
फोटो सौजन्य: iStock
2026 हे नवीन वर्ष सुरू होताच, भारतातील अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू झाली. या वर्षाच्या सुरुवातीला जीएसटी सवलतीचा फायदा ग्राहकांना झाला असला तरी, किंमत वाढल्याने त्या सवलतीचा परिणाम काही प्रमाणात कमी होणार आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे की वाढत्या खर्च आणि रुपयाची घसरण ही यामागील मुख्य कारणे आहेत.
नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये
मर्सिडीज-बेंझने त्यांच्या संपूर्ण कार्सच्या किमती अंदाजे 2 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. कच्चा माल, लॉजिस्टिक्स खर्च आणि युरोच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे खर्च वाढला आहे असे कंपनीचे म्हणणे आहे. बीएमडब्ल्यूने जानेवारी 2026 पासून त्यांच्या कारच्या किमती पुन्हा वाढवल्या आहेत. यापूर्वी, सप्टेंबर 2025 मध्ये किमती वाढवल्या गेल्या होत्या. नवीन वाढीचा परिणाम 3 सिरीजसारख्या लोकप्रिय कारवरही झाला आहे.
BYD कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक कार Sealion 7 च्या किमतीत वाढ केली आहे. मात्र, 31 डिसेंबर 2025 पूर्वी बुकिंग केलेल्या ग्राहकांना जुन्या किमतीचा लाभ देण्यात आला आहे. याशिवाय MG Motor ने पेट्रोल, डिझेल तसेच इलेक्ट्रिक अशा सर्व मॉडेल्सच्या किमतींमध्ये सुमारे 2 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे MG Windsor EV आणि Comet EV सारख्या परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सही आता पूर्वीपेक्षा महाग झाल्या आहेत.
Kia ने केला खेळ खल्लास! सर्व कंपन्यांची उडाली झोप; डिसेंबर 2025 मध्ये तब्बल 2 लाखांपेक्षा…
Nissan ने जानेवारी 2026 पासून आपल्या कार्सच्या किमती 3 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. त्यामुळे Magnite सारखी किफायतशीर SUV खरेदी करताना ग्राहकांना अधिक खर्च करावा लागणार आहे. Honda ने देखील वाढत्या उत्पादन खर्चामुळे किमतींमध्ये बदल करत असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र अद्याप नेमके आकडे जाहीर केलेले नाहीत. तसेच Renault ने Kwid, Triber आणि Kiger या लोकप्रिय बजेट कार्सच्या किमती वाढवल्या असून, याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांच्या खिशावर होत आहे.