Car Care tips : उन्हाळ्यात कारमध्ये बसताच 'ही' चूक करताय? थेट आरोग्यावर होईल जीवघेणा परिणाम (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखील वाचा : Tata चा धमाका! ‘या’ दिवशी लॉंच होतेय नवीन Tiago ; नव्या बजेटमध्ये मिळणार हाय-टेक फीचर्स
तज्ज्ञांच्या मते, कडकत्या उन्हाता तासनतास गाडी उभी राहिलेले असताना कारच्या चेंबरमध्ये प्रचंड उष्णता निर्माण होते. यामुळे कारचे डॅशबोर्ड, सीट आणि प्लास्टिकच्या भागांमधून हानिकारक वायू बाहेर पडत असतो. अशी परिस्थितीत जर खिडक्या बंद करुन गाडीत बसल्या क्षणी एसी चालू करणे घातक ठरु शकते.
गाडी बाहेर पडणारा विषारी वायू आणि गरम हवेमुळे डोकेदुखी, चक्कर येणे किंवा श्वास घेण्याचा त्रास होऊ शकतो. लहान मुले, वृद्धासाठी हे जास्त धोकादायक आहे.
याशिवाय गाडी उन्हात तापल्याने थेट हाय-स्पीडवर एसी चालल्याने कारच्या कुलिंग सिस्टमवर अचानक प्रचंड ताण येतो. यामुळे इंजिनची कार्यक्षमता मंदावू शकते. तसेच इंधनाचा वापरही जास्त वाढतो. दीर्घकाळ असे केल्यास एसी पार्ट्स खराब होऊन देखभालीचा खर्च वाढू शकतो.






