Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! HSRP नंबर प्लेटची मुदत आज संपणार; १ जुलैपासून कारवाई, अनेक RTO सेवा होणार बंद

महाराष्ट्रात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ आहे. १ जुलैपासून HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 29, 2026 | 03:03 PM
वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! HSRP नंबर प्लेटची मुदत आज संपणार; १ जुलैपासून कारवाई, अनेक RTO सेवा होणार बंद

वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! HSRP नंबर प्लेटची मुदत आज संपणार; १ जुलैपासून कारवाई, अनेक RTO सेवा होणार बंद

Follow Us
Follow Us:
  • वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना!
  • HSRP नसल्यास दंडासह RTOची कामेही अडकणार
  • आजच बसवा HSRP नंबर प्लेट;
  • उद्यापासून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई
मुंबई : महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे. ही मुदत संपल्यानंतर १ जुलैपासून HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून, संबंधित वाहनधारकांना आरटीओच्या अनेक सेवांपासूनही वंचित राहावे लागणार आहे. तसेच HSRP न बसविलेल्या वाहनांची आरटीओमधील अनेक महत्त्वाची कामेही रोखण्यात येणार आहेत.

HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांना वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल तसेच परवाना नूतनीकरण यांसारख्या आरटीओमधील सेवा उपलब्ध होणार नाहीत. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नाही. दरम्यान, ३० जूनपर्यंत HSRP बसविण्यासाठी अधिकृतपणे अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना १ जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.

प्रवासाचा आनंद वाढवा! भारतात ‘व्हेंटिलेटेड सीट्स’ मिळणाऱ्या या आहेत सर्वात स्वस्त १० गाड्या

राज्यात HSRP बसविण्याच्या कामासाठी तीन झोन निश्चित करण्यात आले असून, झोन १ साठी रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, झोन २ साठी रिअल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि झोन ३ साठी एफटीए HSRP सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने HSRP बसविण्यासाठी अधिकृत दरही निश्चित केले आहेत. त्यानुसार दुचाकीसाठी ४५० रुपये, तीनचाकीसाठी ५०० रुपये, तर हलकी मोटार वाहने आणि मध्यम व अवजड व्यावसायिक वाहनांसाठी ७४५ रुपये (जीएसटी वगळून, फिटमेंट शुल्कासह) आकारण्यात येणार आहेत.

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम १७७ अन्वये पोलीस आणि परिवहन विभाग हे संयुक्त किंवा स्वतंत्रपणे ही कारवाई करणार आहेत. तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनीही त्यांच्या ताब्यातील वाहनांवर ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.

कोणत्या सेवा मिळणार नाहीत?

HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) मिळणाऱ्या अनेक महत्त्वाच्या सेवांचा लाभ घेता येणार नाही. त्यामध्ये:

वाहन हस्तांतरण (Ownership Transfer)

पत्ता बदल (Address Change)

वाहनावरील कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे (Hypothecation)

वाहनाची पुनर्नोंदणी (Re-registration)

वाहनातील बदलांची नोंद (Alteration)

परवाना किंवा संबंधित नूतनीकरणाची प्रक्रिया

मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अपॉइंटमेंट घेतलेल्यांना दिलासा

३० जूनपर्यंत अधिकृत संकेतस्थळावरून HSRP बसविण्यासाठी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. अशा वाहनधारकांवर १ जुलैपासून सुरू होणारी दंडात्मक कारवाई त्वरित केली जाणार नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

राज्यात तीन झोन, तीन कंपन्यांची नियुक्ती

HSRP बसविण्याच्या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाने राज्याचे तीन झोनमध्ये विभाजन केले असून, प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र कंपनीची नियुक्ती केली आहे.

झोन १: Rozmerta Technologies Limited

झोन २: Real Industries Limited

झोन ३: FTA HSRP Solutions Pvt. Ltd.

HSRP बसविण्याचे अधिकृत शुल्क
शासनाने HSRP नंबर प्लेटसाठी खालील अधिकृत दर निश्चित केले आहेत (जीएसटी व फिटमेंट शुल्क वगळता):

दुचाकी: ₹450

तीनचाकी: ₹500

हलकी मोटार वाहने तसेच मध्यम व अवजड व्यावसायिक वाहने: ₹745

HSRP का महत्त्वाची?

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही अॅल्युमिनियमची विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली नंबर प्लेट आहे. तिच्यावर लेझर कोड, क्रोमियम होलोग्राम आणि कायमस्वरूपी लॉकिंग प्रणाली असते. त्यामुळे वाहनांची ओळख पटविणे सोपे होते तसेच बनावट नंबर प्लेट, वाहन चोरी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय सुरु करायचाय? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे होईल बम्पर कमाई!

राज्य शासनाने वाहनधारकांना मुदतीपूर्वी HSRP बसवून घेण्याचे आवाहन केले असून, अन्यथा दंडात्मक कारवाईसह आरटीओच्या महत्त्वाच्या सेवांवरही निर्बंध येणार असल्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Hsrp number plate deadline maharashtra rto rules july 1 action marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • automobile news
  • HSRP
  • RTO

संबंधित बातम्या

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या
1

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या

Tata Motors: टाटा कार्सची मोठी घोषणा! ऑल-न्यू ‘टाटा एरिस’ लाँच; जाणून घ्या किंमत
2

Tata Motors: टाटा कार्सची मोठी घोषणा! ऑल-न्यू ‘टाटा एरिस’ लाँच; जाणून घ्या किंमत

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
3

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.