Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Verna vs Virtus: कोणती कार सेफ्टीच्या बाबतीत एकदम बेस्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नुकतेच ह्युंदाईने त्यांची नवीन 2026 Verna ला लाँच केले आहे. या अपडेटेड मॉडेलचा थेट सामना Volkswagen Virtus सोबत होणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 14, 2026 | 03:53 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Verna चा अपडेटेड मॉडेल लाँच
  • थेट Volkswagen Virtus असेल स्पर्धा
  • जाणून घ्या दोन्ही कार्सची माहिती
Hyundai ने त्यांची Verna कार नव्या अपडेट्ससह बाजारात लाँच केली आहे. या अपडेटमध्ये कारच्या बाहेरील डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, तसेच इंटीरियरमध्ये नवीन फीचर्सही जोडण्यात आले आहेत. याशिवाय कारच्या व्हेरिएंट्सची नावेही बदलण्यात आली आहेत. या बदलांनंतर आता Verna च्या टॉप मॉडेल HX10 ची तुलना थेट Volkswagen Virtus या टॉप मॉडेलशी केली जात आहे.

इंजिन स्पेसिफिकेशन

Verna आणि Virtus या दोन्ही कारच्या टॉप मॉडेलमध्ये फक्त ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. Verna मध्ये ग्राहकांना जास्त पर्याय उपलब्ध आहेत. यात टर्बो पेट्रोल इंजिनसोबत Naturally Aspirated पेट्रोल इंजिनचाही पर्याय दिला जातो.

तर Virtus च्या GT Plus व्हेरिएंटमध्ये फक्त 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते. मात्र, Virtus च्या इतर किफायतशीर व्हेरिएंटमध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्यायही उपलब्ध आहे.

स्वस्त ऑटोमॅटिक कार हवीय? Kia Sonet ने आणली मार्केटमध्ये नवी कार; किंमत आहे इतकी खास…

एक्सटीरियर फीचर्स

दोन्ही कारमध्ये LED लाईट्स आणि 16-इंच अलॉय व्हील्स दिलेले आहेत. तसेच ऑटो-फोल्डिंग ORVMs सुद्धा मिळतात. फॉग लॅम्प्सच्या बाबतीत Virtus थोडी पुढे आहे, कारण या कारमध्ये पुढे आणि मागे दोन्ही बाजूंना फॉग लॅम्प्स दिले आहेत. याशिवाय दोन्ही कारमध्ये रियर स्पॉयलर आहे. Verna मध्ये मोठा विंग स्पॉयलर दिला आहे, तर Virtus मध्ये डिक्कीच्या कडेला छोटा आणि स्टायलिश स्पॉयलर आहे.

दोन्ही कार आकर्षक रंगांमध्ये आणि मॅट फिनिशमध्ये उपलब्ध आहेत. मात्र Verna मध्ये ड्युअल-टोन पेंटचा पर्याय मिळतो. Virtus चा टॉप मॉडेल स्पोर्टी आणि क्रोम एलिमेंट्ससह येतो, ज्यामुळे ती अधिक स्टायलिश दिसते.

फीचर्समध्ये कोणती कार पुढे?

फीचर्सच्या बाबतीत Verna थोडी आघाडीवर दिसते. यात मोठी इन्फोटेनमेंट आणि डिजिटल डिस्प्ले स्क्रीन, मेमरी फंक्शनसह पॉवर ड्रायव्हर सीटसाठी अधिक अ‍ॅडजस्टमेंट, फ्रंट पॅसेंजर सीटसाठी इलेक्ट्रिक बॉस मोड आणि रियर सनशेड मिळते. दुसरीकडे Virtus मध्ये पॉवर फ्रंट पॅसेंजर सीटसाठी अतिरिक्त अ‍ॅडजस्टमेंट तसेच 60:40 स्प्लिट रियर सीट फोल्डिंगची सुविधा दिली आहे, जी Verna मध्ये उपलब्ध नाही.

महागाईचा दणका! गॅसपाठोपाठ आता पेट्रोल-डिझेलची चिंता वाढली; ‘या’ गाड्या देतील सगळ्यात जास्त मायलेज…

सेफ्टी फीचर्स

सुरक्षेच्या बाबतीत दोन्ही कार मजबूत आहेत. दोन्हीमध्ये ABS, TPMS, ESC आणि ऑटो-डिमिंग IRVM सारखे फीचर्स दिले आहेत. मात्र, Verna मध्ये काही आधुनिक तंत्रज्ञानाचे फीचर्स अधिक मिळतात, जसे की 360 डिग्री कॅमेरा, लेव्हल 2 ADAS, जास्त एअरबॅग्स आणि पार्किंग सेन्सर्स. हे फीचर्स Virtus मध्ये उपलब्ध नाहीत.

सुरक्षेच्या बाबतीत Volkswagen Virtus ला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे, त्यामुळे ही कार खूप सुरक्षित मानली जाते. Autocar India च्या माहितीनुसार, नवीन Verna चे अद्याप टेस्टिंग झालेले नाही, पण तिच्या आधीच्या मॉडेललाही 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली होती.

Web Title: Hyundai verna 2026 vs volkswagen virtus which car is best safety features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • automobile
  • Hyundai
  • Volkswagen Taigun

संबंधित बातम्या

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी
1

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी

Mahindra Thar OG vs Thar ROXX vs Scorpio-N: फॅमिली वापरासाठी कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या
2

Mahindra Thar OG vs Thar ROXX vs Scorpio-N: फॅमिली वापरासाठी कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या
3

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक
4

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.