Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीत धुमाकूळ घालायला येतेय होंडा एलेव्हेट फेसलिफ्ट; मार्च २०२७ पर्यंत लाँच होणार 0 अल्फा इलेक्ट्रिक SUV!

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात आपला दबदबा पुन्हा निर्माण करण्यासाठी होंडा एक मोठी योजना आखत असून लवकरच दोन दणकेबाज गाड्या रस्त्यावर उतरणार आहेत. डिझाइनमधील आकर्षक बदल, हायटेक फीचर्स आणि प्रगत तंत्रज्ञानासह येणाऱ्या या प्रीमियम गाड्यांमुळे आगामी काळात ग्राहकांना एक अनोखा ड्रायव्हिंग अनुभव मिळणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 24, 2026 | 08:35 AM
दिवाळीत धुमाकूळ घालायला येतेय होंडा एलेव्हेट फेसलिफ्ट; मार्च २०२७ पर्यंत लाँच होणार 0 अल्फा इलेक्ट्रिक SUV!
Follow Us
Follow Us:
  • होंडाची नवी एलेव्हेट फेसलिफ्ट या दिवाळीत आधुनिक डिझाइन, ३६०-डिग्री कॅमेरा आणि व्हेंटिलेटेड सीट्ससह बाजारात दाखल होणार आहे.
  • राजस्थानमधील टापुकारा प्रकल्पात तयार होणारी होंडाची पहिली 0 अल्फा इलेक्ट्रिक SUV मार्च २०२७ पर्यंत लाँच केली जाईल.
  • ही नवीन इलेक्ट्रिक SUV बाजारात आल्यानंतर टाटा सिएरा EV, विनफास्ट VF 6 आणि महिंद्रा BE 6 यांना थेट टक्कर देईल.

होंडा कार्स इंडिया भारतीय बाजारपेठेत आपली विक्री वाढवण्यासाठी या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत दोन नवीन SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच होंडा एलेव्हेट फेसलिफ्ट आणि 0 अल्फा कन्सेप्टवर आधारित इलेक्ट्रिक SUV बाजारात आणणार आहे. या दोन्ही गाड्यांची सध्या भारतीय रस्त्यांवर चाचणी सुरू असून त्यांना अनेकदा पाहिले गेले आहे.

होंडा एलेव्हेट फेसलिफ्ट

सप्टेंबर २०२३ मध्ये लाँच झालेल्या होंडा एलेव्हेटला आता पहिला मोठा अपडेट मिळणार असून ही नवीन गाडी या दिवाळीत लाँच होण्याची शक्यता आहे. २०२६ च्या या मॉडेलमध्ये इंजिन बदलले जाणार नाही, परंतु डिझाइन आणि फीचर्समध्ये मोठे अपडेट्स पाहायला मिळतील. यामध्ये नवीन फ्रंट ग्रिल, अद्ययावत हेडलाइट्स, नवीन बंपर आणि रिव्हाइज्ड टेललाइट्स दिले जातील.

Tata Motors: टाटा मोटर्सचा मोठा धमाका! २०२६-२७ पर्यंत भारतीय मार्केटमध्ये लाँच होणार ६ नव्या कार्स!

गाडीच्या केबिनमध्ये नवीन इंटिरिअर थीमसह व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि ३६०-डिग्री कॅमेरा यांसारखे नवीन फीचर्स जोडले जातील. याशिवाय १०.२५-इंच टचस्क्रीन, कॅमेरा-आधारित ADAS आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कंसोल हे फीचर्स कायम राहतील. ही SUV पूर्वीप्रमाणेच १२१hp क्षमतेच्या १.५-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येईल, ज्यामध्ये ६-स्पीड मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध असेल.

KTM 390 Adventure आता नव्या ग्राफिक्ससह शोरूममध्ये दाखल! इंजिन आणि फीचर्समध्ये काय आहे खास?

होंडा 0 अल्फा EV

होंडा कार् इंडिया आपली पहिली इलेक्ट्रिक SUV मार्च २०२७ पर्यंत भारतीय बाजारात लाँच करेल. ही गाडी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२७ दरम्यान लाँच केली जाण्याची शक्यता आहे. 0 अल्फा इलेक्ट्रिक SUV ची निर्मिती राजस्थानमधील टापुकारा येथील होंडाच्या उत्पादन प्रकल्पात केली जाणार आहे.

उत्पादनासाठी तयार असलेले हे मॉडेल मूळ कन्सेप्ट डिझाइनसारखेच असेल आणि याचा व्हीलबेस सुमारे २७०० ते २८०० मिमी दरम्यान असेल. ही नवीन इलेक्ट्रिक गाडी बाजारात आल्यानंतर टाटा सिएरा EV, विनफास्ट VF 6 आणि महिंद्रा BE 6 स्पोर्ट्स यांसारख्या गाड्यांना थेट टक्कर देईल.

Web Title: Honda elevate facelift 0 alpha ev launch auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Honda

संबंधित बातम्या

MG हेक्टर टोमाहॉक ईव्हीची खरी रेंज किती? टेस्टमध्ये एका चार्जवर धावली 446 किमी! जाणून घ्या डिटेल मध्ये
1

MG हेक्टर टोमाहॉक ईव्हीची खरी रेंज किती? टेस्टमध्ये एका चार्जवर धावली 446 किमी! जाणून घ्या डिटेल मध्ये

भारतात LFP बॅटरी असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स कोणत्या? किंमत ₹67,951 पासून, रेंज 150 किमीपर्यंत!
2

भारतात LFP बॅटरी असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स कोणत्या? किंमत ₹67,951 पासून, रेंज 150 किमीपर्यंत!

2027 होंडा रिबेल 500 मध्ये मोठे अपडेट! आता मिळणार TFT डिस्प्ले आणि E-Clutch टेक्नोलॉजी
3

2027 होंडा रिबेल 500 मध्ये मोठे अपडेट! आता मिळणार TFT डिस्प्ले आणि E-Clutch टेक्नोलॉजी

भारतात VinFast ची मोठी तयारी! 15 राज्यांमध्ये 50 हून जास्त इलेक्ट्रिक टू-व्हीलर शोरूम उभारणार
4

भारतात VinFast ची मोठी तयारी! 15 राज्यांमध्ये 50 हून जास्त इलेक्ट्रिक टू-व्हीलर शोरूम उभारणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.