फोटो सौजन्य: @HyundaiIndia (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये विविध सेगमेंटमधील कार्स उपलब्ध आहेत, मात्र एसयूव्ही विभागाला ग्राहकांकडून सर्वाधिक प्रतिसाद मिळतो. हाय ग्राउंड क्लीयरन्स, मोठे केबिन आणि ऑफ-रोड क्षमतेमुळे एसयूव्ही कार्सची मागणी सातत्याने वाढत आहे.
ग्राहकांमधील या वाढत्या आकर्षणामुळे अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या नव्या मॉडेल्स एसयूव्ही सेगमेंटमध्ये सादर करत आहेत. केवळ स्टाईलच नव्हे तर सेफ्टी, मायलेज आणि टेक्नोलॉजीच्या बाबतीतही या कार्स आकर्षक ठरत आहेत. त्यामुळे आगामी काळात एसयूव्ही सेगमेंटमध्ये स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
भारतीय मार्केटमध्ये दरमहा ह्युंदाई क्रेटा भरपूर विकली जाते. खासकरून ही कार कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आधुनिक फीचर्ससह आणि पॉवरफुल इंजिन असलेली ही एसयूव्ही गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. जर तुम्हीही सर्वोत्तम एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ह्युंदाई क्रेटा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. ह्युंदाई क्रेटाच्या बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत, डाउन पेमेंट आणि ईएमआय काय आहे आणि किती पगारावर तुम्ही ही कार तुमची बनवू शकता त्याबद्दल जाणून घेऊयात.
चालत्या बाईकवर सुरु होती आशिकी ! पोलीस मामांनी ठोठावला भलामोठा दंड, आकडा वाचूनच व्हाल गार
दिल्लीमध्ये क्रेटाची ऑन-रोड किंमत 12 लाख 80 हजार रुपये आहे. जर तुम्ही या कारला फायनान्स केले तर 1.5 लाख रुपये देऊन 4 वर्षांसाठी दरमहा 28 हजार रुपये EMI 9.8 टक्के व्याजदराने भरावे लागतील. अशा परिस्थितीत, सर्व कॅल्क्युलेशनच्या आधारे, आपण असे म्हणू शकतो की तुम्ही ही एसयूव्ही 70-80 हजार पगारावर खरेदी करू शकता.
ह्युंदाई क्रेटा तीन 1.5-लिटर इंजिन इंजिन व्हेरियंट आहेत. या कारमध्ये नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिनचा पर्याय आहे. सुधारित क्रेटामध्ये 6-स्पीड मॅन्युअल, इंटेलिजेंट व्हेरिअबल ट्रान्समिशन (IVT), 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन (DCT) आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे.
काय ऑफर आहे बॉस ! फक्त 99 रुपयांच्या EMI वर मिळत आहे Toyota ची ‘ही’ दमदार कार
याशिवाय, इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, ह्युंदाई क्रेटामध्ये ADAS लेव्हल-2, 360 डिग्री कॅमेरा, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, व्हेंटिलेटेड सीट्स आणि बरेच काही समाविष्ट आहे. तर इन्फोटेनमेंट सिस्टम अधिक कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह अपडेट करण्यात आली आहे. एकूण, ह्युंदाई क्रेटामध्ये 70 हून अधिक सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत. ह्युंदाई क्रेटाची फेसलिफ्ट बाजारात किया सेल्टोस, मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरशी स्पर्धा करते.