Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MG हेक्टर टोमाहॉक ईव्हीची खरी रेंज किती? टेस्टमध्ये एका चार्जवर धावली 446 किमी! जाणून घ्या डिटेल मध्ये

एमजी हेक्टर टोमाहॉक ईव्हीची कंपनी 517 किमी रेंज सांगते, पण प्रत्यक्ष टेस्टमध्ये किती अंतर कापता आले? ₹19.50 लाखांपासून सुरू होणाऱ्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीने शहरात आणि हायवेवर वेगवेगळी एफिशियन्सी नोंदवली. तिची खरी रेंज जाणून घेतल्यावर तुमचा निर्णय बदलू शकतो!

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 10, 2026 | 08:30 PM
MG हेक्टर टोमाहॉक ईव्हीची खरी रेंज किती? टेस्टमध्ये एका चार्जवर धावली 446 किमी! जाणून घ्या डिटेल मध्ये
Follow Us
Follow Us:
  • एमजी हेक्टर टोमाहॉक ईव्हीची दावा केलेली रेंज 517 किमी, तर अंदाजित प्रत्यक्ष रेंज 446 किमी आहे.
  • शहरात 7.15 किमी/kWh आणि हायवेवर 5.73 किमी/kWh एफिशियन्सी नोंदवण्यात आली.
  • 150kW डीसी फास्ट चार्जरवर बॅटरी 20% ते 80% चार्ज होण्यासाठी 32 मिनिटे लागली.

इलेक्ट्रिक एसयूव्ही खरेदी करताना कंपनीने सांगितलेली रेंज आणि प्रत्यक्ष रस्त्यावर मिळणारी रेंज यात किती फरक असतो, हा अनेक कस्टमर्सच्या मनातला प्रश्न आहे. एमजी हेक्टर टोमाहॉक ईव्हीच्या रिअल-वर्ल्ड टेस्टमधून याचे उत्तर समोर आले आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत ₹19.50 लाख ते ₹23.50 लाख असून ती 5-सीटर आणि 7-सीटर अशा दोन्ही ऑप्शन्समध्ये येते.

बॅटरी आणि मोटरची कॅपसिटी

एमजी हेक्टर टोमाहॉक ईव्हीमध्ये 69.2 kWh क्षमतेचा एलएफपी (लिथियम आयर्न फॉस्फेट) बॅटरी पॅक देण्यात आला आहे. यात फ्रंट एक्सलवर बसवलेली परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर असून ती 204hp पॉवर आणि 310Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही एसयूव्ही एका चार्जमध्ये 517 किमीपर्यंत धावू शकते. गाडीचे वजन 1,908 किलो आहे. यात इको, स्टँडर्ड आणि स्पोर्ट असे 3 ड्रायव्हिंग मोड्स मिळतात.

भारतात LFP बॅटरी असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स कोणत्या? किंमत ₹67,951 पासून, रेंज 150 किमीपर्यंत!

शहरात मिळाली जास्त रेंज

प्रत्यक्ष चाचणीदरम्यान या एसयूव्हीने शहरात 7.15 किमी/kWh एवढी एफिशियन्सी नोंदवली. या आकड्यानुसार पूर्ण चार्जवर सुमारे 495 किमी रेंज मिळू शकते. शहरातील ट्रॅफिकमध्ये वारंवार ब्रेक लावणे आणि वेग कमी-जास्त करणे यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची एफिशियन्सी बदलू शकते. या टेस्टमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंगसाठी स्ट्राँग मोड वापरण्यात आला होता.

हायवेवर रेंज झाली कमी

हायवेवर या एसयूव्हीची एफिशियन्सी 5.73 किमी/kWh नोंदवण्यात आली. त्यानुसार रेंज सुमारे 397 किमीपर्यंत येते. शहर आणि हायवेवरील एकत्रित एफिशियन्सी 6.44 किमी/kWh होती. त्यानुसार प्रत्यक्ष वापरात एका चार्जवर सुमारे 446 किमी रेंज मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजेच कंपनीच्या 517 किमीच्या दाव्यापेक्षा प्रत्यक्ष एकत्रित रेंज कमी आहे. वाहनाचा वेग, एसीचा वापर, रस्त्याची स्थिती आणि ड्रायव्हिंग स्टाइल यांचाही रेंजवर परिणाम होतो.

2027 होंडा रिबेल 500 मध्ये मोठे अपडेट! आता मिळणार TFT डिस्प्ले आणि E-Clutch टेक्नोलॉजी

फास्ट चार्जिंगमध्ये किती वेळ?

एमजीच्या दाव्यानुसार, 90kW डीसी फास्ट चार्जरने बॅटरी 30% वरून 80% पर्यंत चार्ज करण्यासाठी 35 मिनिटे लागतात. प्रत्यक्ष टेस्टमध्ये 150kW चार्जर वापरून 20% वरून 80% चार्जिंगला 32 मिनिटे लागली. या वेळी कमाल चार्जिंग स्पीड सुमारे 89kW नोंदवण्यात आला.

एकूणच, एमजी हेक्टर टोमाहॉक ईव्हीची प्रत्यक्ष रेंज 446 किमीच्या आसपास अपेक्षित धरता येते. पण ही टेस्टमधील आकडेवारी असून प्रत्येक कस्टमरला समान रेंज मिळेलच असे नाही. खरेदीपूर्वी आपल्या रोजच्या प्रवासाचा प्रकार, चार्जिंगची सोय आणि जवळचे चार्जिंग स्टेशन लक्षात घेणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: Mg hector tomahawk ev real world range test auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • automobile
  • Electric Cars
  • Electric Vehicle

संबंधित बातम्या

भारतात LFP बॅटरी असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स कोणत्या? किंमत ₹67,951 पासून, रेंज 150 किमीपर्यंत!
1

भारतात LFP बॅटरी असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स कोणत्या? किंमत ₹67,951 पासून, रेंज 150 किमीपर्यंत!

2027 होंडा रिबेल 500 मध्ये मोठे अपडेट! आता मिळणार TFT डिस्प्ले आणि E-Clutch टेक्नोलॉजी
2

2027 होंडा रिबेल 500 मध्ये मोठे अपडेट! आता मिळणार TFT डिस्प्ले आणि E-Clutch टेक्नोलॉजी

भारतात VinFast ची मोठी तयारी! 15 राज्यांमध्ये 50 हून जास्त इलेक्ट्रिक टू-व्हीलर शोरूम उभारणार
3

भारतात VinFast ची मोठी तयारी! 15 राज्यांमध्ये 50 हून जास्त इलेक्ट्रिक टू-व्हीलर शोरूम उभारणार

पल्सर NS200 आता झाली आणखी खतरनाक! आता क्विकशिफ्टर, TFT डिस्प्ले आणि 25.5hp पॉवर अपडेट
4

पल्सर NS200 आता झाली आणखी खतरनाक! आता क्विकशिफ्टर, TFT डिस्प्ले आणि 25.5hp पॉवर अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.