Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Ioniq P A New Chapter: कार खरेदीदारांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा काय आहे खास

Hyundai Ioniq P A New Chapter: ह्युंदाई भारतात आपली आजवरची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या गाडीचं नाव Ioniq P असू शकतं, तर कंपनीच्या अंतर्गत वापरात तिचं कोडनेम HE1i असल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्टनुसार या इलेक्ट्रिक SUV ची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 30, 2026 | 02:59 PM
Hyundai Ioniq P A New Chapter: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया))

Hyundai Ioniq P A New Chapter: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया))

Follow Us
Follow Us:

सध्या सगळीकडे इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला आहे. पेट्रोलचे भाव बघता सगळ्यांनाच EV घ्यावीशी वाटते, पण किंमत जास्त असल्यामुळे लोक थांबतात. हीच गोष्ट ओळखून आता हुंदाई भारतात आपली आजवरची सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक SUV आणायच्या तयारीत आहे.

या गाडीचं नाव Ioniq P असू शकतं असं बोललं जातंय. ही क्रेटा इलेक्ट्रिकपेक्षाही स्वस्त असेल. जर खरंच 10 लाखाच्या आत आली तर सर्वसामान्य माणसासाठी पण EV घेणं सोपं होईल. Hyundai Ioniq P A New Chapter:

भारतासाठी खास बनतेय छोटी EVहुंदाईची इलेक्ट्रिक गाड्यांची लिस्ट अजून खूप मोठी नाही. सध्या फक्त क्रेटा इलेक्ट्रिक आहे जी नुकतीच आली आहे. त्यामुळे कंपनीला आता एक स्वस्त आणि छोटी गाडी आणायची आहे जी जास्तीत जास्त लोकांना परवडेल.या नवीन गाडीला कंपनीच्या आतमध्ये ‘HE1i’ असं कोडनेम देण्यात आलंय. बाहेर रिपोर्टनुसार तिला Ioniq P म्हटलं जातंय.

Ioniq हे नाव हुंदाईचं इलेक्ट्रिक गाड्यांसाठीचं खास नाव आहे. जगभरात या नावाची खूप इज्जत आहे, त्यामुळे छोट्या गाडीला पण तेच नाव दिलं तर लोकांचा विश्वास बसेल, असा कंपनीचा प्लॅन दिसतोय.

कंपनीच्या मीटिंगमध्ये काय बोलणं झालं?

2026 च्या तिसऱ्या तिमाहीत हुंदाईच्या मोठ्या मीटिंगमध्ये म्हणजेच अर्निंग कॉन्फरन्स कॉलमध्ये यावर चर्चा झाली. तिथे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की Bayon नंतर आता Ioniq P लाँच होऊ शकते.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कंपनीने अजून अधिकृत नाव सांगितलेलं नाही. त्यांनी HE1i आणि Ioniq P एकच गाडी आहे असं पण थेट सांगितलेलं नाही. हे सगळं सध्या मार्केटमध्ये फिरणाऱ्या रिपोर्ट्सवरून समजतंय.

10 लाखाच्या आत येणार का?ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर ही गाडी 10 लाखाच्या आत आली तर मार्केट हलणार आहे. सध्या सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक गाड्या पण 8-9 लाखापासून सुरू होतात. हुंदाई जर 10 लाखाच्या आत चांगली SUV दिली तर मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी तो एकदम भारी पर्याय ठरेल.

Best SUVs Under Rs 12 Lakh in India: बजेट १२ लाखांपर्यंत? स्टायलिश लूक आणि दमदार फीचर्स असलेल्या ५ SUV पाहा!

तज्ञांच्या मते, 2027 या आर्थिक वर्षात भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची वाढ 90% पर्यंत होऊ शकते. अशा वेळी स्वस्त गाडी आणणं हुंदाईसाठी खूप फायदेशीर ठरेल.

बॅटरीचं काय? किंमत कशी कमी करणार?

