शहरांमधील वाहतूक कोंडी आणि वाढत्या प्रवासाच्या वेळेमुळे गाड्यांमध्ये आरामदायी फिचर्सची मागणी वेगाने वाढत आहे. आजकाल ग्राहकांसाठी ‘व्हेंटिलेटेड सीट्स’ हा एक अत्यंत महत्त्वाचा फिचर बनला आहे. या विशेष सीट्समध्ये लहान पंखे आणि एअर चॅनेल्स असतात, जे सीट्सच्या पृष्ठभागावरून हवा खेळती ठेवतात. यामुळे लांबच्या प्रवासात पाठीला घाम येत नाही आणि थकवा कमी होतो. एकेकाळी हा केवळ महागड्या लक्झरी गाड्यांचा भाग मानला जायचा, परंतु आता हा फिचर बजेट गाड्यांमध्येही उपलब्ध झाला आहे. तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या अशाच १० सर्वात स्वस्त गाड्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
सध्या भारतातील व्हेंटिलेटेड सीट्स मिळणारी सर्वात स्वस्त गाडी रेनो काइगर आहे. या गाडीच्या ‘इमोशन’ व्हेरियंटपासून हा फिचर अवघ्या ८.४५ लाख रुपयांमध्ये मिळतो. त्याखालोखाल प्रीमियम सब-४ मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये किया सोनेट चा ‘एचटीएक्स’ व्हेरियंट ११.३२ लाख रुपयांत आणि युरोपियन लूक असलेली नवीन स्कोडा कायलाक चा ‘प्रेस्टिज’ व्हेरियंट ११.७५ लाख रुपयांत हा आरामदायी पर्याय देतो.
ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय सुरु करायचाय? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे होईल बम्पर कमाई!
मध्यम बजेट असलेल्या ग्राहकांसाठी ह्युंदाई व्हेन्यू चा ‘एचएक्स८’ व्हेरियंट ११.९१ लाख रुपयांत, तर भारतातील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही पैकी एक असलेली टाटा नेक्सॉन तिच्या ‘फिअरलेस प्लस’ व्हेरियंटमध्ये १२.२७ लाख रुपयांना व्हेंटिलेटेड सीट्स उपलब्ध करून देते. याशिवाय, कूप-एसयूव्ही स्टाईल आवडणाऱ्यांसाठी सिट्रॉन बेसाल्ट चा ‘मॅक्स टर्बो एक्स’ व्हेरियंट १२.४७ लाख रुपयांमध्ये एक उत्तम पर्याय ठरतो.
पर्यावरणपूरक आणि इलेक्ट्रिक वाहनांचा विचार केल्यास, टाटा पंच इव्ही च्या ‘इम्पॉवर्ड प्लस’ व्हेरियंटमध्ये १२.५९ लाख रुपयांत हा फिचर मिळतो, जी शहरात फिरण्यासाठी उत्तम इव्ही आहे. मोठ्या कुटुंबांसाठी ५ ते ७ सीटरचा पर्याय देणारी सिट्रॉन एअरक्रॉस एक्स चा ‘मॅक्स टर्बो’ व्हेरियंट १२.८२ लाख रुपयांत आणि देशातील अत्यंत विश्वासार्ह ६-सीटर एमपीव्ही मारुति सुझुकी एक्सएल६ चा ‘अल्फा प्लस’ व्हेरियंट १३.१८ लाख रुपयांत व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्ससह येतो. या यादीतील एकमेव प्रीमियम सेडान म्हणजेच ह्युंदाई व्हर्ना असून, तिच्या ‘एचएक्स६ प्लस’ व्हेरियंटमध्ये १३.८२ लाख रुपयांत हा फिचर मिळतो.
तुमच्या गाडीच्या नंबरप्लेट वरील आकडे आणि अक्षरे काय सांगतात? जाणून घ्या नंबर प्लेटवरील दडलेले गुपित!
जर तुमचे बजेट कमी असेल तर रेनो काइगर हा सर्वात उत्तम पर्याय आहे. प्रीमियम फिचर्स आणि मजबुती हवी असल्यास सोनेट, कायलाक किंवा नेक्सॉन योग्य ठरतात. कौटुंबिक प्रवासासाठी एक्सएल६ आणि आधुनिक पर्यायासाठी पंच इव्ही सर्वोत्तम आहे. आता कार कंपन्या भारतीय ग्राहकांच्या गरजेनुसार हे आरामदायक फिचर्स बजेट गाड्यांमध्ये देत असल्याने सर्वसामान्य वाहनचालकांचा रोजचा प्रवास अधिक चांगला होत आहे.






