फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात अनेक उत्तम कार्स उपलब्ध आहेत, ज्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसते. पूर्वीपेक्षा आता कार्सची आवश्यकता अनेकांना भासू लागली आहे. हीच मागणी पाहता, अनेक विदेशी ऑटो कंपन्या भारतात स्वस्तात मस्त कार्स ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे.
आज जरी आपण नवीन वर्षात पदार्पण केले असले तरी डिसेंबर 2024 मध्ये ऑटो कंपन्यांचा परफॉर्मन्स कसा होता, असा प्रश्न नक्कीच कार्सप्रेमींना पडला असेल. भारतीय बाजारपेठेत दर महिन्याला लाखो वाहनांची विक्री होते. डिसेंबर 2024 मध्ये देखील, सर्व वाहन उत्पादकांनी आपल्या कारची विक्री वाढवण्यासाठी आणि स्टॉक क्लिअर करण्यासाठी मोठ्या सवलतीच्या ऑफर दिल्या होत्या. चला जाणून घेऊया, मागील महिना MG, Mahindra, Kia आणि Hyundai साठी कार विक्रीच्या बाबतीत कसा होता.
अखेर जानेवारी 2025 मध्ये Hyundai Creta EV होणार लाँच, सोशल मीडियावर पहिला टिझर प्रदर्शित
2024 चा शेवटचा महिना ब्रिटिश ऑटोमोबाईल उत्पादक एमजी मोटर्ससाठी खूप चांगला होता. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2024 मध्ये कंपनीने देशभरात एकूण 7516 युनिट्सची विक्री केली आहे. वार्षिक आधारावर, कंपनीने डिसेंबर 2024 मध्ये विक्रीच्या बाबतीत 55 टक्के वाढ केली आहे.
कंपनीच्या विक्रीत इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वाधिक वाटा आहे. गेल्या वर्षी देशात लाँच झालेल्या MG Windsor EV लाही ग्राहकांनी खूप पसंती दिली आहे. या इलेक्ट्रिक कारचे 10 हजार युनिट्स अवघ्या तीन महिन्यांत विकले गेले आहेत. ज्यासह ती सलग तिसऱ्या महिन्यात ग्राहकांची आवडती ईव्ही ठरली आहे. कंपनीच्या एकूण विक्रीत EV सेगमेंटचे योगदान 70 टक्के आहे.
आजपासून Honda Activa e आणि QC1 ची बुकिंग सुरु, ‘या’ शहरांना डिलिव्हरीसाठी पहिले प्राधान्य
SUV निर्माता महिंद्रासाठी 2024 चा शेवटचा महिनाही खूप चांगला होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात देशात 46222 युनिट्सची विक्री झाली. तर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ही संख्या 39981 होती. वार्षिक आधारावर, कंपनीच्या विक्रीच्या बाबतीत 16 टक्के वाढ झाली आहे. निर्यातीच्या बाबतीतही कंपनीने 53 टक्के वाढ केली आहे. डिसेंबर 2024 मध्ये एकूण 2776 युनिट्सची निर्यात झाली होती तर डिसेंबर 2023 मध्ये ही संख्या 1816 युनिट्स होती.
दक्षिण कोरियन ऑटोमेकर Hyundai ने डिसेंबर 2024 मध्ये 55078 युनिट्स विकल्या आहेत. तर डिसेंबर 2023 मध्ये ही संख्या 56450 युनिट्स होती. आकडेवारीनुसार, वार्षिक आधारावर विक्रीत 2.4 टक्के घट झाली आहे. कंपनीच्या विक्रीत सीएनजी पोर्टफोलिओचे योगदान 13.1 टक्के आहे आणि २०२४ मध्ये केवळ क्रेटा एसयूव्हीने 186919 युनिट्सची विक्री केली आहे.
Hyundai व्यतिरिक्त, आणखी एक दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी Kia देखील भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्कृष्ट कार आणि SUV विकते. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये कंपनीने 255038 युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीने वार्षिक आधारावर सहा टक्के वाढ नोंदवली आहे.