Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त Vehicle Number Plate वरून कशी मिळवाल मालकाची माहिती? ‘ही’ आहे सर्वात सोपी पद्धत

जर तुम्ही एखाद्या वाहनाच्या नंबर प्लेटवरून त्याच्या मालकाची माहिती काढू इच्छिता, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण mParivahan नावाच्या अ‍ॅपबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 24, 2025 | 04:30 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

एखादे वाहन खरेदी केल्यानंतर सर्वात महत्वाचे काम असते ते म्हणजे त्या कार किंवा बाईकला Number प्लेट लावून घेणे. यासाठी आपल्याला जवळील RTO केंद्रात जावे लागते आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यात आता सरकारने संपूर्ण राज्यात HSRP नंबर प्लेट असणे अनिवार्य केले आहे. हा निर्णय वाहनांच्या सुरक्षिततेबाबत घेण्यात आला आहे. तसेच आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक असे भन्नाट अ‍ॅप आले आहेत, ज्यामुळे आपल्याला काही मिनिटातच माहिती मिळते.

जर तुम्हाला एखाद्याच्या वाहनाची माहिती हवी असेल तर तुम्ही ती ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या मिळवू शकता. mParivahan वेबसाइट आणि मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने, वाहन क्रमांक टाकून काही मिनिटांत ऑनलाइन डिटेल्स मिळवता येतात.

भारतात Audi Q7 Signature Edition लाँच, प्रीमियम किमतीत मिळणार पर्मियम फीचर्स

mParivahan व्यतिरिक्त, अनेक थर्ड पार्टी अ‍ॅप्सद्वारे कार मालकाची माहिती मिळवता येते. चालों जाणून घेऊयात की ऑनलाइन पद्धतीने कारची माहिती कशी मिळवायची.

mParivahan अ‍ॅप आहे तरी काय?

जर तुम्हाला कोणत्याही वाहनाची माहिती जाणून घ्यायची असेल, तर mParivahan अ‍ॅप किंवा वाहन पोर्टलमुळे ही प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. सर्वप्रथम, तुम्हाला mParivahan अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. हा अ‍ॅप अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी गुगल प्ले स्टोअरवर आणि आयफोन वापरकर्त्यांसाठी अ‍ॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे.

तुम्ही mParivahan च्या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. अ‍ॅप किंवा पोर्टल उघडल्यानंतर, सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल नंबर टाकून लॉगिन करावे लागेल. OTP पडताळणीनंतर, 6-अंकी MPIN सेट करावा लागेल, जेणेकरून तुम्ही भविष्यात सहजपणे लॉगिन करू शकाल.

अ‍ॅप किंवा वेबसाइटवरून वाहनाची माहिती कशी मिळवाल?

लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला ज्या वाहनाची माहिती मिळवायची आहे त्याचा व्हेईकल नंबर सबमिट करा- जसे की “DL01AB1234”. यानंतर “Search Vehicle” किंवा “Check RC Status” बटणावर क्लिक करा. आता तुम्हाला त्या वाहनाशी संबंधित माहिती मिळेल, जसे की मालकाचे पहिले नाव, वाहन कधी नोंदणीकृत होते, फिटनेस आणि इंश्युरन्स कधीपर्यंत वैध आहे, वाहन कोणत्या क्लासची आणि कंपनीची आहे. परंतु, गोपनीयतेमुळे, संपूर्ण पत्ता आणि मोबाइल नंबर दर्शविला जात नाही.

Tata Motors कडून भारतातील सर्वात किफायतशीर चार-चाकी मिनी-ट्रक लाँच, किंमत 3.99 लाख पासून सुरू

हे कायदेशीर आहे का?

ही प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर आहे कारण mParivahan ही भारत सरकारची अधिकृत सेवा आहे, जी पोलिस, वाहतूक विभाग आणि सामान्य नागरिक वाहने ओळखण्यासाठी, चोरीच्या घटना तपासण्यासाठी आणि रस्त्यावरील कोणत्याही संशयास्पद वाहनाची तपासणी करण्यासाठी वापरू शकतात.

लक्षात ठेवा

लक्षात ठेवा की काही थर्ड पार्टी अ‍ॅप्स देखील अशी सेवा देण्याचा दावा करतात, परंतु त्यांची सुरक्षितता प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते. म्हणून नेहमी फक्त mParivahan अ‍ॅप किंवा वाहन पोर्टल वापरा.

Web Title: How to get owner information just from vehicle number plate know about mparivahan app

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 04:30 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Vehicle Number Plate

संबंधित बातम्या

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल
1

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा
2

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा

FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम
3

FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI
4

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.