
फोटो सौजन्य: Gemini
भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या टोयोटा अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. एसयूव्ही सेगमेंटमध्ये टोयोटा फॉर्च्युनर देखील ऑफर केली जाते. मात्र, आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला या एसयूव्हीची किंमत वाढवण्यात आली होती. चला जाणून घेऊयात या एसयूव्हीची किंमत किती रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
Yamaha XSR 155 आणि TVS Ronin समोरासमोर! इंजिन, फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक खाते जास्त भाव?
डिसेंबर 2025 मध्ये अनेक कंपन्यांनी ही किंमत वाढवण्याची घोषणा केली होती.अहवालांनुसार, आता टोयोटाने देखील फॉर्च्युनरची एसयूव्हीची किंमत 74000 रुपयांपर्यंत वाढवली आहे.
किंमत वाढल्यानंतर, एसयूव्हीच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 34.16 लाख रुपये झाली आहे. नवीन वर्षात या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 51000 रुपयांनी वाढली आहे.
टोयोटा फॉर्च्युनरच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 74000 रुपयांनी वाढवली आहे. या व्हेरिएंटची नवीन एक्स-शोरूम किंमत 49.59 लाख रुपये झाली आहे. यापूर्वी, या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 48.85 लाख रुपये होती.
कंपनीने 2.8-लिटर टर्बो डिझेल मॅन्युअल 2WD व्हेरिएंटची किंमत अंदाजे 52000 रुपये , 4WD व्हेरिएंटची किंमत 57000 रुपये , 2.8-लिटर टर्बो डिझेल ऑटोमॅटिक 2WD व्हेरिएंटची किंमत 55000 रुपये आणि 4WD व्हेरिएंटची किंमत 63000 रुपयांनी वाढवली आहे.
एसयूव्हीच्या 2.8 -लिटर टर्बो डिझेल मॅन्युअल 2WD व्हेरिएंटची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 34.80 लाख रुपये आहे. 4WD व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत आता 38.68 लाख रुपये आहे. 2.8-लिटर टर्बो डिझेल ऑटोमॅटिक 2WD व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत आता 36.96 लाख रुपये आहे. तसेच, 4WD व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत आता 42.37 लाख रुपये आहे.