फोटो सौजन्य: iStock
देशात इलेक्ट्रिक वाहनांची डिमांड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. आता भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार सोबतच ई-स्कूटर देखील लोकप्रिय ठरत आहे. ग्राहक देखील इंधनावर चालणाऱ्या स्कूटर पेक्षा इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त प्राधान्य देत आहे. हीच वाढती मागणी पाहता अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आता इलेक्ट्रिक स्कूटरच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. पण अनेकदा इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना एक प्रश्न आपसूकच मनात येतो. चला याबद्दल जाणून घेऊया.
इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी लाईफ किती असते? इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्या बहुतेक लोकांच्या मनात हा प्रश्न येतो. कारण इलेक्ट्रिक स्कूटरमधून होणारी बचत आणि त्यासाठीच्या नवीन बॅटरीवरील खर्च तुमची खरी बचत ठरवतो. खरंतर, इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी अशा प्रकारे बनवली जाते की ती अनेक वर्षे कोणत्याही समस्येशिवाय काम करेल. साधारणपणे, इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरी लिथियम आयन वापरून बनवल्या जातात, ज्यामुळे बॅटरीचे लाइफ लक्षणीयरीत्या वाढते. इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी लाइफ 5 वर्षांपेक्षा जास्त असते.
देशात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीवर विविध प्रकारच्या टेस्टिंग केल्या जातात. कंपन्यांकडून बॅटरीची वॉरंटी देखील दिली जाते. साधारणपणे, इलेक्ट्रिक स्कूटरना सुमारे 5 ते 7 वर्षे किंवा 80000 किमी पर्यंतची वॉरंटी दिली जाते.
नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यानंतर, बॅटरी चार्ज होण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. बॅटरी जशी जुनी व्हायला लागते तसे त्याच्या चार्जिंगचा वेळही वाढतो. त्याचप्रमाणे, नवीन बॅटरी चार्ज केल्यानंतर लवकर संपत नाही. त्याची रेंज देखील बरीच जास्त आहे. पण जेव्हा बॅटरी खराब होऊ लागते तेव्हा कमी वापरातही ती लवकर संपू लागते. यामुळे वाहनाची रेंज देखील कमी होते.
Tata Motors च्या कार कार खरेदी करणाऱ्यांना झटका ! April 2025 मध्ये वाढणार किंमत
वर्षभरातील वेगवेगळे हवामान बॅटरीच्या लाइफवर परिणाम करते. देशातील असे भाग जिथे तापमान शून्यापेक्षा कमी आहे. तिथे इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीवर परिणाम होऊ शकतो. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी संपण्याची समस्या देखील आपल्या निष्काळजीपणामुळे उद्भवते. अशावेळी बॅटरी कधीही जास्त चार्ज करू नये. जवळजवळ सर्व कंपन्या कोणत्या वाहनाला चार्ज करण्यासाठी किती वेळ लागतो याची माहिती देतात. अशा परिस्थितीत, जास्त चार्जिंग टाळले पाहिजे. शक्य असल्यास, बॅटरी कधीही 100% पर्यंत पूर्णपणे चार्ज करू नका. ते फक्त 90% पर्यंत चार्ज करा.
टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एनएमसी (निकेल मॅंगनीज कोबाल्ट) सेल केमिस्ट्रीसह लिथियम-आयन वापरण्यात आले आहे ज्याचे लाइफ 800 चार्जिंग सर्कल इतके आहे म्हणजेच ओडोमीटरवर 75,000 किमी पर्यंत. कंपनी यावर 3 वर्षांची किंवा 50,000 किमी पर्यंतची वॉरंटी देते. त्याच वेळी, ओला इलेक्ट्रिक त्यांच्या स्कूटरवर 8 वर्षे किंवा 80,000 किमी पर्यंतची वॉरंटी देते. एथर एनर्जी इलेक्ट्रिक स्कूटरवर 3 वर्षांची किंवा 30,000 किमी पर्यंतची वॉरंटी देते. परंतु, ही वॉरंटी मॉडेलनुसार वाढते.