
'या' तारखेला लाँच होणार शक्तिशाली दमदार SUV चे नवीन मॉडेल (Photo Credit- X)
नवीन जनरेशन ह्युंदाई व्हेन्यूचा लूक अधिक आकर्षक आणि आधुनिक असणार आहे. आतापर्यंत समोर आलेल्या फोटोंनुसार, याचे डिझाईन आता अधिक क्रेटा (Creta) सारखे बोल्ड आणि बॉक्सी असेल.
नवीन व्हेन्यूचे इंटिरियर पूर्णपणे बदललेले असेल आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत ती अपग्रेड झालेली असेल.
| इंजिन पर्याय | पॉवर (hp) | गियरबॉक्स पर्याय |
| 1.2-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल | 83 hp | 5-स्पीड मॅन्युअल |
| 1.0-लीटर टर्बो पेट्रोल | 120 hp | 6-स्पीड मॅन्युअल / 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक |
| 1.5-लीटर डिझेल | 100 hp | 6-स्पीड मॅन्युअल |
ह्युंदाई व्हेन्यू भारतीय बाजारपेठेत दरमहा 7,000 ते 8,000 युनिट्स विक्रीसह कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्हीपैकी एक आहे. नवीन मॉडेल लाँच झाल्यानंतर ही एसयूव्ही पुन्हा एकदा टाटा नेक्सॉन (Tata Nexon), मारुती ब्रेझा (Maruti Brezza), किया सोनेट (Kia Sonet) आणि महिंद्रा XUV 3XO यांसारख्या प्रतिस्पर्धी मॉडेलला जोरदार टक्कर देईल. नवीन व्हेन्यू 2025 डिझाईन, इंटिरियर आणि फीचर्सच्या बाबतीत अधिक प्रीमियम आणि आकर्षक असेल, ज्यामुळे स्टाइलिश, आरामदायक आणि विश्वासार्ह कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.