फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारपेठेत अशा कारची खूप डिमांड पाहायला मिळते, ज्या किफायतशीर आणि चांगले मायलेज देणाऱ्या आहेत. अशा परिस्थितीत, ऑटो कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही कंपन्या ईव्ही बॅटरीवर लाइफटाईम वॉरंटी देत आहेत. तर काही कॅश, कॉर्पोरेट आणि एक्सचेंज बोनसच्या नावाखाली आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. भारतीय मार्केटमध्ये आपल्याला विविध कार्स पाहायला मिळतात. यातील काही कार्स तर आजही ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यातीलच एक आघाडीची कार म्हणजे Toyota Glanza. अशा परिस्थितीत, आता टोयोटा एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे. चला या आकर्षित ऑफरबद्दल जाणून घेऊया.
ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे आणि ग्राहकांना Buy Now Pay in Navratri ऑफर अंतर्गत त्यांच्या 2 लोकप्रिय वाहनांवर उत्तम EMI आणि 1 लाख रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळत आहेत. या ऑफर अंतर्गत, तुम्ही लगेचच टोयोटा ग्लांझा खरेदी करू शकता. यानंतर तुमचा EMI तीन महिन्यांनंतर सुरू होईल.
Sedan, SUV, Coupe आणि Crossover कारमुळे बुचकळ्यात पडलात? ‘हा’ आहे फरक
ही ऑफर फक्त ग्लांझा आणि अर्बन क्रूझर हायरायडरवर उपलब्ध आहे. तुम्ही ही ऑफर 30 जूनपर्यंत घेऊ शकता. टोयोटाच्या अधिकृत साइटनुसार, तुमचा ईएमआय 3 महिन्यांनंतर कापला जाऊ लागेल. पहिल्या 3 महिन्यांत तुम्हाला 99 रुपये EMI द्यावे लागतील. तीन महिन्यांनंतर, तुम्ही ज्या EMI वर कार खरेदी करता त्या EMI वर तुम्हाला पैसे द्यावे लागतील. EMI व्यतिरिक्त, या लोकप्रिय कारवर 1 लाख रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स दिले जात आहेत.
टोयोटा ग्लांझा हॅचबॅकच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि मागील एसी व्हेंटसह ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे. ग्लांझामध्ये पुश बटण स्टार्टसह कीलेस एंट्री, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, हेड-अप डिस्प्ले फीचर्स देखील आहेत. याशिवाय, टोयोटा ग्लांझामध्ये मल्टी-इन्फो डिस्प्लेसह ॲनालॉग डायल सारखे अनेक फीचर्स देण्यात आली आहेत.
ना अंबानी ना अदानी; ‘हा’ अभिनेता ठरला Lamborghini Urus SE खरेदी करणारा पहिला भारतीय, किंमत 5 कोटी !
सुरक्षिततेच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, ग्लांझामध्ये 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल(ESC), रिअर पार्किंग सेन्सर आणि सुरक्षिततेसाठी हिल-होल्ड असिस्ट सारखी अनेक सेफ्टी फीचर्स आहेत.