फोटो सौजन्य: @SawyerMerritt (X.com)
जगभरात इलेक्ट्रिक कारची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतात देखील आता इलेक्ट्रिक कार सोबतच बाईक, आणि स्कूटर देखील धावताना दिसत आहे. अनेक कार उत्पादक कंपन्या ज्या आधी इंधनावर चालणाऱ्या कार उत्पादित करीत होत्या, त्याच आता इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. पण अनेकदा इलेक्ट्रिक कार फुल्ल चार्ज होण्यास वेळ घेत असतात, ज्यामुळे आताही कित्येक ग्राहक पेट्रोल आणि डिझेल कारकडे वळतात.
Tata Motors च्या कार कार खरेदी करणाऱ्यांना झटका ! April 2025 मध्ये वाढणार किंमत
इलेक्ट्रिक कारला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी अंदाजे 3 ते 4 तास लागतात, परंतु आता असे होणार नाही. आता इलेक्ट्रिक कार फक्त 6 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होईल. याचे कारण म्हणजे चिनी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी BYD ने त्यांच्या नवीन सुपर ई-प्लॅटफॉर्म 1000 ची घोषणा केली आहे. हे प्लॅटफॉर्म 1000 किलोवॅट पर्यंतच्या चार्जिंग स्पीडला सपोर्ट करते, जे आतापर्यंतचे सर्वात फास्ट चार्जिंग स्पीड आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा असा आहे की यामुळे इलेक्ट्रिक कार फक्त 5 मिनिटे चार्ज करून तुम्ही 400 किलोमीटरपर्यंत चालवता येते. याचा अर्थ असा की दर सेकंदाला कार चार्ज केल्याने तुम्हाला 1 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज मिळेल. चला जाणून घेऊया, BYD चा सुपर ई-प्लॅटफॉर्म कसे काम करते आणि त्याचे फीचर्स काय आहेत.
फास्ट चार्जिंग स्पीड: BYD द्वारे ऑफर केलेला सुपर ई-प्लॅटफॉर्म 1,000 kW चार्जिंग स्पीड देतो, जो टेस्लाच्या 500 kW चार्जिंग स्पीडपेक्षा दुप्पट आहे. यामुळे, लोकांना ICE कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी जितका वेळ लागतो तितकाच वेळ चार्जिंग स्टेशनवर घालवावा लागेल.
ब्लेड बॅटरी तंत्रज्ञान: यात BYD ची ब्लेड बॅटरी वापरली जाते, जी फास्ट आयन ट्रान्स्फर आणि कमी रेजिस्टेंसमुळे फास्ट चार्जिंग देते. या बॅटरीचे वैशिष्ट्य म्हणजे ती 10C चार्जिंग मल्टीप्लायरला सपोर्ट करते, म्हणजेच बॅटरी फक्त 6 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते.
नवीन EV मॉडेल्स: या नवीन सुपर ई-प्लॅटफॉर्मचा वापर प्रथम BYD च्या दोन नवीन EV मॉडेल्स, Han L सेडान आणि Tang L SUV चार्ज करण्यासाठी केला जाईल. या वाहनांची प्री-सेल्स चीनमध्ये सुरू झाली आहे, जी एप्रिल 2025 च्या आसपास लाँच होईल.
चीनमध्ये फास्ट चार्जिंग नेटवर्क: BYD चीनमध्ये 4,000 हून अधिक सुपर-फास्ट चार्जिंग युनिट्स स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे, जे या नवीन प्लॅटफॉर्मला सपोर्ट देतील. कंपनी या चार्जिंग युनिट्समध्ये एनर्जी स्टोरेज सुविधा जोडण्याची योजना आखत आहे.