Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय सुरु करायचाय? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे होईल बम्पर कमाई!

ऑटोमोबाईल स्पेयर पार्ट्सचा व्यवसाय हा वाढत्या वाहनसंख्येमुळे कधीही मंदी न येणारा, ३ ते ७ लाखांच्या गुंतवणुकीत सुरू होणारा आणि २०% ते ४०% पर्यंत उत्तम नफा देणारा एक हमखास यशस्वी बिझनेस आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 28, 2026 | 10:33 PM
ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय सुरु करायचाय? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे होईल बम्पर कमाई!
Follow Us
Follow Us:

भारतात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाऱ्याच्या वेगाने वाढत आहे. गाड्या कितीही आधुनिक झाल्या, तरी त्यांचे स्पेअर पार्ट्स ठराविक काळानंतर बदलावेच लागतात. यामुळेच ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय हा अगदी बारा महिने चालणारा एक अत्यंत हमखास नफा देणारा बिझनेस ठरत आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात स्वतःचा पाय रोवायचा असेल, तर पुढील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही तुमचे नियोजन करू शकता,

मार्केट रिसर्च आणि प्रकारांची निवड

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या भागातील वाहनांचा कल समजून घेणे गरजेचे आहे. तुमच्या परिसरात दुचाकी जास्त आहेत की चारचाकी, त्यावरून तुम्ही ‘मल्टीब्रँड स्पेयर पार्ट्स’ दुकान किंवा एखाद्या विशिष्ट ब्रँडचे अधिकृत डीलर बनण्याचा निर्णय घेऊ शकता. सुरुवातीला दुचाकींच्या सुट्या भागांपासून सुरुवात करणे कमी खर्चाचे आणि सोपे ठरते.

स्वतःच ऑटो गॅरेज सुरू करायचंय? बजेटपासून लायसेन्स पर्यंत संपूर्ण माहिती समजून घ्या

योग्य जागेची निवड

या व्यवसायासाठी जागेची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. तुमचे दुकान मुख्य बाजारपेठेत, गॅरेज गल्लीत किंवा जिथे मेकॅनिकची दुकाने जास्त असतात किंवा मुख्य रस्त्यालगत असावे. ग्राहकांना गाड्या पार्क करण्यासाठी आणि मेकॅनिकला ये-जा करण्यासाठी दुकानाचा परिसर सोयीस्कर असावा. किमान ३०० ते ५०० स्क्वेअर फूट जागा यासाठी पुरेशी ठरते.

इन्व्हेंटरी आणि मार्केट

स्पेयर पार्ट्स व्यवसायाचे यश हे तुमच्याकडील मालाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. सुरुवातीला नट-बोल्ट, इंजिन ऑइल, फिल्टर्स, ब्रेक पॅड्स, क्लच केबल्स, इंडिकेटर्स आणि बॅटरीज यांसारख्या जास्त खपणार्‍या वस्तूंचा साठा ठेवावा. यासाठी दिल्लीचे करोल बाग, मुंबईचे ऑपेरा हाऊस किंवा पुण्यातील नाना पेठ यांसारख्या मोठ्या घाऊक बाजारांतून थेट कंपन्यांच्या डीलरकडून माल खरेदी केल्यास थेट बरेच मार्जिन मिळू शकते.

अमेरिका पाकिस्तान नाहीतर ‘या’ देशात मिळते सगळ्यात महाग पेट्रोल, किंमत ऐकून तुम्हाला सुद्धा बसेल धक्का

गुंतवणूक आणि नफ्याचे गणित

या व्यवसायासाठी सुरुवातीला साधारणपणे ३ ते ७ लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक असते. यामध्ये दुकानाचा अ‍ॅडव्हान्स, रॅक आणि अंतर्गत फर्निचर, तसेच मालाचा साठा यांचा समावेश होतो. या व्यवसायात सरासरी २०% ते ४०% पर्यंत नफा सहज मिळतो. काही स्थानिक उत्पादनांवर हा नफा ५०% पेक्षाही जास्त असू शकतो.

मेकॅनिक्सशी नेटवर्किंग

हा व्यवसाय वाढवण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे स्थानिक गॅरेज आणि मेकॅनिक्सशी मजबूत नेटवर्क तयार करणे. अनेकदा ग्राहक मेकॅनिकच्या सल्ल्यानेच पार्ट्स खरेदी करतात. त्यामुळे मेकॅनिक्सना काही कमिशन किंवा सवलती देऊन तुम्ही तुमच्या दुकानाची विक्री दुप्पट करू शकता. उत्तम गुणवत्ता आणि प्रामाणिक सेवा दिल्यास हा व्यवसाय तुम्हाला लॉंग टाइम आर्थिक स्थिरता देऊ शकतो.

Web Title: How to start automobile spare parts start up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 10:33 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
2

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
3

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
4

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.