
होंडा QC3
QC3 मध्ये 145km क्लेम्ड रेंज आणि 32-लिटर स्टोरेज असल्याने ऑफिस कम्यूटसोबत घरातील रोजच्या कामांसाठी ती उपयोगी ठरू शकते. Smart Key, 5-इंच TFT डिस्प्ले, RoadSync कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन मिळते. 0 ते 80% चार्जिंगसाठी 2 तास 40 मिनिटांचा दावा आहे. कुटुंबासोबत वापरताना स्टोरेजचा फायदा होऊ शकतो. पण टॉप स्पीड आणि मोटर आउटपुटची पूर्ण माहिती जाहीर झालेली नाही.
Honda QC3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; 145 km रेंज, किंमत फक्त Rs. 1.35 लाख
TVS iQube 3.1kWh
TVS iQube मध्ये 3.1kWh बॅटरी, 123km क्लेम्ड रेंज, 82kmph टॉप स्पीड आणि 32-लिटर बूट स्पेस मिळतो. ऑफिसला रोज 30 ते 50km ये-जा करणाऱ्या कस्टमर्ससाठी घरच्या चार्जिंगसह ही रेंज उपयोगी ठरू शकते. मोठे सर्व्हिस नेटवर्क हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे.
बजाज चेतक C3502
बजाज चेतक C3502 मध्ये 3.5kWh बॅटरी, 153km IDC रेंज, 80kmph टॉप स्पीड आणि 35-लिटर बूट स्पेस मिळते. मेटल बॉडीमुळे प्रीमियम फील मिळतो. त्यामुळे कुटुंबासाठी रोजचा वापर, ऑफिस कम्यूट तसेच तुलनेने लांब राइड करणाऱ्यांसाठी त्याची मोठी बूट क्षमता आणि रेंज उपयोगी ठरू शकते. 0 ते 80% चार्जिंगला 3 तास 25 मिनिटे लागतात.
Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना
VIDA VX2 आणि Ather Konarc S 161
VIDA VX2 Plus मध्ये 3.4kWh बॅटरी, 146km रेंज आणि 80kmph टॉप स्पीड मिळतो. रिमूव्हेबल बॅटरीमुळे पार्किंगमध्ये चार्जिंगची सोय नसलेल्या काही घरांसाठी हा पर्याय उपयोगी ठरू शकतो. Ather Konarc S 161 मध्ये 3.5kWh बॅटरी आणि 161km ची सर्वात जास्त क्लेम्ड रेंज आहे. त्यामुळे लांब ऑफिस कम्यूट किंवा जास्त रोजचे रनिंग असणाऱ्यांना ती आकर्षक वाटू शकते. मात्र 70kmph टॉप स्पीड आणि स्टँडर्ड चार्जरने 0 ते 80% चार्जिंगसाठी सुमारे 5 तास 40 मिनिटे लागतात.
फॅमिली वापरासाठी बूट स्पेस आणि आराम, ऑफिससाठी रेंज व चार्जिंग वेळ, तर लांब प्रवासासाठी प्रत्यक्ष रेंज आणि चार्जिंगची उपलब्धता महत्त्वाची ठरते. त्यामुळे फक्त क्लेम्ड रेंज पाहण्याऐवजी पिलियन कम्फर्ट, प्रत्यक्ष रेंज, बॅटरी वॉरंटी, सर्व्हिस आणि ऑन-रोड किंमत तपासून निर्णय घेणे योग्य ठरेल.