सुरुवातीला हुंदाई या गाडीसाठी बाहेरून बॅटरी सेल आणणार आहे. नंतर भारतातच एक्साइड नावाच्या कंपनीकडून बॅटरी घेण्याचा प्लॅन आहे. पण एक्साइडने सांगितलंय की हुंदाई-किआच्या प्लॅननुसार बॅटरीचा पुरवठा यावर्षी लगेच सुरू होणार नाही.

त्यामुळे कंपनी पहिल्यांदा आयात केलेल्या बॅटरीने गाडी लाँच करेल आणि नंतर हळूहळू सगळे पार्ट्स भारतातच बनवायला सुरू करेल. यालाच लोकलायझेशन म्हणतात. जेवढे जास्त पार्ट्स भारतात बनतील, तेवढी गाडीची किंमत कमी ठेवता येईल. यामुळेच 10 लाखाच्या आत किंमत ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे.

AMPSTAR Electric Trucks: डिझेलला पर्याय ठरणार इलेक्ट्रिक ट्रक! ‘एएमपीस्टार’ची जड मालवाहतुकीत दमदार एंट्री

कधी येणार?

रिपोर्टनुसार ही गाडी याच वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबर 2026 मध्ये किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 2027 च्या जानेवारी-फेब्रुवारीत लाँच होऊ शकते.एकंदरीत बघता हुंदाई आता इलेक्ट्रिकच्या शर्यतीत पूर्ण ताकदीने उतरतेय. क्रेटा इलेक्ट्रिकने सुरुवात झाली आणि आता Ioniq P सारखी स्वस्त गाडी आणून कंपनी सर्वसामान्य ग्राहकांना पण EV जवळ आणायचा प्रयत्न करतेय. पण खरी किंमत, फीचर्स आणि लाँचची तारीख यासाठी आपल्याला कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ह्युंदाईच्या नवीन इलेक्ट्रिक SUV चे नाव काय असू शकते?

    Ans: रिपोर्टनुसार या गाडीचं नाव Ioniq P असू शकतं. कंपनीचं अंतर्गत कोडनेम HE1i आहे.

  • Que: ह्युंदाई Ioniq P ची किंमत किती असू शकते?

    Ans: ही इलेक्ट्रिक SUV 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे.

  • Que: ह्युंदाईची नवीन इलेक्ट्रिक SUV भारतात कधी लॉन्च होणार?

    Ans: रिपोर्टनुसार डिसेंबर 2026 किंवा 2027 च्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ती लॉन्च होऊ शकते.

Web Title: Hyundai ioniq p electric suv under 10 lakh india launch rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • auto mobile news
  • Marathi News
  • SUV
  • SUV cars

संबंधित बातम्या

Raigad News: सह्याद्रीच्या जंगलतोडीविरोधात शेकाप आक्रमक; चित्रलेखा पाटील यांचा टोरंट प्रकल्पाला विरोध
1

Raigad News: सह्याद्रीच्या जंगलतोडीविरोधात शेकाप आक्रमक; चित्रलेखा पाटील यांचा टोरंट प्रकल्पाला विरोध

Maggi Manchurian Recipe: मॅगी खाण्याचा नवा फंडा! मंचूरियन स्टाइलमध्ये बनवा झणझणीत पदार्थ, रेसिपी पाहाच
2

Maggi Manchurian Recipe: मॅगी खाण्याचा नवा फंडा! मंचूरियन स्टाइलमध्ये बनवा झणझणीत पदार्थ, रेसिपी पाहाच

सह्याद्रीतील हजारो झाडांवर कुऱ्हाड? टोरेंट वीज प्रकल्पाविरोधात सांगलीत मशाल मोर्चा
3

सह्याद्रीतील हजारो झाडांवर कुऱ्हाड? टोरेंट वीज प्रकल्पाविरोधात सांगलीत मशाल मोर्चा

Chandrapur News: परवानगी नाही, तरी व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू? चंद्रपुरात नेमकं चाललंय काय?
4

Chandrapur News: परवानगी नाही, तरी व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू? चंद्रपुरात नेमकं चाललंय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.