अमेरिका पाकिस्तान नाहीतर 'या' देशात मिळते सगळ्यात महाग पेट्रोल, किंमत ऐकून तुम्हाला सुद्धा बसेल धक्का
भारतासह जगभरात सगळीकडे प्रवासासाठी वाहनाचा वापर केला जातो. हल्ली घरातील प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःची एक तरी गाडी असतेच. पेट्रोल हे जगभरातील सगळ्यात देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. जगभरातील वाहनांना आणि वाहतुकीला ऊर्जा पुरवण्याचे काम पेट्रोल करते. यास कर, तेल शुद्धीकरण कारखाने आणि तेल विहिरींची उपलब्धता, चलन विनिमय दर आणि सरकारी अनुदान यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरतात. मागील काही दिवसांमध्ये जगभरात चालू असलेल्या युद्धाचा परिणाम पेट्रोल, डिझेलच्या किमतींवर सुद्धा दिसून आला आहे. भारतात पेट्रोलची किंमत १०० रुपयांपेक्षा जास्त आहे. भारतामध्ये तेलाच्या गरजेपैकी ९०% तेल इतर देशांकडून खरेदी करतो. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानंतर पेट्रोलच्या किंमतीत मोठे बदल दिसून येतात. चला तर जाणून घेऊया जगातील सगळ्यात महाग पेट्रोल कोणत्या देशामध्ये मिळते, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
जगभरातील सर्वच देशांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. पण जगातील सगळ्यात महाग पेट्रोल अमेरिका, पाकिस्तानमध्ये नाहीतर हाँगकाँगमध्ये विकले जाते. सध्या, हाँगकाँगमध्ये पेट्रोलची किंमत ३१.९४ हाँगकाँग डॉलर आहे, जी भारतीय रुपयांमध्ये प्रति लिटर ३८४.५७ रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे. इतर देशांच्या तुलनेमध्ये सगळ्यात महाग पेट्रोल हाँगकाँगमध्ये विकले जाते. पेट्रोल, डिझेलच्या किंमतींचा अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून येतो.
पेट्रोलच्या किमती देशानुसार सतत बदलत असतात. अनुदान, कर, चलन विनिमय दर आणि तेल शुद्धीकरण कारखाने व तेल विहिरींची उपलब्धता यांसारखे घटक यासाठी कारणीभूत ठरतात. हॉंगकॉंग पेट्रोलसाठी पूर्णपणे इतर देशांवर अवलंबून असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. आपल्या इंधनाच्या गरजेपैकी ७५ टक्क्यांहून अधिक पेट्रोल आयात केले जाते. त्यामुळे हाँगकाँगमध्ये इतर देशांच्या तुलनेत पेट्रोल महाग आहे.
बजाज ऑटो दक्षिण भारतात उभारणार नवे प्लांट! तामिळनाडू आणि तेलंगणा पहिल्या नंबरवर!
याशिवाय सरकार आयात केलेल्या इंधनावर प्रचंड कर लावते आणि पेट्रोल पंपांसाठी लागणाऱ्या जमिनीची किंमत आवाक्याबाहेर आहे. या सर्व गोष्टींमुळे हाँगकाँगमधील पेट्रोल जगातील सर्वात महागड्या पेट्रोलपैकी एक मानले जाते. लोकांनी खाजगी वाहनांऐवजी सरकारी आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा यासाठी सरकार, असे कर लादत आहे. भारत आपल्या इंधनाच्या गरजेपैकी ९०% पेक्षा जास्त इंधन इतर देशांकडून खरेदी करते. राज्य सरकारे मूल्यवर्धित कराचे वेगवेगळे दर आकारले जातात. भारतात पेट्रोलचे दर प्रति लिटर ₹१०२ ते ₹११४ पर्यंत आहेत.






