फोटो सौजन्य: iStock
भारतात अशा अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या दमदार कार ऑफर ऑफर करत असतात. तसेच या कंपन्या भारतीय जरी नसल्या तरी त्या Make In India अंतर्गत त्याच्या कारचे उत्पादन भारतात करतात. यामुळे रोजगार निर्मिती तर होतेच तसेच या कार निर्यात देखील होतात. नुकतेच देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी Honda ने कार निर्यात करण्यात एक महत्वाचा टप्पा पार केला आहे.
भारतात अनेक कंपन्यांकडून कारची विक्री केली जाते. भारतीय बाजारपेठेबरोबरच या कंपन्या मेड इन इंडिया कार्स विदेशातही निर्यात करतात. याच पार्श्वभूमीवर होंडा कार्स इंडिया ने अलीकडेच निर्यातीच्या क्षेत्रात नवी कामगिरी केली आहे.कंपनीकडून दिलेल्या माहितीनुसार, भारतातून आत्तापर्यंत तब्बल 2 लाख कार्सची निर्यात पूर्ण झाली आहे.
काय सॉलिड लूक आहे राव! BMW ची ‘ही’ लिमिटेड एडिशन बाईक लाँच, पहिल्यांदाच किंमत 3 लाखांपेक्षा कमी
होंडा कार्स इंडियाचे मार्केटिंग आणि सेल्सचे उपाध्यक्ष कुणाल बहल म्हणाले,“2 लाख निर्यात युनिट्सचा टप्पा पार करणे ही होंडा कार्स इंडियासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. ही कामगिरी आमच्या भारतात निर्मित कार्सच्या जागतिक ओळखीला अधोरेखित करते. तसेच आमच्या कुशल टीमचे समर्पण आणि मजबूत उत्पादन क्षमताही यातून स्पष्ट होते. निर्यात ही HCIL च्या व्यवसाय धोरणाचा आणि महसूल योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पुढेही या क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी निष्ठावान आहोत आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांची सेवा करण्यास वचनबद्ध आहोत.”
कंपनीच्या माहितीनुसार, निर्यातीमध्ये सर्वाधिक हिस्सा होंडा सिटी आणि होंडा एलीव्हेट या मॉडेल्सचा आहे. या दोन्ही कार्सनी मिळून एकूण निर्यातीतील 78% वाटा उचलला आहे. तर ब्रिओ, अमेझ, जॅझ, बीआर-व्ही, मोबिलिओ आणि सिटी e:HEV यांचा एकत्रित हिस्सा 22% आहे.
Honda CB350C चा स्पेशल एडिशन लाँच, किमतीपासून डिलिव्हरीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
होंडाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण निर्यातीपैकी 30% हिस्सा जपानचा, 26% हिस्सा दक्षिण आफ्रिका व SADC देशांचा, 19% हिस्सा मेक्सिकोचा, 16% हिस्सा तुर्कीचा तर उर्वरित 9% हिस्सा सार्क, कॅरिबियन आणि अमेरिकन देशांचा आहे.