फोटो सौजन्य: X.com
भारतीय बाजारात विविध प्रकारच्या बाईक ऑफर होत असतात. मार्केटमध्ये विविध सेगमेंटच्या बाईक उपलब्ध आहेत. यातही बजेट फ्रेडली आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या 125 cc सेगमेंटमधील बाईकला चांगली मागणी मिळते. तसेच अनेक कंपन्या या सेगमेंटमधील बाईकला बदलत्या काळानुसार अपडेटही करत असतात.नुकतेच हिरो मोटोकॉर्पने त्यांची Hero Glamour X 125 अपडेट केली आहे.
2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
हिरो मोटोकॉर्प भारतात अनेक सेगमेंटमध्ये बाईक ऑफर करते. नुकतेच कंपनीने 19 ऑगस्ट रोजी 125 सीसी सेगमेंटमध्ये नवीन बाईक म्हणून 2025 Hero Glamour X 125 लाँच केली आहे. बाजारात ही बाईक थेट Honda Shine 125 शी स्पर्धा करेल. इंजिन, मायलेज, फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीत, दोन्ही बाईकपैकी कोणती तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
19 ऑगस्टला भारतात Hero Glamour X125 लाँच करण्यात आली आहे. कंपनीने या बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. या बाईकमध्ये इको, रोड आणि पॉवर ड्रायव्हिंग मोड, एलईडी लाईट्स, टाइप सी चार्जिंग पोर्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, पॅनिक ब्रेक अलर्ट, क्रूझ कंट्रोल सारखी फीचर्स दिले आहेत.
दुसरीकडे, होंडा शाईन 125 मध्ये ईएसपी टेक्नॉलॉजी, साइड स्टँड इंजिन कट-ऑफ,18-इंच टायर्स, ईएसएस, सीबीएस, हॅलोजन हेडलॅम्प, डिजिटल स्पीडोमीटर, सायलेंट स्टार्टसह एसीजी, टाइप सी चार्जिंग पोर्ट अशी अनेक फीचर्स आहेत.
कंपनीने Hero Glamour X 125 मध्ये 124.7cc सिंगल सिलेंडर Sprint EBT इंजिन दिले आहे. हे इंजिन 11.4 bhp पॉवर आणि 10.5 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये 10 लिटर पेट्रोल टँक देखील आहे.
दुसरीकडे, Honda Shine 125 मध्ये 123.94 cc इंजिन आहे. जे त्याला 7.9 kW पॉवर आणि 11 न्यूटन मीटर टॉर्क देते. बाईकमध्ये 10.5 लिटर पेट्रोल टँक आहे.
Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी; बाउंससोबत ऐतिहासिक भागीदारी
Hero Glamour X 125 दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याच्या ड्रम ब्रेक व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 89,999 रुपये आहे, तर डिस्क व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे.
होंडा शाईन 125 च्या ड्रम ब्रेक व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 85,590 रुपये आहे, तर डिस्क व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 90341 रुपये आहे.