फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात टाटा मोटर्सचे नाव खूप मोठे आहे. कंपनीने देशात विविध सेगमेंटमध्ये आपल्या उत्तम कार ऑफर केल्या आहेत. त्यातही कंपनी नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या कारवर उत्तम डिस्काउंट देत असते. आजचा ग्राहक सुद्धा टाटाच्या कारवर डोळे झाकून विश्वास ठेवत असतो. तसेच इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये देखील कंपनी आपल्या दमदार कार ऑफर करत आहे. जर तुम्ही सुद्धा टाटा मोटर्सची कार खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचे कारण म्हणजे कंपनी आता आपल्या कारच्या किमतीत वाढ करणार आहे.
भर उन्हात कार होतेय Overheat? इंजिनला थंड ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स
कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने घोषणा केली आहे की ते आता 1 एप्रिल 2025 पासून त्यांच्या सर्व कमर्शियल वाहनांच्या किमती 2% पर्यंत वाढवू शकते. वाढत्या इनपुट खर्च आणि महागड्या कच्च्या मालाची बाब लक्षात घेऊन कंपनीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही वाढ वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंटवर अवलंबून असेल. या दरवाढीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाढता उत्पादन खर्च, महागडा कच्चा माल आणि लॉजिस्टिक्स खर्चामुळे टाटा मोटर्सला हे पाऊल उचलणे आवश्यक झाले आहे, असे कंपनीने सांगितले. परंतु, कंपनीने असेही म्हटले आहे की ते खर्च कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
टाटा मोटर्सच्या आधी, मारुती सुझुकीनेही एप्रिल 2025 पासून त्यांच्या वाहनांच्या किमती 4% पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. वाढत्या इनपुट खर्च आणि ऑपरेशनल खर्च हे यामागील कारण म्हणून सांगितले जाते.
या किमती वाढीचा थेट परिणाम वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रावर होईल. कमर्शियल वाहने महाग झाल्यामुळे, वाहतूक खर्च वाढू शकतो आणि याचा परिणाम इतर उत्पादनांच्या किमतींवरही होऊ शकतो. मारुती आणि टाटाच्या वाढलेल्या किमती लक्षात घेऊन ग्राहक कंपनीच्या कार खरेदी करण्याचा निर्णय देखील बदलू शकतात.
Skoda Auto Volkswagen India ची दमदार कामगिरी ! स्थानिक स्तरावर 5 लाख इंजिन्सचे केले उत्पादन
मारुती सुझकी देखील एप्रिल 2025 मध्ये आपल्या कारची किंमत वाढवणार आहे. अशावेळी जर तुम्ही टाटा मोटर्स किंवा मारुती सुझुकीकडून वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एप्रिलपूर्वी या कंपनीच्या कार बुक करणे फायदेशीर ठरेल. अशा प्रकारे, तुम्ही वाढत्या किमती टाळू शकता आणि चांगली डील मिळवू शकता.