
मावळमध्ये 2500 कोटींची गुंतवणूक
ही कंपनी (maval) अवजड मालवाहतुकीसाठी बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानावर चालणारे इलेक्ट्रिक ट्रक तयार करते. कंपनीचा ५५ टन क्षमतेचा ‘अश्वा’ ई-ट्रक अवघ्या सात मिनिटांत संपलेली बॅटरी बदलून पुन्हा प्रवासासाठी सज्ज होतो. यामुळे वाहतुकीतील वेळ वाचण्यासोबतच डिझेलचा वापर आणि प्रदूषण दोन्ही कमी होते. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाला हे ई-ट्रक पुरवले जात असून लवकरच हे ट्रक मुंबई–पुणे मार्गावरही धावणार आहेत.
मागील सात वर्षांत RMK समूहाने मावळ तालुक्यात ₹१०,००० कोटींहून अधिक गुंतवणूक केली असून १०,००० हून अधिक थेट रोजगार निर्माण केले आहेत. याचबरोबर समूहाने १५,००० हून अधिक वृक्षांचे रोपण केले असून उद्योगांसाठी ११.२ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्पही उभारले आहेत. तळेगाव एमआयडीसीमधील एकूण रोजगारांपैकी जवळपास ३० ते ४० टक्के रोजगार एकट्या RMK समूहामुळे निर्माण झाले आहेत.
परराज्यात जाणारे उद्योग मावळमध्ये आकर्षित करण्यात हा समूह अग्रेसर असून, इटली, फ्रान्स, जपान, अमेरिका, जर्मनी, दक्षिण कोरिया आणि तैवान यांसारख्या विविध देशांतील कंपन्यांनी येथे गुंतवणूक केली आहे. तसेच, कंपन्यांना योग्य आणि कुशल मनुष्यबळ मिळावे यासाठी “यशोदा महादेव काकडे इंजीनियरिंग कॉलेज” ची निर्मिती करण्यात आली असून, या औद्योगिक प्रकल्पांमध्ये शेतकऱ्यांना भागीदार बनवून त्यांना प्रति महिना प्रति एकर १,७५,००० रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवून दिले जात आहे.
‘संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे…’; Mangal Prabhat Lodha यांचे तरुणांना आवाहन