
Hydrogen Car Technology
Fuel Saving Tips : दरमहा वाचतील हजारो रुपये! कार चालवताना फक्त ‘या’ ५ गोष्टी करा; पेट्रोल-डिझेलचा खर्च होईल कमी
हायड्रोनजन फ्युएल हे अत्यंत स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त इंधन आहे. याचा वापर भविष्यातील उर्जा स्रोत्रत म्हणून केला जाऊ शकतो. याच्या वापरामुळे कोणताही घातक धूर किंवा कार्बन डायऑक्साइड बाहेर पडत नाही, तर पाण्याची वाफ बाहेर पडते. यामुळे याला १००% पर्यावरणपूरक क्लीन फ्युएल मानले जाते.
सर्वसामान्या गाड्यांमध्ये हायड्रोजन थेट इंजिनमध्ये जाळले जात नाही. यामध्ये फ्युएल सेल नावाचे एक प्रगत तंत्रज्ञान असते. हा सेल गाडीतील हायड्रोजन आणि हवेतील ऑक्सिजन यांचे मिश्रण करुन केमिकल रिअॅक्शनद्वारे वीज तयार करतो आणि याच वीजेवर गाडीची मोटार चालते.
हायड्रोजनची निर्मिती करणे, तो सुरक्षित साठवून ठेवणे आणि पंपापर्यंत पोहोचवण्यात जास्त खर्च येतो. यामुळे आजच्या काळात हायड्रोजन फ्युएल सीएनजीपेक्षा जास्त महाग असू शकते. परंतु याचे उत्पादन वाढल्या आणि तंत्रज्ञान भारतात सर्वत्र पोहचले तर याचे दर पेट्रोल-डिझेलपेक्षाही परवडणारे असतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सध्या जशी गाडीत पेट्रोल ऐवजी सीएनजी कीट बसवता येते तसेच हायड्रोजन कीट बसवता येईल का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर तज्ज्ञांच्या मते, सध्या हे शक्य नाही. कारण हायड्रोजनसाठी अतिशय उच्च दाबाचे रणगाडे आणि विशेष सुरक्षेची गरज असते. यामुळे भविष्यात रेट्रोफिटिंग तंत्रज्ञान आले तरी यासाठी कंपन्यांनाना खास हायड्रोजन गाड्याच तयार कराव्या लागतील.