Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2025: होळीचा आनंद लुटण्यासाठी कारने फिरण्याचा प्लॅन असेल तर ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

भारतीयांचा आवडता सण होळी सुरु झाली आहे. या होळीच्या सणात अनेक जण आपल्या कारने फिरत असतात. अशावेळी तुम्ही कोणती खबरदारी घेतली पाहिजे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 13, 2025 | 07:29 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

होळी म्हणजे प्रत्येक भारतीयांचा आवडता सण. हा सण आनंद, रंग, आणि एकतेचे प्रतीक आहे. होळीच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी आनंदाचे वातावरण असते. लोक एकमेकांना रंग लावून प्रेम आणि मैत्रीचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा करतात. घरोघरी पुरणपोळी आणि आमटीचा बेत असतो, जे स्वादिष्ट आणि परंपरागत असतात. या दिवशी सर्व वयाच्या लोकांमध्ये एक वेगळा उत्साह आणि आनंद असतो, जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो. होळीचा सण भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व राखतो. सणाच्या दिवशी मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय एकत्र येऊन उत्साहाने सण साजरा करतात. रंग खेळल्यावर, अनेक लोक आपल्या गाड्यांवर फेरफटका मारून शहरभर फिरतात.

February 2025 मध्ये ‘या’ कारने Mahindra आणि Toyota ला दाखवला बाहेरचा रस्ता ! जाणून घ्या टॉप 5 MPV आणि SUV

होळी खेळताना रंग कपड्यांवर चिकटतात आणि नंतर कारमध्ये प्रवास करताना ते घाण होते. पण अशावेळी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर कारच्या आतील भागाला होळीच्या रंगांपासून सहज संरक्षण देता येते. हे कसे करता येईल? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

ओल्या कपड्याने कारमधून फिरू नये

जर तुम्ही होळीच्या सणात रंगांशी खेळण्याचा विचार करत असाल, तर असे केल्यानंतर, तुम्ही ओले कपडे घालून कारमध्ये बसू नये. कारण रंग लागलेल्या कपड्यांबरोबर कारमध्ये बसल्यास तिचा आतील भाग खराब होतो.

खिडक्या उघड्या ठेवून कार चालवू नये

होळीच्या वेळी काही लोक कारच्या खिडक्या उघड्या ठेवून प्रवास करतात. असे केल्याने, बाहेरून रंग किंवा पाणी कारमध्ये प्रवेश करू शकते. ज्यामुळे फक्त ड्रायव्हरचे लक्ष विचलित होत नाही तर कारही घाण होते.

कशी नशिबाने थट्टा मांडली ! भारतात ‘या’ SUV कडे ग्राहक ढुंकूनही पाहे ना, फेब्रुवारीत फक्त एका ग्राहकाकडून खरेदी

सीट खराब होऊ नये म्हणून कपड्याचा वापर करा

होळी कितीही काळजीपूर्वक खेळली तरी काही ना काही रंग कपड्यांना लागतोच. त्यामुळे कारच्या सीट्स खराब होतात. हे टाळण्यासाठी, कारच्या सीटवर एका कापडाचा वापर करावा. कारच्या सीटवर जुने कापड अशा प्रकारे पसरवावे की सीट कव्हर पूर्णपणे झाकले जातील. असे केल्याने सीट्सना रंगाच्या नुकसानापासून वाचवता येते.

कागद वापरा

कारचा इंटिरियर खूप महाग आहे आणि ते साफ करणेही तितकेच कठीण असते. शिवाय, त्यात खूप खर्च येतो. म्हणून, सीट्स व्यतिरिक्त, आर्म रेस्ट, स्टीअरिंग व्हील, मॅट्स इत्यादी आणि गिअर्सभोवती बटर पेपरसारखे पर्याय वापरले जाऊ शकतात. अशा ठिकाणी कागद योग्यरित्या लावल्याने, तुम्ही रंगांमुळे होणाऱ्या नुकसानापासून कारच्या आतील भागाचे सहज संरक्षण करू शकता.

Web Title: How to care of your car in holi 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 07:29 PM

Topics:  

  • automobile
  • car care tips
  • Holi 2025

संबंधित बातम्या

मायलेजची क्वीन! ‘स्प्लेंडर’ कशी बनली करोडो भारतीयांची ‘नॅशनल बाईक’?
1

मायलेजची क्वीन! ‘स्प्लेंडर’ कशी बनली करोडो भारतीयांची ‘नॅशनल बाईक’?

हिरो होंडा च्या या ५ ऐतिहासिक जुन्या बाईक तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या
2

हिरो होंडा च्या या ५ ऐतिहासिक जुन्या बाईक तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

बजाज ‘एम-८०’ ची यशोगाथा! मध्यमवर्गीयांच्या प्रगतीचे चाक आणि ग्रामीण भारताची ‘लाईफलाईन’!
3

बजाज ‘एम-८०’ ची यशोगाथा! मध्यमवर्गीयांच्या प्रगतीचे चाक आणि ग्रामीण भारताची ‘लाईफलाईन’!

Triumph Bonneville 400 पुन्हा एकदा दिसली टेस्टिंगदरम्यान; लवकरच भारतात होणार लाँच? जाणून घ्या
4

Triumph Bonneville 400 पुन्हा एकदा दिसली टेस्टिंगदरम्यान; लवकरच भारतात होणार लाँच? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.