini
कंपनीला Activa e आणि QC1 कडून खूप अपेक्षा होती की हे इलेक्ट्रिक स्कूटर त्यांच्या इतर मॉडेल्सइतकेच लोकप्रिय होतील, परंतु घडले भलतेच. SIAM (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स) च्या आकडेवारीनुसार, होंडाने ऑगस्ट 2025 मध्ये या स्कूटरचे उत्पादन थांबवले आहे. या दोन इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन थांबवण्याच्या होंडाच्या निर्णयामागील कारणे पाहूया.
परफेक्ट फॅमिली कारच्या शोधात असणाऱ्यांसाठी ‘या’ आहेत बेस्ट ऑप्शन, किंमत फक्त 4.99 लाखांपासून सुरु
फेब्रुवारी ते जुलै २०२५ दरम्यान होंडाने एकूण 11,168 युनिट्सचे उत्पादन केले. मात्र, यापैकी फक्त 5,201 युनिट्स डीलर्सपर्यंत पोहोचल्या. याचा अर्थ अर्ध्याहून अधिक स्टॉक विकला गेला नाही. त्यामुळे कंपनीने उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेण्याचे हेच कारण असल्याचे मानले जात आहे.
Activa हे नावच टू व्हीलर मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण करून आहे. त्यातही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये battery swapping technology आल्यामुळे Activa e ची विक्री जास्त होईल, अशी मोठी अपेक्षा होती. कारण ग्राहकांना बॅटरी चार्ज होण्यासाठी जास्त वेळ थांबावं लागणार नाही, काही मिनिटांत फुल चार्ज बॅटरी स्वॅप होईल आणि बॅटरीच्या मेंटेनन्सचीही चिंता उरणार नाही. Honda ने विक्री वाढवण्यासाठी जूनमध्ये battery rent कमी केला होता आणि home charging dock सुरू करण्याबाबतही विचार केला होता. पण तरीही Activa e: ने अपेक्षित कामगिरी केली नाही.
भारताने चीनला दिली धोबीपछाड! देशात अशी Electric Three Wheeler ची विक्री दुसरी कुठे झालीच नाही
Honda QC1 च्या 5,201 युनिट्सपैकी 4,461 युनिट्सची विक्री झाली. तर Activa e: ची फक्त 740 युनिट्सची विक्री झाली आहे. QC1 ची विक्री चांगली होण्यामागे कमी किंमत, पोर्टेबल चार्जर आणि सध्याच्या EV बाजारातील ग्राहकांच्या पसंतीशी ती जुळणं हे प्रमुख कारण ठरलं. जेथे इतर ब्रँड घरगुती चार्जिंग सिस्टमकडे लक्ष देत आहेत, तेथे Honda चं swapping model भारतीय इन्फ्रास्ट्रक्चरच्या तुलनेत मर्यादितच ठरलं.
Honda ने आपले इलेक्ट्रिक स्कूटर्स फक्त काही निवडक शहरांमध्ये उपलब्ध केली होती. Activa e ची विक्री केवळ मुंबई, दिल्ली आणि बेंगलुरु इथपर्यंत मर्यादित होती. तर QC1 मुंबई, दिल्ली, बेंगलुरु, हैदराबाद, पुणे आणि चंदीगड येथे उपलब्ध होता. आज EV बाजारात इतर ब्रँड्स संपूर्ण भारतभर उपस्थित आहेत, त्यामुळे कमी शहरांपुरतं लाँच केल्याने Honda च्या स्कूटर्सना अपेक्षित विक्री मिळू शकली नाही.