Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai August Sales: ह्युंदाईच्या विक्रीत मोठी वाढ; ऑगस्ट महिन्यात विकले ५४,००० हून अधिक युनिट्स

ह्युंदाई मोटर इंडियाने ऑगस्ट २०२६ मध्ये ५४,३९६ युनिट्स विकून देशांतर्गत विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 01, 2026 | 04:34 PM
Hyundai August Sales: ह्युंदाईच्या विक्रीत मोठी वाढ; ऑगस्ट महिन्यात विकले ५४,००० हून अधिक युनिट्स
Follow Us
Follow Us:
  • पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्यातीत अडथळे आले तरी ह्युंदाईने देशांतर्गत विक्रीत आतापर्यंतचा विक्रम मोडून ५४ हजार युनिट्स विकले.
  • कंपनीची बहुचर्चित क्रीटा कार आणि मजबूत उत्पादन पोर्टफोलिओमुळे भारतीय बाजारात उत्कृष्ट ग्राहकांचा प्रतिसाद सतत मिळत आहे.
  • एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत कंपनीच्या देशांतर्गत विक्रीमध्ये वार्षिक आधारावर १२.६ टक्के वाढ झाली.

जगभरात चाललेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीत अडथळे येत असतानाही, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने (HMIL) २०२६ मधील ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारात आतापर्यंतची सर्वाधिक ५४,३9६ वाहने विकून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ४४,०१० युनिट्सची विक्री झाली होती, ज्याच्या तुलनेत यावर्षी २३.६ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या महिन्यात निर्यातीसह एकूण विक्री ६५,७९६ युनिट्सवर पोहोचली असून, यामध्ये वार्षिक आधारावर ८.८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

कंपनीच्या निर्यातीच्या तुलनेत स्थानिक व्यवसाय म्हणजेच देशांतर्गत विक्रीने खूपच सरस कामगिरी केली आहे. भारतीय बाजारात कंपनीने दुहेरी अंकी वाढ नोंदवली असून, या यशामागे कंपनीचे वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ मुख्य कारण असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यात विशेषतः ‘क्रेटा’ कार आघाडीवर असून तिची लोकप्रियता अगदी कायम आहे. क्रेटाचे नवीन जनरेशन मॉडेल २०२७ मध्ये अंतर्गत आणि बाह्य बदलांसह लाँच होणार आहे, तर ‘व्हेन्यू’ नवीन अवतारात नुकतीच बाजारात आली आहे. याशिवाय, चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत उच्च व्हॉल्यूम विक्रीचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून ह्युंदाई एक नवीन स्थानिक पातळीवर उत्पादित केलेली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. उर्वरित विक्रीत गेल्या महिन्यात ११,४०० युनिट्सची निर्यात नोंदवली गेली.

500 किमी रेंज आणि कोच डोअर्स! ऑल-इलेक्ट्रिक Genesis GV90 वरून उठला पडदा! पाहा या ब्रँड न्यू कारचे फीचर्स आणि माहिती

दरम्यान, पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या लॉजिस्टिक समस्यांमुळे कंपनीच्या निर्यातीवर काही प्रमाणात ताण आला होता. यामुळे परदेशी बाजारपेठेत वाहने पाठवण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला खरा. मात्र, परिस्थिती सुधारल्यास निर्यातीची स्थिती सुधारेल अशी अपेक्षा ह्युंदाईने व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना ह्युंदाई मोटर इंडियाचे एमडी आणि सीईओ तरुण गर्ग म्हणाले,

“आम्ही आर्थिक वर्ष २०२७ मध्ये मजबूत वाढीचा वेग कायम ठेवला आहे, ज्यामध्ये एप्रिल-ऑगस्ट या कालावधीत देशांतर्गत विक्री १२.६ टक्क्यांनी वाढली आहे. ऑगस्ट महिन्यातील आमची ५४,३९६ युनिट्सची देशांतर्गत विक्री हा कोणत्याही ऑगस्ट महिन्यातील आतापर्यंतचा उच्चांक आहे, जो ह्युंदाईच्या अष्टपैलू उत्पादन पोर्टफोलिओची लोकप्रियता दर्शवतो. पश्चिम आशियातील संघर्ष आणि भू-राजकीय परिस्थितीमुळे ऑगस्टमध्ये एकूण निर्यातीवर परिणाम झाला असला, तरी भू-राजकीय परिस्थिती सुधारल्यास आगामी महिन्यांत निर्यातीची मागणी मजबूत राहील असा आम्हाला विश्वास आहे.”

Hyundai: हुंदाईच्या नव्या मास-मार्केट इलेक्ट्रिक कारमध्ये दिसणार नेक्स्ट जनरेशन अत्याधुनिक कनेक्टेड फीचर्स! पाहा काय असेल खास

ब्रँडच्या या विक्री कामगिरीमुळे आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या पाच महिन्यांत ह्युंदाईचा सकारात्मक प्रवास अधिक मजबूत झाला आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीतील देशांतर्गत विक्रीत वार्षिक १२.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच कंपनीने २०३० पर्यंत पारंपारिक इंजिन तसेच इलेक्ट्रिक वाहनांचे नवे मॉडेल आणि अपडेट्स आणण्याची व्यापक योजना आखली आहे.

Web Title: Hyundai records highest ever domestic sales auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • cars
  • Hyundai

संबंधित बातम्या

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया
1

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

2027 Kawasaki Ninja 500: भारतीय बाजारात दाखल झाली २०२७ कावासाकी निन्जा ५००! पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
2

2027 Kawasaki Ninja 500: भारतीय बाजारात दाखल झाली २०२७ कावासाकी निन्जा ५००! पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

२०२७ टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट होणार लाँच; नवीन लूक आणि फीचर्सची माहिती आली समोर!
3

२०२७ टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट होणार लाँच; नवीन लूक आणि फीचर्सची माहिती आली समोर!

भारतातील ऑटोमोबाईल वर्कफोर्स ‘फक्त सर्टिफिकेटमध्ये श्रीमंत, पण कौशल्यात कमी; ‘लुकस इंडियन सर्व्हिसेस’चे अध्यक्ष राघवन यांचे मत
4

भारतातील ऑटोमोबाईल वर्कफोर्स ‘फक्त सर्टिफिकेटमध्ये श्रीमंत, पण कौशल्यात कमी; ‘लुकस इंडियन सर्व्हिसेस’चे अध्यक्ष राघवन यांचे मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.