
Maggi Manchurian Recipe: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया))
मॅगीचं आईस्क्रीम, मॅगीचे समोसे झालं, आता आलंय नवीन मॅगी मंचुरियन, बघा भन्नाट रेसिपी मॅगी म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. 2 मिनिटात होणारी मॅगी आता फक्त 2 मिनिटाची राहिली नाही. लोक तिच्यासोबत वेगवेगळे प्रयोग करत असतात. कोणी मॅगीचं आईस्क्रीम बनवतं, तर कोणी मॅगीचे समोसे तळून विकतं. असाच एक नवीन प्रयोग सध्या इंस्टाग्रामवर खूप गाजतोय तो म्हणजे मॅगी मंचुरियन.
नेहमीच्या बटाट्याच्या किंवा कोबीच्या मंचुरियनऐवजी आता मॅगी वापरून मंचुरियन बनवलं जातंय. दिसायला तर ते एकदम कुरकुरीत आणि तोंडाला पाणी आणणारं दिसतं. Maggi Manchurian Recipe:
mummy_ka_foodie या पेजवर ही रेसिपी शेअर झाली आहे आणि लोकांना ती खूप आवडत पण आहे. काहीजण म्हणतायत, मॅगीसोबतच का असे प्रयोग करता? पण एकदा चव घेऊन बघायला काय हरकत आहे? या वीकेंडला तुम्ही पण नक्की ट्राय करा.
हे बनवायला फार काही मोठं सामान नाही लागत. घरात जे असतं त्यातच होऊन जातं.
2 कप मॅगी, पण मसाला न टाकता फक्त उकडून घेतलेली
2 कप बारीक चिरलेल्या भाज्या – सिमला मिरची, गाजर, कांदा, पत्ता कोबी
2 चमचे कॉर्नफ्लॉवर1 चमचा आलं-लसूण-मिरचीची पेस्टमॅगी मसाला एक पुडा
थोडं मीठ, थोडी मिरी पावडर
तळण्यासाठी तेल
ग्रेव्हीसाठी – टोमॅटो सॉस, चिली सॉस, शेजवान सॉस, सोया सॉस आणि 1 चमचा व्हिनेगर
गोळे तयार करणे
सगळ्यात आधी मॅगी उकडून घ्या. लक्षात ठेवा, त्यातला मसाला टाकायचा नाही, फक्त मॅगी उकडायची आणि पाणी काढून थंड करायची. आता एका मोठ्या भांड्यात ती उकडलेली मॅगी घ्या. त्यात तुम्ही चिरलेल्या सगळ्या भाज्या टाका. वरून कॉर्नफ्लॉवर, आलं-लसूण पेस्ट, मॅगी मसाला, मीठ आणि मिरी पावडर टाका. हे सगळं हाताने चांगलं मिक्स करून घ्या. आता या मिश्रणाचे छोटे छोटे लिंबाएवढे गोळे बनवा. हेच आपले मंचुरियन बॉल आहेत.
गोळे तळून घेणे
गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तेल गरम करा. तेल चांगलं तापलं की त्यात हे गोळे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. खूप जास्त गर्दी करू नका, 4-5 गोळे एका वेळी तळा म्हणजे ते कुरकुरीत होतील. तळलेले गोळे एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
हिवाळ्यात खा स्पेशल मखाना कटलेट; झटपट आणि चविष्ट
चमचमीत ग्रेव्ही बनवणे
आता ग्रेव्ही, दुसऱ्या कढईत थोडं तेल घ्या. त्यात चौकोनी चिरलेला कांदा आणि सिमला मिरची टाका. जास्त शिजवू नका, थोडं कुरकुरीतच राहू द्या. मग त्यात आलं-लसूण पेस्ट टाका आणि परतून घ्या. आता त्यात सगळे सॉसेस टाका. एक चमचा टोमॅटो सॉस, एक चमचा चिली सॉस, एक चमचा शेजवान सॉस आणि थोडा सोया सॉस. त्यात थोडं पाणी टाका. एका वाटीत कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट करून ग्रेव्हीमध्ये टाका म्हणजे ग्रेव्ही घट्ट होईल. शेवटी थोडं व्हिनेगर टाका.
सर्व्ह करणे
ग्रेव्हीला उकळी आली की त्यात तळलेले मॅगीचे गोळे टाका आणि एक मिनिट हलक्या हाताने मिक्स करा. जास्त वेळ ठेवू नका नाहीतर गोळे मऊ होतील. वरून थोडी कोथिंबीर किंवा कांद्याची पात टाकून गरमागरम सर्व्ह करा.
झालं, तुमचं कुरकुरीत, चटपटीत मॅगी मंचुरियन तयार. मुलांना तर हे खूपच आवडेल. संध्याकाळच्या खाण्यासाठी किंवा पार्टी स्नॅक्स म्हणून एकदम भारी पर्याय आहे.
Ans: साधी मॅगी उकडून वापरावी. उकडताना त्यात मॅगी मसाला टाकू नये.
Ans: उकडलेल्या मॅगीमध्ये चिरलेल्या भाज्या, कॉर्नफ्लॉवर, आलं-लसूण-मिरची पेस्ट, मॅगी मसाला, मीठ आणि मिरी पावडर मिसळून छोटे गोळे तयार करावेत.
Ans: मॅगी मंचुरियन गरमागरम स्नॅक्स म्हणून किंवा पार्टीमध्ये सर्व्ह करता येते.