फोटो सौजन्य: X
भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्राची व्याप्ती ही खूप मोठी आहे. म्हणूनच तर देश विदेशातील ऑटो कंपन्या भारतीय मार्केटमध्ये आपली नवनवीन वाहनं लाँच करत असतात. भारतीय ग्राहक सुद्धा या विदेशी कंपन्यांच्या वाहनांना चांगला प्रतिसाद देत आहे. पण नवीन वर्षात अनेक ऑटो कंपन्यांनी आपल्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. नुकतेच दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईने सुद्धा Tucson च्या किमतीत वाढ केली आहे.
भारतीय बाजारात ह्युंदाईने प्रीमियम एसयूव्ही म्हणून टक्सन विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने या कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या एसयूव्हीची किंमत किती वाढली आहे. तसेच कोणता व्हेरियंट खरेदी करण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील, त्याबद्दल जाणून घेऊया.
बजेट फ्रेंडली किमतीत नवीन Kia Syros लाँच, दमदार फीचर्ससह मिळणार अधिक सुरक्षितता
फेब्रुवारी २०२५ पासून ह्युंदाई टक्सन खरेदी करणे महाग झाले आहे. कंपनीने या कारच्या किंमती तात्काळ वाढवल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टक्सनच्या किंमती १० ते २५ हजार रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. तसेच यांच्या सर्व व्हेरियंटच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
कंपनीने प्लॅटिनम पेट्रोल ऑटोमॅटिक, सिग्नेचर पेट्रोल ऑटोमॅटिक आणि सिग्नेचर पेट्रोल ऑटोमॅटिक ड्युअल टोन व्हेरियंटच्या किंमती सर्वात जास्त वाढवल्या आहेत. याशिवाय, इतर सर्व व्हेरियंटच्या किंमती सुमारे 10000 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत.
ह्युंदाई टक्सन एसयूव्ही दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये प्लॅटिनम आणि सिग्नेचरचा समावेश आहे. या दोन्ही व्हेरियंटमध्ये वेगवेगळे इंजिन आणि ट्रान्समिशन दिले आहेत. Hyundai Tucson ची एक्स-शोरूम किंमत २९.२७ लाख रुपयांपासून सुरू होईल. त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत आता ३६.०४ लाख रुपये असेल.
तरुणांची धडकन असणारी Harley-Davidson बाईक्सची किंमत स्वस्त होणार, Budget 2025 मध्ये मोठी घोषणा
ह्युंदाई टक्सन एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. यात पॅरामीट्रिक फ्रंट ग्रिलसह कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प, एलईडी लाईट्स, १८ इंच अलॉय व्हील्स, शार्क फिन अँटेना, रिअर फॉग लॅम्प, अँबियंट लाइट्स, ड्युअल टोन इंटीरियर, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल झोन एसी, व्हेंटिलेटेड आणि हीटेड सीट्स, स्मार्ट की, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, क्रूझ कंट्रोल, १०.२५ इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार, ओटीए अपडेट्स, मल्टी लँग्वेज सपोर्ट, सहा एअरबॅग्ज, व्हीएसएम, एचएसी, डीबीसी, टीपीएमएस, रेन सेन्सिंग वायपर्स, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज, पार्किंग सेन्सर्स अशी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहे.
या एसयूव्हीमध्ये दोन लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ज्यामुळे या कारला १५६ पीएसची पॉवर आणि १९२ न्यूटन मीटरचा टॉर्क मिळते. ज्यासोबत ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध आहे. याशिवाय, त्यात दोन लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन देखील उपलब्ध आहे. ज्यामुळे त्याला १८६ पीएसची पॉवर आणि ४१६ न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. यात ८ स्पीड एटी ट्रान्समिशन दिले आहे.