सप्टेंबर 2025 मधील विक्रीमुळे 'ही' कंपनी झाली मालामाल!
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने सप्टेंबर 2025 मध्ये विक्रीत उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. कंपनीने एकूण 5,68,164 युनिट्स विकल्या आहेत. यामध्ये 5,05,693 युनिट्स देशांतर्गत बाजारात विकल्या गेल्या, तर 62,471 युनिट्स निर्यातीसाठी पाठवण्यात आल्या. ऑगस्ट 2025 च्या तुलनेत HMSI ने 6% Month-on-Month (MOM) वाढ साध्य केली असून कंपनीसाठी ही विक्रीतील सातत्यपूर्ण वाढीची दिशा दर्शवणारी कामगिरी ठरली आहे.
FY 2025–26 च्या एप्रिल ते सप्टेंबर या YTD कालावधीत HMSI ने एकूण 29,91,024 युनिट्स विक्री केली. यापैकी 26,79,507 युनिट्स देशांतर्गत बाजारात आणि 3,11,517 युनिट्स निर्यातीसाठी विकल्या गेल्या. हे आकडे भारतीय दुचाकी बाजारात होंडाच्या सतत मजबूत होत जाणाऱ्या उपस्थितीचे प्रतीक आहेत.
सप्टेंबर महिन्यात HMSI ने ‘रस्ते सुरक्षा’ क्षेत्रात आपली वचनबद्धता कायम ठेवत देशभरातील 13 शहरांमध्ये जनजागृती मोहीमा राबवल्या. अहमदाबाद, चित्तौडगढ, रीवा, बलासोर, सितामढी, आग्रा, मुंबई, तिरुपती, तिरुवनंतपूरम, बारामती, विजयपूर, रोहतक आणि अंबाला येथे या मोहिमांचे आयोजन करण्यात आले.
यासोबतच, HMSI ने विशाखापट्टणम (Vizag) येथील सेफ्टी ड्रायव्हिंग एज्युकेशन सेंटरचा (SDEC) 5वा, तसेच कोझिकोड आणि विजयवाडा येथील केंद्रांचा 6वा वर्धापनदिन साजरा केला. या माध्यमातून कंपनीने सुरक्षित वाहन चालवण्याच्या सवयींबाबत जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न केला.
25 वर्षांपासून मार्केट आमचंच! Mahindra Bolero आणि Bolero Neo चा नवा व्हेरिएंट लाँच, किंमत…
प्रिमियम 350cc बाईक सेगमेंटमध्ये आपली पकड अधिक मजबूत करत, HMSI ने नवीन CB350C Special Edition लाँच केली. या रेट्रो-क्लासिक बाईकची किंमत 2,01,900 (एक्स-शोरूम, बेंगळुरू) लाख रुपये आहे. बुकिंग्स सुरू करण्यात आली असून, ही बाईक संपूर्ण देशभरातील Honda BigWing डीलरशिप्सवर उपलब्ध होईल.
ग्राहक अनुभव अधिक डिजिटल आणि सोपा करण्यासाठी कंपनीने ‘MyHonda-India’ मोबाइल ॲप्लिकेशन सादर केले आहे. हे एक संपूर्ण डिजिटल कनेक्ट प्लॅटफॉर्म असून, ग्राहकांसाठी एक सुलभ आणि आकर्षक ओनरशिप अनुभव देते.
सप्टेंबर 2025 मध्ये MotoGP स्पर्धा कातालोनिया, सॅन मारीनो आणि जपान येथे पार पडल्या. त्याचबरोबर 2025 Idemitsu Honda India Talent Cup CB300F ची तिसरी फेरी चेन्नई (तमिळनाडू) येथे यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली, ज्यातून भारतीय तरुण रायडर्सना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध झाली.