Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ह्युंदाईची भारतात 1.47 लाख कोटींची मेगा गुंतवणूक! 2032 पर्यंत मोठा विस्तार, इलेक्ट्रिक वाहनांवरही देणार भर

ह्युंदाई मोटर ग्रुप भारतात 2032 पर्यंत तब्बल 1.47 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. प्रोडक्शन वाढवण्यापासून इलेक्ट्रिक वाहनांच्या टेक्नोलॉजीपर्यंत अनेक क्षेत्रांवर कंपनीचा भर असणार आहे. या मोठ्या प्लॅनमुळे भारताच्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये नेमके कोणते बदल होणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 14, 2026 | 08:03 PM
ह्युंदाईची भारतात 1.47 लाख कोटींची मेगा गुंतवणूक! 2032 पर्यंत मोठा विस्तार, इलेक्ट्रिक वाहनांवरही देणार भर
Follow Us
Follow Us:
  • ह्युंदाई मोटर ग्रुप 2026 ते 2032 दरम्यान भारतात 1.47 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.
  • संशोधन आणि विकासासाठी 6,650 कोटी रुपये राखले असून वाहन चाचणी आणि नव्या टेक्नोलॉजीवर भर दिला जाणार आहे.
  • ह्युंदाई आणि किया प्रोडक्शन वाढवणार असून इलेक्ट्रिक मोबिलिटी, रिसायकलिंग आणि रोजगाराच्या संधींवरही लक्ष केंद्रित करणार आहेत.

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आपले स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ह्युंदाई मोटर ग्रुपने मोठी घोषणा केली आहे. कंपनी 2026 ते 2032 या कालावधीत भारतात सुमारे 1.47 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीत वाहनांचे प्रोडक्शन वाढवणे, संशोधन आणि विकास, वाहनांची चाचणी तसेच भविष्यातील मोबिलिटी टेक्नोलॉजीचा समावेश असेल. ह्युंदाई मोटर ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष ईसूंग चुंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

ह्युंदाई आणि किया यांच्या प्रोडक्शनमध्ये वाढ

सध्या ह्युंदाई मोटर ग्रुपची भारतातील 3 प्रोडक्शन प्लांट्स मिळून दरवर्षी 14.25 लाख वाहनांची कॅपसिटी आहे. यामध्ये चेन्नई येथील ह्युंदाई प्लांटची कॅपसिटी 8.24 लाख, पुणे प्लांटची 1.70 लाख आणि आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील किया प्लांटची 4.31 लाख वाहनांची आहे. नव्या गुंतवणुकीत पुण्यातील प्रोडक्शनचा विस्तार करण्याची योजना आहे. यामुळे भविष्यात वाहनांचे प्रोडक्शन वाढण्यासोबतच भारतातून परदेशात होणाऱ्या निर्यातीला जास्त चालना मिळू शकते.

ह्युंदाई टक्सन N Line आली नव्या अवतारात! 288 hp पॉवर, 67 किमी रेंज; फीचर्स पाहून व्हाल थक्क

संशोधन आणि टेक्नोलॉजीसाठी 6,650 कोटी रुपये

या मोठ्या गुंतवणुकीपैकी सुमारे 6,650 कोटी रुपये संशोधन आणि विकासासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. यात वाहनांच्या चाचणीसाठी ट्रॅक, इंजिनिअरिंग सुविधा आणि पुढील पिढीतील ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. भारतातील इंजिनिअर्सना वाहनांच्या डिझाइन, विकास आणि चाचणी प्रक्रियेत जास्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रिक वाहनांसह रोजगाराच्या संधी वाढणार?

या योजनेत इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग नेटवर्क, वाहनांचे रिसायकलिंग, ऑटो फायनान्स आणि नव्या मोबिलिटी सेवांचाही विचार केला जाणार आहे. भारतीय टेक्नोलॉजी स्टार्टअप्स आणि स्थानिक सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधल्या जातील. गुंतवणुकीचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी भारतात स्वतंत्र संस्था स्थापन करण्याचीही योजना आहे.

ह्युंदाई मोटर ग्रुप भारतात 24,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार देतो. चेन्नईमध्ये तांत्रिक कौशल्य प्रशिक्षणासाठी ह्युंदाई अकॅडमी सुरू करण्याची योजना आहे. या गुंतवणुकीमुळे उत्पादन, इंजिनिअरिंग, संशोधन आणि पुरवठादार क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. पण प्रत्यक्ष परिणाम किती आणि कोणत्या टप्प्यात दिसतील, हे प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर अवलंबून असेल.

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: ह्युंदाई मोटर ग्रुप भारतात किती गुंतवणूक करणार आहे?
उत्तर: कंपनी 2026 ते 2032 या कालावधीत भारतात सुमारे 1.47 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

प्रश्न 2: संशोधन आणि विकासासाठी किती निधी राखण्यात आला आहे?
उत्तर: संशोधन आणि विकासाशी संबंधित कामांसाठी सुमारे 6,650 कोटी रुपये राखण्यात आले आहेत. यात वाहन चाचणी ट्रॅक आणि इंजिनिअरिंग सुविधांचा समावेश आहे.

प्रश्न 3: या गुंतवणुकीमुळे भारताला काय फायदा होऊ शकतो?
उत्तर: वाहन प्रोडक्शन आणि निर्यात वाढण्यासोबत इलेक्ट्रिक मोबिलिटी, स्थानिक सुटे भाग, संशोधन आणि कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.

Web Title: Hyundai india investment 2032 manufacturing ev research auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Hyundai
  • investment

संबंधित बातम्या

पुण्यनगरीत तब्बल 4000 रोजगार! Maval मध्ये 2,500 कोटींची मोठी गुंतवणूक, मागील सात वर्षांत RMK गृपने…
1

पुण्यनगरीत तब्बल 4000 रोजगार! Maval मध्ये 2,500 कोटींची मोठी गुंतवणूक, मागील सात वर्षांत RMK गृपने…

Hyundai-TVS ची इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर 2027-28 पर्यंत भारतात येणार! दरमहा 4,000 युनिट्सच्या प्रोडक्शनचे लक्ष्य
2

Hyundai-TVS ची इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर 2027-28 पर्यंत भारतात येणार! दरमहा 4,000 युनिट्सच्या प्रोडक्शनचे लक्ष्य

VLF स्ट्राडा की एथर कोनार्क? कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरचा EMI कमी? पाहा संपूर्ण महिन्याचा हिशोब!
3

VLF स्ट्राडा की एथर कोनार्क? कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरचा EMI कमी? पाहा संपूर्ण महिन्याचा हिशोब!

MG Windsor Indulge Edition लाँच! 17.99 लाखांत नवा लूक, मागच्या सीटवर मिळणार खास आराम
4

MG Windsor Indulge Edition लाँच! 17.99 लाखांत नवा लूक, मागच्या सीटवर मिळणार खास आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.