फोटो सौजन्य: @khuleonwheels (X.com)
भारतीय बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार बेस्ट कार ऑफर करत असतात. यातील काही कार ग्राहकांच्या मनात घर करून बसतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ह्युंदाई क्रेटा. आज जरी अनेक नवीन कार मार्केटमध्ये दाखल होत असल्या तरी क्रेटाच्या विक्रीत काही घट होताना दिसत नाही.
भारतीय बाजारपेठेत मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये सादर केलेली ह्युंदाई क्रेटा खूप लोकप्रिय आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता कंपनी या एसयूव्हीचे नवीन जनरेशन आणण्याची तयारी करत आहे. कंपनी ही नवीन कार कधीपर्यंत आणू शकते? त्याबद्दल आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.
‘ही’ 7 सीटर कार मार्केटमध्ये ठरतेय सुपरहिट, किंमत एकदा जाणून घ्याच
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ह्युंदाई नवीन जनरेशन क्रेटा लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीकडून याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु पुढील काही महिन्यांत त्याचे उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी नवीन जनरेशन क्रेटा केवळ नॅचरली एस्पिरेटेड आणि टर्बो इंजिनसह लाँच करणार नाही. तर, यामध्ये हायब्रिड तंत्रज्ञानासह इंजिन देखील दिले जाऊ शकते. यात 1.5 लिटर पेट्रोल इंजिनसह हायब्रिड तंत्रज्ञान दिले जाऊ शकते.
2024 मध्ये ह्युंदाईने क्रेटा अपडेट केली. जानेवारी 2024 मध्येच, ही एसयूव्ही नवीन लूक आणि अनेक उत्तम फीचर्ससह लाँच करण्यात आली होती. काही काळानंतर, त्याचे अधिक स्पोर्टी व्हर्जन एन लाईन देखील अपडेटसह सादर करण्यात आले. या वर्षी जानेवारीमध्ये भारत मोबिलिटी अंतर्गत आयोजित ऑटो एक्स्पो 2025 मध्ये या एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील लाँच करण्यात आले होते.
Maruti, Mahindra, Kia Skoda चे धाबे दणाणार, टाटा मोटर्स Nexon मध्ये करू शकते मोठे बदल
ह्युंदाईने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. परंतु अशी अपेक्षा आहे की नवीन जनरेशन ह्युंदाई क्रेटा २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ पर्यंत सादर केली जाऊ शकते. ही एसयूव्ही फक्त भारतातील तामिळनाडू येथील कारखान्यातूनच तयार केली जाऊ शकते.
रिपोर्ट्सनुसार, नवीन पिढीतील ह्युंदाई क्रेटा SX3 या कोडनेमने विकसित केली जात आहे. नवीन पिढीच्या क्रेटामध्ये अनेक बदल केले जाऊ शकतात. तसेच, सध्याच्या व्हर्जनपेक्षा चांगले फीचर्स आणि डिझाइन दिले जाऊ शकते. त्याच्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये मोठी बॅटरी आणि अधिक शक्तिशाली मोटर देखील सादर केली जाऊ शकते.
ह्युंदाई क्रेटा ही कंपनीने मिड साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणली आहे. या सेगमेंटमध्ये, ही कार मारुती ग्रँड विटारा, टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर, किआ सेल्टोस, महिंद्रा स्कॉर्पिओ एन, एक्सयूव्ही 700, जेएसडब्ल्यू एमजी हेक्टर आणि अॅस्टर सारख्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करते.