फोटो सौजन्य: @GreaterNoidaW (X.com)
भारतात हाय स्पीड बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. मात्र, याच स्पीडच्या नशेत कित्येक तरुण मंडळी स्टंट मारताना दिसतात. काही जण तर हॉलिवूड आणि बॉलिवूड मधील ॲक्शन हुबेहूब कॉपी करताना दिसतात. यामुळे अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढताना दिसत आहे. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक जोडपे बाईकवर रोमँटिक स्टंट मारताना दिसत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
सोशल मीडियावर दररोज नवनवीन बाईक स्टंटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या भागात, नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रेमी युगल चालत्या बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत. त्यानंतर, नोएडा वाहतूक पोलिसांनी त्या प्रेमी युगलाला मोठा दंड ठोठावला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे, नोएडा वाहतूक पोलिसांनी प्रेमी युगलाला 53,500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. 5 सेकंदांच्या या स्टंट क्लिपमध्ये, एक तरुण बाईक चालवत असल्याचे दिसून येत आहे. ज्यात तरुणीने बाईकच्या पेट्रोल टँकवर उलट्या स्थितीत पाय ओलांडून बसलेली आहे. तरुण आणि महिला दोघेही हेल्मेटशिवाय बाईकवर आहेत आणि महिलेने हातात हेल्मेट घातलेले दिसत आहे. बाईकचा नंबर दिल्लीत मध्ये रजिस्टर आहे.
यानंतर, शहरातील पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली. यानंतर दोघांवरही कठोर कारवाई करण्यात आले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, नोएडा एक्सप्रेसवेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे संपूर्ण प्रकरण कैद झाले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच, एका व्यक्तीने एक्स वर पोस्ट करत त्या पोलिसांना टॅग केले, ज्यामुळे वाहतूक पोलिसांना तात्काळ या प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.
ना अंबानी ना अदानी; ‘हा’ अभिनेता ठरला Lamborghini Urus SE खरेदी करणारा पहिला भारतीय, किंमत 5 कोटी !
वाहतूक पोलिसांनी ज्या कलमांतर्गत चलान जारी केले आहेत त्यात धोकादायक वाहन चालवणे, हेल्मेटशिवाय गाडी चालवणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे आणि वैध सूचनांचे उल्लंघन करणे यांचा समावेश आहे. डीसीपी लखन सिंह यादव यांच्या मते, ही घटना दुपारी 1:46 वाजता सेक्टर-39 पोलिस स्टेशन परिसरात घडली.