Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: परवानगी नाही, तरी व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू? चंद्रपुरात नेमकं चाललंय काय?

चंद्रपूरातील बजाज पॉलिटेक्निकसमोरील जागेवर एका कापड व्यापाऱ्याकडून भव्य व्यापारी संकुल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या बांधकामाला महापालिकेची अधिकृत बांधकाम परवानगी मिळालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 30, 2026 | 01:38 PM
Chandrapur News: परवानगी नाही, तरी व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू? चंद्रपुरात नेमकं चाललंय काय?

Chandrapur News: परवानगी नाही, तरी व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू? चंद्रपुरात नेमकं चाललंय काय?

Follow Us
Follow Us:
  • परवानगी मिळालेली नसतानाही शहरात एका भव्य व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू
  • बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे ऑनलाइन अर्जही सादर
  • महापौर आणि उपमहापौर यांच्या प्रभागातच हा प्रकार घडत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा
चंद्रपूर: महापालिकेची अधिकृत बांधकाम परवानगी मिळालेली नसतानाही शहरात एका भव्य व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हे बांधकाम महापौर संगीता खांडेकर आणि उपमहापौर प्रशांत दानव यांच्या प्रभागातील बजाज पॉलिटेक्निकसमोरील विठ्ठल मंदिर परिसरात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत बांधकाम थांबविण्याचे तोंडी निर्देश दिल्याची माहिती आहे. मात्र, त्यानंतरही बांधकाम सुरूच असल्याचा आरोप होत असल्याने महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

अकोल्यात भीषण पाणीटंचाई; टँकर लॉबी सक्रिय, घरगुती वापरापासून ते बांधकामापर्यंत मनमानी दर

बजाज पॉलिटेक्निकसमोरील जागेवर एका कापड व्यापाऱ्याकडून भव्य व्यापारी संकुल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. संबंधित व्यापाऱ्याने जागेचे चार भाग करण्यासाठी अर्ज केला असून, बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे ऑनलाइन अर्जही सादर केला आहे. मात्र, या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे बांधकामाला अधिकृत मंजुरी मिळाली नसताना प्रत्यक्ष काम सुरू कसे झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

बांधकामाबाबत तक्रार झाल्यानंतर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन काम थांबविण्याचे तोंडी निर्देश दिल्याचे सांगितले जाते. मात्र, या निर्देशांनंतरही बांधकाम सुरू असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने केवळ तोंडी सूचना देण्याऐवजी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून नियमांनुसार पुढील कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महापौर आणि उपमहापौर यांच्या प्रभागातच हा प्रकार घडत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. संबंधित बांधकामाची अधिकृत परवानगी, अर्जाची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष कामाची पाहणी करून महापालिका प्रशासन काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Mumbai Drone Crash: शो ठरला जीवघेणा! मुंबईत उडत्या ड्रोनचा प्रवाशाला भीषण फटका; डोक्याला गंभीर दुखापत!

संबंधित बांधकामाला अद्याप परवानगी देण्यात आली नाही, या प्रकरणाची फाइल नगररचना विभागात प्रलंबित आहे. संबंधितांवर कोणती कारवाई करायची, याचा निर्णय महापालिकेतील संबंधित अधिकारी घेतील,- राहुल भोवर, नगररचनाकार, चंद्रपूर महापालिका

संबंधित व्यापाऱ्याने परवानगी न घेताच बांधकाम सुरू केले. सदर प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली असून बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले आहे. सध्या बांधकाम सुरू नाही.- संगीता खांडेकर, महापौर, चंद्रपूर

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur municipal corporation under scrutiny over alleged unauthorized commercial complex construction hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Nagpur News : रूपम फूड्वर एफडीएचा छापा; ७ लाखांचा माल केला जप्त १५ टन संशयित नूडल्स
1

Nagpur News : रूपम फूड्वर एफडीएचा छापा; ७ लाखांचा माल केला जप्त १५ टन संशयित नूडल्स

Hyundai Ioniq P A New Chapter: कार खरेदीदारांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा काय आहे खास
2

Hyundai Ioniq P A New Chapter: कार खरेदीदारांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा काय आहे खास

Raigad News: सह्याद्रीच्या जंगलतोडीविरोधात शेकाप आक्रमक; चित्रलेखा पाटील यांचा टोरंट प्रकल्पाला विरोध
3

Raigad News: सह्याद्रीच्या जंगलतोडीविरोधात शेकाप आक्रमक; चित्रलेखा पाटील यांचा टोरंट प्रकल्पाला विरोध

Maggi Manchurian Recipe: मॅगी खाण्याचा नवा फंडा! मंचूरियन स्टाइलमध्ये बनवा झणझणीत पदार्थ, रेसिपी पाहाच
4

Maggi Manchurian Recipe: मॅगी खाण्याचा नवा फंडा! मंचूरियन स्टाइलमध्ये बनवा झणझणीत पदार्थ, रेसिपी पाहाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.